शिरुर तालुक्यात भाजपाकडून वीज बिलांची होळी

शिक्रापुरात पुणे नगर महामार्गावर मोर्चा काढत आंदोलन

जोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा देखील शेळके यांनी दिला आहे. कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत असलेल्या अडचणी व विज बिल यासंदर्भातील सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध व्यक्त केला आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भारतीय जनता पार्टीने वीज दरवाढ विरोधात महाविकास सरकारचा निषेध व्यक्त करत पुणे नगर महामार्गावरुन मोर्चा काढून येथील महावितरण कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी शिरुर व भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करत विज बिलांची होळी करुन हे आंदोलन करण्यात आले.

शिक्रापूरात दुचाक्या चोरणारा दुचाकीसह अटक

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संतोष करपे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, पंढरीनाथ गायकवाड, कैलासराव सोनवणे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, बाबासाहेब दरेकर, संदिपअण्णा ढमढेरे, नितीन गव्हाणे, रवींद्र दोरगे, चंद्रशेखर दरवडे, विद्याधर दरेकर, सुरज चव्हाण, अंबादास कुरंदळे, अशोकराव हरगुडे, संग्राम ढोकले, अविनाश देवकर, कमलाकर कुलकर्णी, अरुण बेंडभर, केशव पाचर्णे, वैभव गवारे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाआघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत सामान्य माणसांना दिलासा देण्याचे काम झोपलेल्या महाआघाडी सरकारने काम करावे, अशी मागणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ यांनी केली, तर माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त केली.

शिरुर तालुक्यात शेतकऱ्याच्या ऊसाला भीषण आग

जोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा देखील शेळके यांनी दिला आहे. कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत असलेल्या अडचणी व विज बिल यासंदर्भातील सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध व्यक्त केला आहे. आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनामुळे शिक्रापूर येथे परिसर दुमदुमून गेला होता. सदर आंदोलनाचे प्रास्ताविक सरचिटणीस गोरक्ष काळे यांनी केले तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य पंडित संभाजीअण्णा भुजबळ यांनी आभार मानले.

Title: Holi of electricity bills from BJP in Shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे