या सिनेमा दरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज...

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या 'गुरु' या सिनेमाला १४ वर्षे पूर्ण झालीत आणि या सिनेमाच्या आठवणी जाग्या झाल्या. ऐश्वर्याने 'गुरु'च्या प्रीमिअरचे काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये मणिरत्नम दिग्दर्शित या सिनेमाचा प्रीमिअर पार पडला होता. ऐश्वर्या, अभिषेक आणि मणिरत्नम या प्रीमिअरला हजर होते.

मुंबई: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या 'गुरु' या सिनेमाला १४ वर्षे पूर्ण झालीत आणि या सिनेमाच्या आठवणी जाग्या झाल्या. ऐश्वर्याने 'गुरु'च्या प्रीमिअरचे काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये मणिरत्नम दिग्दर्शित या सिनेमाचा प्रीमिअर पार पडला होता. ऐश्वर्या, अभिषेक आणि मणिरत्नम या प्रीमिअरला हजर होते. प्रीमिअरसाठी ऐश्वर्याने खास निळ्या रंगाची साडी निवडली होती. अभिषेक ब्लॅक सूटमध्ये तर मणिरत्नम ग्रीन कलरच्या सूटमध्ये दिसले होते.

Image may contain: text that says

माझ्या पतीने आत्महत्या केली तर बच्चू कडू राहतील जबाबदार...

ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिषेक मीडियाला मुलाखत देतोय आणि ऐश्वर्या त्याच्या मागे उभी आहे. तिच्या चेह-यावर खट्याळ हास्य आहे. 'आजच्या दिवशी... १४ वर्षे... कायम गुरु....,' असे कॅप्शन तिने हे फोटो शेअर करताना दिले आहे. 'गुरु' आणि 'गुरु'चे न्यूयॉर्कमधील प्रीमिअर ऐश्वर्या व अभिषेकसाठी अनेकार्थाने खास आहे. कारण याच प्रीमिअरनंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची महिलेने धरली काँलर; काय असेल कारण

ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट...
ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या 'मृत्युदाता' या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये याच दरम्यान ऐश्वर्या तिच्या 'और प्यार हो गया' या पहिल्या चित्रपटाचे शूटींग करत होती. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट होता बॉबी देओल. बॉबी हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याच ठिकाणी अभिषेक ऐश्वर्याला पहिल्यांदा भेटला होता.

अश्या होत्या राजमाता, राष्ट्रमाता, माँ साहेब जिजाऊ...

अशी झाली होती नजरा-नजर...
ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरा रे' या गाण्याचे शूटींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे उमराव जानमध्ये दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. 'गुरु'च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, मी आणि ऐश्वर्या 'गुरु'च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्याचवेळी येथील हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून मी ऐश्वर्याबद्दल विचार करत होतो. ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर आयुष्य किती आनंदी असेल, असा विचार मनात सुरु होता. यानंतर टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये 'गुरु'च्या प्रीमिअर दरम्यान आम्ही न्यूयॉर्कच्या त्याच हॉटेलात थांबलो होतो. मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला प्रपोज केले.

Image may contain: text that says

तब्बल एवढ्या गाड्यांची जाळपोळ तर...

फिल्मी स्टाईलने केले होते प्रपोज...
अभिषेकने ऐश्वर्याला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज केले होते. ऐश्वर्याने याबद्दल सांगितले होते. अभिषेक खरा आहे. आमचे नाते जितके खरे आहे, तितकेच अभिषेकही सच्चा आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. परस्परांची काळजी घेतो, असे ती म्हणाली होती. २००७ मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि याचवर्षी २० एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले.

Title: During this movie Abhishek proposed to Aishwarya in a filmy
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे