शिरुर तालुक्यात शेतकऱ्याच्या ऊसाला भीषण आग

ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे ग्रामस्थांनी वाचविला ऊस

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जखनाई मळा येथे २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आदित्य भंडारे या शेतकऱ्याच्या १५ ते २० एकर उसाच्या फडाला अचानक पणे आग लागली असताना ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे ग्रामस्थ व नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले आहे.

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जखनाई मळा येथे २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आदित्य भंडारे या शेतकऱ्याच्या १५ ते २० एकर उसाच्या फडाला अचानक पणे आग लागली असताना ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे ग्रामस्थ व नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यात यश आले आहे.

शिरुर तालुक्यात खंडणी प्रकरणी अकरा जणांवर गुन्हे दाखल

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जखनाई मळा येथे आदित्य मच्छिंद्र भंडारे या शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेतातील विजेच्या तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली. याबाबतची माहिती मिळताच पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील ग्रामस्थांना संदेश दिला आणि शेतकऱ्याच्या मदतीला येण्याचे आवाहन केले.

प्रकाश आंबेडकरांबाबत आक्षेपार्य पोस्ट करणारा अखेर अटक

यावेळी दादा शिवले, जालिंदर भंडारे, शिवाजी शिवले, अविनाश शिवले, गणेश भंडारे, ज्ञानेश्वर शिवले, प्रकाश शिवले, सुरज भंडारे, यांसह आजूबाजूचे शंभर हून अधिक शेतकरी व ग्रामस्थ धावून आले आणि त्यांनी माती व पाण्याच्या सहाय्याने उसाला लागलेली आग विजविली. मात्र, यावेळी लागलेल्या आगीमध्ये एक एकर ऊस जळाला असुन सुमारे ३० ते ४० एकर ऊस शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचला आहे. मात्र, लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचे काही प्रमाणात नुकसान झालेले असुन परिसरामध्ये शेतामध्ये लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा हटवून दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थ करत आहे, तर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेल्या सर्व ग्रामस्थांचे देखील पोलीस पाटील जयसिंग भंडारे व शेतकरी आदित्य भंडारे यांनी आभार मानले आहे.

Title: Farmer s sugarcane fire in Shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे