शिरुर शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ...?

जैव वैदकीय कचरा टाकला जातोय उघड्यावर

शिरुर शहरातील दशक्रिया घाटाजवळ मोठया प्रमाणात जैव वैदकीय कचरा टाकल्याची धक्कादायक घटना घडली असुन सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे प्रशासन विविध उपाय योजना करुन कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे या प्रयत्नावर पाणी ओतण्याचे काम काही जण करत आहेत.

शिरुर: शिरुर शहरातील दशक्रिया घाटाजवळ मोठया प्रमाणात जैव वैदकीय कचरा टाकल्याची धक्कादायक घटना घडली असुन सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे प्रशासन विविध उपाय योजना करुन कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे या प्रयत्नावर पाणी ओतण्याचे काम काही जण करत आहेत.

पुणे-नगर रस्त्यावरील एटीएम फोडले अन्...

शिरुर शहरातील दशक्रिया विधी घाटा जवळ शिरुर भाजपा सरचिटणीस विजय नरके यांच्या सतर्कतेमुळे एक धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. दशक्रिया घाटाजवळ मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा टाकलेला आढळून आला. यात रुग्णांच्या रक्त, लघवी तपासलेल्या छोट्या-छोट्या बाटल्या व वापरलेले इंजेक्शन मोठया प्रमाणात टाकलेले आढळून आले. यावेळी मुख्याधिकारी यांना संपर्क करुन माहिती दिली असता, त्यांनी ताबडतोब स्वछता निरीक्षक यांना घटना स्थळी पाठवले. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावरच सत्ताधारी नगरसेवकांचे घर आहे.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानगंगा' कार्यक्रम

याविषयी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की जैव वैद्यकीय कचरा हा शासनाने ठरवून दिलेल्या नियमाने तळेगाव येथून येणाऱ्या कचरा गाडीतच टाकावे. तसेच ज्याने कोणी हा कचरा टाकला असेल त्याचा शोध घेऊन कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.

Title: Biomedical waste is dumped in the open
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे