शिरुर तालुक्यातुन शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
सर्वत्र राजकीय पक्षांमध्ये प्रवेश होत असताना कोरेगाव भीमा व पेरणे फाटा परिसरातील शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला असल्याने शिरुर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे.शिक्रापूर: सर्वत्र राजकीय पक्षांमध्ये प्रवेश होत असताना कोरेगाव भीमा व पेरणे फाटा परिसरातील शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला असल्याने शिरुर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे.
शिरुर तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांसोबत बालदिन साजरा
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाबू वागस्कर, प्रदेश उपाध्यक्ष रणजीत शितोळे, जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला होता.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम बँकेत जमा
यावेळी ज्ञानेश्वर आबा वाळके यांच्या सह नागेश मोकळे, चेतन सोनवणे, हेमंत माने, सोनू शिंदे, निखील भालेराव, आमीन शेख, प्रज्वल रणपिसे, सुरज बडे, वैभव वरपे, शुभम काकडे, राहुल सराटे, गणेश काळेवार, अतुल भोगावडे, मंगेश वाळके, सुधाकर वाळके, अक्षय राजगिरे यांसह कोरेगाव भीमा व पेरणे फाटा परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला असुन सर्वांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे, तर यावेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक युवक प्रवेश करण्यास इच्छुक असून लवकरच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांनी सांगितले.