निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा प्रचार जोरात
शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात मोठ्या जोशात प्रचार सुरु आहे. यामध्ये करंदी गावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगलेल्या वार्ड ४ मधील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार सर्वाधिक प्रगतीने सुरु आहे.करंदी: शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात मोठ्या जोशात प्रचार सुरु आहे. यामध्ये करंदी गावच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगलेल्या वार्ड ४ मधील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार सर्वाधिक प्रगतीने सुरु आहे. वार्डमधील प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलची मोर्चेबांधणी सुरु आहे. गावच्या राजकारणाला आणि विकासाला नेहमीच दिशा देणारा वार्ड क्रमांक ४ म्हणुन या वार्डची ओळख आहे. तर या पॅनेलमधुन सुशिक्षित आणि युवा वर्गाला प्राधान्य देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत मतमोजणी प्रत्येक गावातच मतदान केंद्रावर करा
सर्वसाधारण जागेतुन युवकांमध्ये प्रचंड लोकप्रियता असलेले बबन उर्फ बबलू सोमनाथ ढोकले, नागरिकांचा मागास प्रवर्गातुन वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारे पांडुरंग आनंदराव ढोकले तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातुन गावच्या विकासासाठी आणि अवैध धंदे पुर्णपणे बंद करण्याचे ध्येय बाळगलेल्या सुनिता कैलास ढोकले हे तीनही उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या तिनही उमेदवारांना गावगड्याचा राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत जवळचा अनुभव आहे. त्यामुळे या पॅनेलचे तीनही उमेदवार प्रचंड मतांनी निवडुन येतील, अशी खात्री उमेदवार बबन उर्फ बबलू ढोकले यांनी व्यक्त केली आहे.
दोन अपक्ष उमेदवारांनी दर्शविला ग्रामविकास पॅनलला जाहीर पाठींबा
जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी केवळ वार्ड चारचाच नव्हे तर संपुर्ण गावचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रश्नावर काम करणार असल्याचा मानस ठेवला आहे. चासकमान धरणाचे पाणी पोटचाऱ्यांना मिळवण्यासाठी होणारी फरफट त्याचबरोबर विजेचा लपंडाव यावर तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार तर अंतर्गत रस्ते, पथदिवे, शासनाच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत या तीनही उमेदवारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत हे तीनही उमेदवार विजयश्री खेचून आणतील अशी शक्यता मतदारांनी वर्तवली आहे.