तब्बल एवढ्या गाड्यांची जाळपोळ तर...

नव्या वर्षातही गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्याच्या घटना थांबवण्याचं नाव घेत नाहीत. १ जानेवारीनंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड परिसरात थरारक करणारी घटना समोर आली आहे. सर्व झोपेत असताना एका तरुणानं सोसायटीत पार्क असलेल्या गाड्यांना आग लावल्याची घटना घडली.

पिंपरी-चिंचवड: नव्या वर्षातही गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्याच्या घटना थांबवण्याचं नाव घेत नाहीत. १ जानेवारीनंतर पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड परिसरात थरारक करणारी घटना समोर आली आहे. सर्व झोपेत असताना एका तरुणानं सोसायटीत पार्क असलेल्या गाड्यांना आग लावल्याची घटना घडली. या धक्कादायक घटनेचा CCTV व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ कदाचित मन विचलित करु शकतो. मात्र, या घटनेत तरुणाची विकृत मानसिकता किती असू शकते ते हा व्हिडीओ पाहून समजू शकतं.

संग्राम घोडेकर यांच्या मुख्य मारकऱ्यांना अवघ्या तीन दिवसांत अटक

Image may contain: text that says

पिंपरी चिंचवडमध्ये ओम गणेश सोसायटीमध्ये सर्व झोपलेले असताना रात्री उशिरा एक तरुण सोसायटीमध्ये शिरला त्यानं तिथे पार्क केलेल्या गाड्यांना आग लावली आणि पळ काढला. यामध्ये आगीत गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास १० गाड्या जळून गेल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. गाड्यांना आग लावणारा तरुण सोसायटीला असलेल्या CCTV कॅमेऱ्यात हे कृत्य करताना कैद झाल्यानं खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर पोलीस निरीक्षकांविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

Image may contain: text that says

आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून तरुणाने या गाड्या जाळल्या आहेत. या प्रकरणी CCTV च्या आधारे पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असुन त्याचा तपास सुरु आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारीला उद्योगनगरीत गुन्हेगारांनी गाड्यांची तोडफोड केली होती. तर मागच्या वर्षी २०२० मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल असलेल्या आकडेवारी नुसार मागील वर्षभरात गुंडांनी केलेल्या तोडफोडीत सुमारे ३४८ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तर ओम गणेश सोसायटीमध्ये घडलेल्या प्रकरणात आरोपीविरोधात पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे

Title: If so many vehicles are set on fire
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे