कलियुगातील गाडगेबाबाची कहाणी माहिती आहे का?

एक-दोन नाहीतर गावभर लावलेली तब्बल १०,००० झाडं वाढवून दाखवली आहेत. याशिवाय ५० एकरात रान भाज्यांसमवेत जंगल उभारण्याचा प्रयत्न केलाय. मुळातच वेडी लोकं इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे. इतिहास घडविण्यासाठी मुळातच ध्येयाने झपाटलेला माणुस लागतो. त्यासोबत समाज घटकातील अनेक क्लुप्तींसोबत संघर्ष करावा लागतो.

एक-दोन नाहीतर गावभर लावलेली तब्बल १०,००० झाडं वाढवून दाखवली आहेत. याशिवाय ५० एकरात रान भाज्यांसमवेत जंगल उभारण्याचा प्रयत्न केलाय. मुळातच वेडी लोकं इतिहास घडवतात हा एक इतिहास आहे. इतिहास घडविण्यासाठी मुळातच ध्येयाने झपाटलेला माणुस लागतो. त्यासोबत समाज घटकातील अनेक क्लुप्तींसोबत संघर्ष करावा लागतो. त्यावेळी समाजातील अनेक घटक, लोकं या व्यक्तीला येडा म्हणतात. कुणी म्हणतय याच्या डोक्यात फरक झालाय म्हणुन मी याची चौकशी केली, तर खरंच हा येडा निघाला पण आपल्या ध्येयाबद्दल! शहाणी लोकं याला रांगडा मर्द म्हणतात. या रांगड्या पहिलवानगड्याची ही  ध्येयवादी कहाणी!

ज्ञानाची ज्योत पेटविणाऱ्या सावित्रीबाईंना मानाचा मुजरा...

उमेश रमेश रणदिवे हे या रांगड्या मर्दाच नाव! पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस हे मातीत रुजलेल्या पठ्ठ्याचं गाव! घरी बागायती शेती, गड्याचा अगदी लहानपणापासुन पैलवानी पिंड! स्वभावानं अत्यंत साधा-भोळा पण अगदी श्रीसांबसदाशिव. स्वतःच्या गावातच जेमतेम शिकला आणि नंतर गावाबाहेर तालमीत गेला. घरी बागायत असल्यामुळे आपणच पिकवायचं आणि आपणच खायचं अस समाधानी जीवन त्यामुळे बाहेर नोकरी करायची गरज भासली नाही. हळुहळु भीमेच्या तीरावर फिल्टर पाण्याच प्रस्थ वाढलं. फुकट मिळणाऱ्या पाण्याला मोल द्यावा लागलं. तेव्हा याच्या डोक्यात टुप पेटली, यानं विचार केला आज पाणी विकत घ्याव लागतय उद्या ऑक्सिजन विकत घ्यावं लागंल. या विचाराने त्याला अक्खी रात्र झोप आली नाही. यानं झाडं लावायचं ठरवलं पण याचा प्रवास सोपा नव्हता, याला लोकांनी येडं ठरवलं कुणी वाया गेलेलं म्हणलं पण हा गडी मागं हटला नाही आपलं काम करत राहीला.

सावित्रीबाईंच्या ज्ञानामुळे ग्रामीण भागातील महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर...

सगळ्या अडथळ्यांवर कळस म्हणजे याला मारहाण करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला तरी हा आपलं काम करतच राहिला. तुम्हाला विश्र्वास बसंल की नाही माहित नाही पण याने एक-दोन नाहीतर गावभर लावलेली तब्बल १०,००० झाडं वाढवून दाखवली आहेत. याशिवाय ५० एकरात रान भाज्यांसमवेत जंगल उभारण्याचा प्रयत्न केलाय. यावर नुसती झाडं लाऊन तो थांबला नाही गावात फिरती लायब्ररी सुरु केली. उन्हाळ्यात पाणपोई चालवतो याच्या वरची पायरी की गेले १२० आठवडे हा गावात स्वच्छता अभियान चालवतो आणि सायकलिंग करुन विविध गावांत जाऊन व्यायामाच महत्त्व पटवून देतो. या सगळ्या कामांत त्याच्या पत्नीची त्याला विशेष साथ आहे हे महत्त्वाचं.

शिक्रापूरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

उद्या या माणसामुळं संतराज महाराजांच रांजणगाव या नावलौकिकाबरोबरच उमेश रणदिवे यांचं रांजणगाव असा गवागवा होणार आहे. आज जी लोकं नावं ठेवतात त्यांचं या जगात काहीच राहणार नाही मात्र उमेश रणदिवे अमर होणार आहे. वेडी माणसंच इतिहास घडवतात असा इतिहास आहे. असा हा वेडा माणुस भविष्यात आपल्या शाळेतल्या पुस्तकात धड्याच्या रुपात भेटला तर नवल वाटून घेऊ नका! कारण या माणसाचा नादचं खुळा आहे !

Title: Do you know the story of Gadge Baba in Kalyuga
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे