रांजणगावमध्ये तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह...

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मागील आठवड्यात कोरोना पाँझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संर्पकातील आणखी तीन जण कोरोना पाँझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी दिली. यामुळे रांजणगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

रांजणगाव गणपती : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मागील आठवड्यात कोरोना पाँझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संर्पकातील आणखी तीन जण कोरोना पाँझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी दिली. यामुळे रांजणगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

रांजणगाव गणपती येथे सुरवातीला पुण्याला गेलेला एक जण कोरोना पाँझिटिव्ह सापडला होता. त्याच्या संर्पकातील पत्नी व मिञ ही त्यामुळे पाँझिटिव्ह सापडले होते. हे सर्व जण ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटली होती. माञ, मागील आठवड्यात रांजणगाव येथील एक जण पुन्हा कोरोना पाँझिटिव्ह सापडल्यामुळे व त्याच्या संर्पकातील तीन जण आज (मंगळवार) कोरोना पाँझिटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.

दरम्यान, रांजणगाव येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच वर पोहोचल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन करण्यात आले आहेत.

Title: corona virus three report positive at ranjangaon ganapti
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे