अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या चौघांना अटक
खोडद (ता. जुन्नर) येथील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ४ जणांना अटक केली असुन आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमा अन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.नारायणगाव: खोडद (ता. जुन्नर) येथील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ४ जणांना अटक केली असुन आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमा अन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
या प्रकरणी शुभम प्रकाश गाडेकर (वय २१), प्रकाश विठोबा गाडेकर (वय ५६), रोहिदास विठोबा गाडेकर (वय ५० सर्व रा. माळवाडी, खोडद, ता. जुन्नर), प्रवीण लक्ष्मण वाघ (वय १८) रा.ओझर, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक यांना अटक केली असुन आरोपींना जुन्नर न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली. आरोपी शुभम गाडेकर आणि प्रवीण वाघ यांची या मुलींशी ओळख होती. ते सध्या मोखाडा (जि. पालघर) येथे वास्तव्यास होते. शुभम गाडेकर याचे वडील प्रकाश गाडेकर आणि चुलते रोहिदास गाडेकर यांनी दोन्ही मुलींना १६ नोव्हेंबर २०२० रोजी आळेफाटा (ता. जुन्नर) येथून ST बसमध्ये बसवून मोखाडा येथे पाठवून दिले. त्यानंतर या मुली शुभम गाडेकर आणि प्रवीण वाघ यांचे समवेत वास्तव्यास होत्या. मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
ई-हक्क प्रणालीचा वापर करुन घरबसल्या करा वारसनोंदी
सदर मुली कोठे गेल्या याबाबत खात्रीशीर माहिती नसताना गुंड यांनी गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करुन पोलीस पथक पालघर येथे तपासासाठी पाठवले होते. नारायणगाव पोलिसांनी मोखाडा येथील दुर्गम भागातून मुलींसह आरोपी वाघ आणि शुभम गाडेकर यांना ताब्यात घेतले. दोन्ही मुलींना पालकांच्या ताब्यात दिले आहे. तपासात मुलींना पळवून नेण्यास प्रकाश गाडेकर आणि रोहिदास गाडेकर या दोन भावांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. यावरुन चारही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली. गुंड म्हणाले, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढत आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, पाठलाग करणे, विनयभंग करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामध्ये भा. द. वि. कलम ३५४(अ) (ड) सह कलम ८,१२ पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यात आरोपीला पाच ते दहा वर्षे शिक्षा होऊ शकते.