न्हावरे प्रकरणातील आरोपी तत्काळ अटक करा; तृप्ती देसाई

न्हावरा (ता. शिरुर) येथील बिडगर, सूर्यवंशी वस्ती येथील महिलेचा विनयभंग करत असताना त्याला विरोध केला म्हणुन मारहाण करुन महिलेचे डोळे काढणे ही अत्यंत धक्कादायक घटना असुन महिलेचा विनयभंग करुन तिचे डोळे काढून डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करा

शिक्रापूर: न्हावरा (ता. शिरुर) येथील बिडगर, सूर्यवंशी वस्ती येथील महिलेचा विनयभंग करत असताना त्याला विरोध केला म्हणुन मारहाण करुन महिलेचे डोळे काढणे ही अत्यंत धक्कादायक घटना असुन महिलेचा विनयभंग करुन तिचे डोळे काढून डोळे निकामी करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ताई देसाई यांनी केली आहे.

शिक्रापुरात प्रशालेच्या समोरच थाटतोय भाजी बाजार

न्हावरा (ता. शिरुर) येथे सायंकाळच्या सुमारास शेतकरी मजूर महिलेचा एक अनोळखी व्यक्ती विनयभंग करत असताना, सदर महिलेने त्याला विरोध केला म्हणुन त्या महिलेवर प्राणघातक हल्ला करुन त्या महिलेचे डोळे काढून टाकले गेले असुन ही अत्यंत निंदनीय घटना असुन त्या नराधमांमध्ये ही प्रवृत्ती येते कुठून असा सवाल करत पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही, असा आरोप करीत महाराष्ट्र राज्याला ३ गृहराज्य मंत्री दिले असले तरी महिलांवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही. या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करावी, जरी या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष घातले असले तरी आरोपींना अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी करत हे क्रूर कृत्य महिलांवर केली जातात ती तातडीने थांबवली पाहिजे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

 

Title: Arrest the accused in the Nhavara case immediately Trupti D
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे