Video: भाज्या सॅनिटाइझर करण्यासाठी इंडियन जुगाड

कोरोनाच्या काळात आपण हातांप्रमाणे वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतो. मात्र, फळं-भाज्यांसाठी हे सॅनिटायझर वापरू शकत नाही. त्यामुळे आपण गरम पाण्यात भाज्या धुवून घेतो. मात्र, यावरही एका व्यक्तीने जुगाड शोधून काढले आहे.

मुंबई : कोरोनाव्हायरसच्या काळात कोणतीही वस्तू स्वच्छ करण्याची प्रत्येकाला सवय झाली आहे. भाज्यापण स्वच्छ करून घेतल्या जातात. पण, भाज्या सॅनिटाइझर करण्यासाठी इंडियन जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोरोनाच्या काळात आपण हातांप्रमाणे वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करतो. मात्र, फळं-भाज्यांसाठी हे सॅनिटायझर वापरू शकत नाही. त्यामुळे आपण गरम पाण्यात भाज्या धुवून घेतो. मात्र, यावरही एका व्यक्तीने जुगाड शोधून काढले आहे. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्वीटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, प्रेशर कुकरच्या शिट्टीवर एक रबरी पाइप लावला आहे. पाइपचे दुसरे टोक संबंधित व्यक्तीच्या हातात आहे. त्यांनी ताटात भाज्या आणि फळे ठेवली आहेत. कुकरची शिट्टी सुरू झाल्यानंतरत्यातून निघणारी वाफ ही फळे आणि भाज्यांवर सोडते. यामुळे भाज्या निर्जंतुक होत असल्याचा दावा केला जात आहे. पण, 'भाज्या निर्जंतुक करण्यासाठी मस्त इंडियन जुगाड आहे. ही पद्धत किती प्रभावी ठरेल हे मी सांगू शकत नाही. मात्र भारत खरंच अद्भूत आहे", असे ट्वीट साहू यांनी केले आहे.

दरम्यान, संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. काही जणांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. तर काही जणांनी कुकरच्या वाफेने अशा भाज्या अशा सॅनिटाइझ करणे धोक्याचं ठरू शकते, गंभीर दुखापत होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय, काही जणांनी ही पद्धत व्हायरसचा नाश करण्यासाठी पुरेशी नाही, असेही म्हटले आहे.

Title: great indian jugaad to sterilise vegetables video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे