डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती साजरी
'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या सेटवर (दि. १२) रोजी सुप्रसिद्ध अभिनेते व वृक्षसंवर्धन मित्र सयाजी शिंदे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुन अभिनव पद्धतीने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.पुणे: 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या सेटवर (दि. १२) रोजी सुप्रसिद्ध अभिनेते व वृक्षसंवर्धन मित्र सयाजी शिंदे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करुन अभिनव पद्धतीने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.
युवकांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा; गणेश बांगर
गेल्या वर्षभरापासुन सोनी मराठी चॅनलवर स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका सुरु आहे. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ माँसाहेबांनी केलेली जडणघडण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य याची नव्या पिढीला ओळख व्हावी यासाठी ही मालिका सुरु आहे. आज राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती असल्याने या मालिकेत जिजाऊ माँसाहेबांची भूमिका करणाऱ्या नीना कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वृक्षारोपण करुन या निमित्ताने एक वेगळा असा पर्यावरण रक्षणाचा संदेश आपल्या कृतीतून दिला.