पुणे-नगर महामार्गावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने धोकादायकरित्या ऊस वाहतूक

ट्रेलरना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघातांची शक्यता अधिक

तळेगाव ढमढेरे परिसरात शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर ट्रॅक्टर- ट्रेलरच्या सहाय्याने धोकादायकरित्या ऊस वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या साखर कारखाने व गुऱ्हाळे सुरु असल्याने ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ऊसाची वाहतूक बैलगाड्या, ट्रॅक्टर-ट्रेलर व ट्रक मधुन होत आहे.

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे परिसरात शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर ट्रॅक्टर- ट्रेलरच्या सहाय्याने धोकादायकरित्या ऊस वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या साखर कारखाने व गुऱ्हाळे सुरु असल्याने ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ऊसाची वाहतूक बैलगाड्या, ट्रॅक्टर-ट्रेलर व ट्रक मधुन होत आहे. मात्र ट्रेलरच्या सहाय्याने ऊसाची सर्वाधिक वाहतूक होताना दिसत आहे.

शिक्रापूरात रंगू लागले पोलीस निरीक्षकांबाबतचे तक्रार नाट्य

Image may contain: 1 person, text that says

पुणे-अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच या ऊसाच्या ट्रेलरची भर पडली आहे. बऱ्याच वेळा ट्रॅक्टरला ३ ट्रेलर जोडलेले असतात. तसेच प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला असतो. त्यामुळे झोल जाऊन ट्रेलर पलटी होण्याच्या घटना घडत असुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी ऊस व ऊसाच्या मोळ्या पडलेल्या असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे.

Image may contain: text that says

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; आरोपींमध्ये एक महिलाही सामील

दिवस-रात्र ऊसाची अशी धोकादायक वाहतूक सुरु असुन ट्रेलरला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बहुतांशी नवीन ट्रेलरला नंबर प्लेट नाहीत. तसेच हे ट्रॅक्टर चालकही टेप रेकॉर्डर लावून आवाज वाढून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवताना आढळतात. ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना नियमावली करून देऊन त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Title: Dangerous transport of sugarcane by tractor on Pune Nagar hi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे