भ्रष्टाचार विरोधी समिती महिला अध्यक्षपदी डॉ.निता आल्हाट

निवडीबद्दल डॉ.निता आल्हाट यांचे सर्व स्तरातुन होतेय कौतुक

अन्याय-अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महिला (राजगुरूनगर शहर) अध्यक्ष पदी निता आल्हाट यांची निवड करण्यात आली.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.

टाकळी हाजी: अन्याय-अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महिला (राजगुरूनगर शहर) अध्यक्ष पदी निता आल्हाट यांची निवड करण्यात आली.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शर्मिलाताई शिंदे व खेड तालुका अध्यक्षा मनिषा परदेशी यांच्या शिफारशीनुसार निवड करुण त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ.निता आल्हाट यांनी विविध सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात काम केले असून सामाजिक कार्य यापुढील काळात अधिक जोमाने करणार असल्याचे त्यांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना सांगितले. त्यांच्या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Title: Dr Nita Alhat as the Women Chairperson of Rajgurunagar City
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे