अभिनेत्री कमल ठोके यांच्या निधनानंतर 'अज्या'ची भावनिक पोस्ट...

'लागिरं झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या जेष्ठ अभिनेत्री कमल ठोके वय ७४ यांचं नुकतंच निधन झालं. गेल्या अनेक काळापासुन त्या कर्करोगाने त्रस्त होत्या. बंगळुरुमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबई: 'लागिरं झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या जेष्ठ अभिनेत्री कमल ठोके वय ७४ यांचं नुकतंच निधन झालं. गेल्या अनेक काळापासुन त्या कर्करोगाने त्रस्त होत्या. बंगळुरुमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कमल ठोके यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन

प्रसिद्ध मालिका 'लागिर झालं जी' मधून कमल ठोके यांनी जीजी हे पात्र साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. तर १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे सहकलाकारांसोबतंच चाहत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. लागिरं झालं जी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणा-या अजिंक्य म्हणजे अभिनेता नितीश चव्हाणने त्याच्या लाडक्या जीजीसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. या मालिकेत अज्या या मुख्य पात्राची ती आजी होती. त्यामुळे अज्याचं पात्र साकारणा-या नितीशच्या ती खूप जवळची होती. सेटवर त्या सगळ्यांच्याच लाडक्या होत्या. नितीशने पोस्ट करत लिहिलं, "जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता ग तुला, मला काय बोललेलीस प्रत्येक ठिकाणी मीच तुझी आज्जी असणार आणि तूच माझा नातू ,आपल्या दोघांना एकत्र खूप काम करायचं होतं ना मग का ग इतक्या लवकर सोडून गेलीस," अशा शब्दात अभिनेता नितीश चव्हाण याने त्याचं दु:ख व्यक्त केलं.

तब्बूने लग्न न करण्यामागील सांगितले कारण...

नितीश सोबतच मालिकेत शीतलीचं पात्र साकारणा-या शिबानी बावकर हिने "जिजे, जिवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहिल गं, भावपुर्ण श्रद्धांजली." अशा शब्दात कमल ठोके यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तर अभिनेता किरण गायकवाडने, "जिजे, छबुडे, कमळे, का? खुप मोठी पोकळी केलीस "असं म्हणत दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्री कमल ठोके या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली पण त्यांचा ओढा अभिनयाच्या दिशेने होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच त्यांनी 'बाबा लगीन', 'बरड', 'माहेरचा आहेर', 'सख्खा भाऊ पक्का वैरी', 'आम्ही असू लाडके' यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, त्यांना घराघरात ओळख मिळाली ती या मालिकेतील जीजी या पात्रामुळे त्यांच्या जाण्याने चाहत्यांमध्ये दुःखाच वातावरण आहे.

Title: Emotional post of Ajya after the death of actress Kamal
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे