काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

नागपुरातून सरकार चालत नाही, मागितला तरच सल्ला देतो : मोहन भागवत

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांना सडेतोड शब्दात उत्तर दिलं आहे. नागपुरातून देशाचं सरकार चालत नाही, असं त्यांनी राजधानी दिल्लीतील कार्यक्रमात सांगितलं. मागितला तरच आरएसएसकडून सल्ला दिला जातो, असंही मोहन भागवत म्हणाले. ‘भविष्यातील भारत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. “हा जो अंदाज लावला जातो, की नागपुरातून फोन जातो. सल्ला दिला जातो की कुणी काय करायचं? हे सर्व खोटं आहे. त्यांना सल्ला हवा असेल, तरच सल्ला दिला जातो”, असं मोहन भागवत म्हणाले.  

आणखी >>

'लालबागचा राजा'च्या चरणी पाच दिवसात कोट्यवधींचं दान

मुंबई : 'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. 'लालबागचा राजा'च्या चरणी भक्तांनी पाच दिवसात कोट्यवधींचं दान जमा केलं आहे. फक्त मुंबईच नव्हे तर अगदी परदेशी पाहुणेही 'लालबागचा राजा'चा थाट बघण्यासाठी गर्दी करतात. अवघ्या पाच दिवसात 'लालबागचा राजा'च्या चरणी दोन कोटी 64 लाखांचं दान जमा झालं आहे. एका भक्ताने राजाला एक किलो 271 ग्रॅमची हिरेजडीत सोन्याची मूर्ती अर्पण केली आहे. महत्वाचं म्हणजे अजूनही मोजदाद बाकी आहे. खजिनदार मंगेश दळवी यांनी ही माहिती दिली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कालच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं होतं. तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही सपत्नीक आज सकाळी दर्शनाला आला होता. याशिवाय राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही बाप्पा चरणी लीन झाले. तसंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. मुंबईतील लालबाग परिसरात 'लालबागचा राजा'चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रिघ लागते. गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हेतू साध्य करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलिस ठाण्यात चार दिवसात तब्बल

आणखी >>

केंद्र सरकारकडून तीन सरकारी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँका, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचं विलीनीकरण करण्याची घोषणा केली. या विलीनीकरणानंतर देशातील तिसरी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल. हे विलीनीकरण कर्ज देण्याची क्षमता वाढवणे तसेच, आर्थिक विकास दर वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. गेल्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाचं पाच सहकारी बँकांसोबत विलीनीकरण झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी बँक निर्माण झाली होती. यासोबतच महिलांसाठी असलेल्या भारतीय महिला बँकेचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. या निर्णयामुळे बँका आणखी मजबूत होतील, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विलीनीकरणाची घोषणा करताना सांगितलं. अनेक बँका सध्या नाजूक स्थितीत आहेत. याचं कारण म्हणजे अतिरिक्त कर्ज आणि बुडित कर्ज (एनपीए) यामध्ये झालेली वाढ. विलीनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या युनिट्सकडून कामकाज वाढवलं जाईल, असं अरुण जेटलींनी सांगितलं. एसबीआयच्या विलीनीकरणाप्रमाणेच या बँकांच्या विलीनीकरणानंतरही कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असाही दावा सरकारकडून करण्यात आला आहे. तीनही बँकांचे संचालकीय मंडळं विलीनीकरणाच्या प्रस्तावावर विचार करणार आहेत, अशी माहिती वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विलीनीकरणामुळे कामकाज आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधेत चांगला बदल होईल, असं त्यांनी सांगितलं. देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचं वित्तीय समर्थन निश्चित केलं जाईल. नेटवर्क, कमी खर्च आणि अनुदानाच्या बाबतीत उत्तमरितीने ताळमेळ साधला जाईल. कर्मचाऱ्यांचं हित आणि ब्रँड इक्विटी संरक्षण केलं जाईल. विलीनीकरणानंतरही या बँका स्वतंत्रपणे काम करत राहतील, असं राजीव  कुमार म्हणाले.

आणखी >>

सांगलीतील अवैध गर्भपात प्रकरण : चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द

सांगली : सांगली येथे चौगुले हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचे सांगून डॉ. रूपाली चौगुले यांना अटक करण्यात आली आहे. तर डॉ. विजय चौगुले यांच्या अटकेची कारवाई चालू असून लवकरच त्यांनाही अटक होईल, असे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी सांगितले. या प्रकरणामध्ये कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेवून सदर प्रकरण न्यायालयात सक्षमपणे मांडले जावे, यासाठी दक्षता घ्यावी असे सांगून चौगुले दाम्पत्य हे शासकीय सेवेत कार्यरत असल्याने त्यांच्यावरील विभागीय चौकशीसाठीचाही प्रस्ताव महापालिकेने त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. तसेच, डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजय चौगुले यांची सनद रद्द करण्यासाठी मेडिकल कॉऊन्सिलला प्रस्ताव पाठविण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये झालेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील डॉ. रुपाली चौगुले व डॉ. विजय चौगुले हे दोन्ही शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावरील कारवाईसाठी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाने या प्रकरणाची गांर्भियाने दखल घेतली असून आरोग्य विभागाकडून याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिली. लिंग निदान चाचणी करुन स्त्री गर्भपातासाठी शस्त्रक्रिया झाल्याचे अद्याप निष्पन्न झाले नाही, त्या दृष्टीनेही तपास चालू आहे, असे तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले असून, कारवाईत मिळालेल्या साहित्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे. या प्रकरणाशी संबधित असलेल्या प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. काय आहे प्रकरण? सांगली शहरात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यात हॉस्पिटलमधून संशयास्पद कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही हॉस्पिटलमध्ये सापडल्या आहेत. तसेच, हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे आतापर्यत समोर आलेले आहे. आणखी किती अवैध गर्भपात करण्यात आले आहेत याचा तपास सुरू असून या प्रकरणी डॉक्टरांसह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हे दाखलन करण्यात आले असून स्वप्नील जमदाडे, विजयकुमार चौगुले, रुपाली चौगुले अशी डॉक्टरांची नावे आहेत. दरम्यान हॉस्पिटलची तपासणी सुरु झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या पोलिसांनी याठिकाणचे औषधे व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता तपास सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता आणि पुन्हा एक वर्षानंतर सांगलीमध्ये अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आणखी >>

अनैतिक संबंध लपवण्यासाठी सख्ख्या भावाची हत्या

सांगली : तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावात अनैतिक संबंध लपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने सख्ख्या बहिणीनेच आपल्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश बाळासो झांबरे (वय 30 वर्षे) याचा तरुणाचा मृतदेह 10 दिवसांपूर्वी डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावर सापडला होता. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. या हत्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी डोंगरसोनी गावात राहणाऱ्या सुधाकर झांबरे (वय 38 वर्षे) आणि वडगावात राहणाऱ्या सारिका पाटील (वय 32 वर्षे) या प्रेमी युगुलास अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी सारिका पाटील आणि सुधाकर झांबरे यांच्यात अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण सारिकाचा भाऊ रमेश झांबरेला लागली होती. या कारणावरुन दोघांत वादावादी झाली होती. याबाबत रमेशने सारिकाला समजही दिली होती. आपल्या प्रेमसंबंधात भावाचा अडथळा होऊ नये व इतरांना याचा सुगावा लागू नये म्हणून सारिका आणि तिचा प्रियकर सुधाकरने रमेशच्या हत्येचा कट रचला. हत्येच्या दोन दिवस अगोदर सुधाकर झांबरे रमेशला घेऊन जेवणासाठी धाब्यावर गेला होता. रमेशला दारु पाजली व परत जाताना डोक्यात जड वस्तूचा घाव घातला. डोक्यावर जोरदार घाव बसल्याने रमेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मृतदेह डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावरच टाकून सुधाकर झांबरे याने पळ काढला होता. हत्येनंतर दोन दिवसांनी रोजी रमेश झांबरे याचा मृतदेह सापडला होता.

आणखी >>

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान : मोहन भागवत

नवी दिल्ली : ''काँग्रेसचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं. काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले,'' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केलं. दिल्लीत संघाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय अधिवेशनात ते बोलत होते. ‘भविष्य का भारत : RSS दृष्टिकोन’ नावाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्याबाबत उपस्थितांना विस्ताराने माहिती दिली. संघाचं कार्य अद्वितीय असल्याचं ते म्हणाले. “लोक संघाला समजू शकत नाहीत ''आपण तिरंग्याचा सन्मान करतो, देशासाठी जगलं पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहिल. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवतं. संघाला लोक समजू शकत नाहीत. कारण संघ अनोखा आहे. सत्तेत कोण आहे, याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. फक्त आम्ही कार्य पार पाडतो,'' असं मोहन भागवत म्हणाले. “आमच्याशी सहमत होण्यासाठी कुणावर दबाव नाही ''संघ सर्वात मोठी लोकशाही संघटना आहे, जिथे लोकशाहीचं पालन केलं जातं. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे. आमच्याशी सहमत होण्यासाठी आम्ही कुणावर जबरदस्ती करत नाही. आम्ही योग्य असू तर लोक स्वत:हून सहमत होतील. विविधतेवरून भेदभाव केला जाऊ नये. विविधतेचा आनंद साजरा केला पाहिजे,'' असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, अभिनेते रवी किशन, अन्नू कपूर यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश होता.

आणखी >>

आजोबा म्हणून वावरणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीकडून चिमुकलीसोबत अश्लील चाळे

नागपूर : लहान मुलींच्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कुटुंबाचा अत्यंत विश्वासू आणि मुलीचा तथाकथित आजोबा या नात्याने वावरणाऱ्या एका 50 वर्षीय इसमाने सहा वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे करत असतानाचं कृत्य एका दक्ष महिलेने चित्रित केलं. ती चित्रफीत पोलिसांकडे पाठवली आणि चित्रीकरण पाहिल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांना संपर्क करत सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या चिमुकलीचे आई-वडील दोघेही कामानिमित्ताने दिवसभर घराबाहेर राहायचे. त्यामुळे ही चिमुकली शाळेतून घरी आल्यावर कधी-कधी तिच्या कुटुंबाच्या अत्यंत विश्वासातला आणि नेहमीच घरी ये जा करणारा 50 वर्षीय रमेश भिवगडे नावाचा इसम सातत्याने तिच्यासोबत खेळायचा. तो पीडित मुलीच्या वडिलांच्या लहानपणापासूनच घरी येत असल्याने पीडित मुलीच्या पालकांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि तो नेहमीच चिमुकलीला खेळवायचा. मात्र, तिच्या पालकांच्या अनुपस्थितीत रमेश भिवगडे तिला घराच्या गच्चीवर नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा प्रकार जवळच्या इमारतीत राहणाऱ्या एका दक्ष महिलेच्या लक्षात आला. आजोबा या नात्याने ही व्यक्ती लहान मुलीसोबत नको ती चाळे करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने सर्व प्रकार चित्रीत करत तो पुरावा म्हणून पोलिसांना दिला आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला तर पीडित मुलीच्या पालकांना अनेक वर्षांपासून घरी येणारा रमेश असं कृत्य करू शकतो यावर विश्वास बसला नाही. मात्र जेव्हा पोलिसांनी पालकांना पुरावे दाखविले, त्यांनतर त्यांना धक्काच बसला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश भिवगडेवर लहान मुलांचा लैंगिक छळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ अटक केली आहे.

आणखी >>

बिल न भरल्यामुळे रुग्णाची अडवणूक करणं आता गुन्हा ठरणार!

मुंबई : डिस्चार्ज घेताना बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनेक रुग्णांची अडवणूक झाल्याचं आपण पाहतो. एवढंच नाही, तर पैसे न भरल्यास मृतदेह सोडण्यासही रुग्णालये नकार देतात. पण आता बिलाचे पैसे न भरल्याने रुग्णाला डिस्चार्ज न देणं किंवा रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देणं, हे गुन्हा ठरणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चार्टर्स ऑफ पेशंट राईट्स आराखडा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तयार केलेला पेशंट चार्टरचा हा आराखडा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. रुग्णांना कोणकोणते अधिकार आहेत, त्याबाबत सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

आणखी >>

तरुणीला फोटोंवरुन ब्लॅकमेल, पुण्यात आरोपीला बेड्या

पुणे : सोशल मीडियावर मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे. 'टिंडर' या डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला ब्लॅकमेल करत 36 हजार रुपये उकळल्याचं समोर आलं आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 19 वर्षीय तक्रारदार तरुणीची आरोपीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवून आरोपी तरुणाने तिचे फोटो घेतले. मात्र हे फोटो वायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्याकडे पैशांची मागणी करायला सुरुवात केली. 29 वर्षीय सुबोजित अभिजीत दासगुप्ता नागपुरातील संदेश सिटीमध्ये राहतो. तर तक्रारदार तरुणी पुणे शहरात इंटिरिअर डिझाईनिंगचं शिक्षण घेते. सुरुवातीला सुबोजितने तिच्याकडून 36 हजार रुपये उकळले. यानंतरही तो सातत्याने तिच्याकडे पैशांची मागणी करु लागला. यामुळे वैतागलेल्या तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आणखी >>

महाआघाडीसाठी चार पावले मागे येण्यास तयार : अखिलेश यादव

लखनऊ : 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात महाआघाडीची चर्चा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशेचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाआघाडीसाठी सकारात्मक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या महाआघाडीत सपा, बसपा, काँग्रेस आणि आरएलडी असतील, असे चार पक्ष असण्याची शक्यता असून, हे चार पक्ष मिळून उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर देण्याची शक्यता आहे. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून महाआघाडीतील पक्षांची चर्चा जागावाटपावरुनच फिस्कटते आहे, असे बोलले जाते होते. आता मात्र मायावतींनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी म्हटले की, महाआघाडी तेव्हाच बनेल, जेव्हा बसपाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र महाआघाडी होण्याच्या दृष्टीने सकारात्मक विधान केले आहे. ते म्हणाले, महाआघाडीच उत्तर प्रदेशात भाजपला रोखू शकते. त्यामुळे भले आम्हाला दोन-चार पावलं मागे यावं लागलं तरी चालेल. अखिलेश पुढे म्हणाले, “काँग्रेसनेही मोठं मन दाखवावं, असे आम्ही आवाहन करतो. कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. पंतप्रधानपदासाठी उमेदवाराचा मुद्दा सध्या नाही. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर ते ठरवलं जाईल. या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मोठी असेल. तेच भाजपचा सामना करु शकतील.” 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्रपक्षांना 73 जागा मिळाल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला 325, सपा-काँग्रेसला 54 आणि बसपाला 19 जागा मिळाल्या होत्या.

आणखी >>

'इस्रो'कडून दोन ब्रिटीश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने रविवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरुन सॅटेलाईट कॅरियर 'पोलर सॅटेलाईट लाँच व्हेहिकल' (पीएसएलव्ही) सी 42 च्या मदतीने दोन ब्रिटीश उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. हे उपग्रह पृथ्वीवरील घडामोडींवर लक्ष ठेवतील. या उपगृहांचं नाव NovaSAR आणि S1-4 असं आहे. ब्रिटनमधील सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या या उपगृहांचं वजन 889 किलो आहे. भारत जागतिक अंतराळ क्षेत्रात 300 बिलियन डॉलरपेक्षा जास्त भागीदारीसह अव्वल देश बनला आहे. गेल्या काही काळात सर्वात कमी खर्चात उपग्रह पाठवण्याचं काम 'इस्रो'कडून केलं जात आहे. पीएसएलव्ही सी 42 ही अशी पहिली उड्डाण होती, जी पूर्णपणे व्यावसायिक स्वरुपाची होती. या उपग्रहांच्या माध्यमातून फॉरेस्ट मॅपिंग, जमीन वापर, बर्फ आच्छादनावर लक्ष ठेवणे, पूर आणि नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवणे अशी उद्दीष्ट साध्य करता येणार आहेत.  

आणखी >>

हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन

पुणे : हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं पुण्यातल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने भारतीय कुस्तीवर शोककळा पसरली आहे. वयोमानामुळे गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेलं जायचं. मात्र आज अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. कोल्हापूरला उद्या त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि अंत्यसंस्कार होतील. गणपतराव आंदळकर यांचा अल्पपरिचय शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव आंदळकर 1950 मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले. त्याचमुळे कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. 1964 साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं. आंदळकर यांनी 1960 मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. 1962 मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाईलमध्ये सुवर्णपदक, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक पटकावलं. 1964 मध्ये टोकिओ ऑलि​पिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचं नेतृत्व आंदळकर यांनी केलं. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल 1982 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवलं. आंदळकर यांनी कधीही लाल मातीची संगत सोडली नाही. 1967 पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जो​शीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद​ विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या मल्लांच्या नावांवरुनच त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येते. 1982 साली आंदळकरांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

आणखी >>

निवेदन देण्यासाठी पाचोऱ्यात मराठा मोर्चाने पवारांचा ताफा अडवला

जळगाव : मराठा क्रांती मोर्चाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवून मराठा आरक्षणाबाबतचं निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्यासाठी काही जण रस्त्यावर येताच पवारांनी गाडी थांबविण्यास सांगितलं. निवदेन स्वीकारलं आणि ताफा पुढे निघून गेला. गाडी थांबवून निवेदन स्वीकारल्याबद्दल निवेदनकर्त्यांनी शरद पवार यांचे आभारही मानले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असं या निवेदनात म्हटलं आहे. काय आहे निवेदन? ''आपणास महाराष्ट्रातील तमाम जनता आदराचं स्थान देते. जेव्हा आपण दिल्लीचा तक्त राखण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा तमाम जनता आणि संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी उभा होता. आपण आणि आपल्या पक्षाने मराठा समाजावर जो सतत नेहमी अन्याय होत असतो त्या बाजूने उभे राहिले पाहिजे ही सार्थ अपेक्षा. आपण बहुजनांचे नेते आणि छत्रपतींचे वारस असल्यामुळे आपण जरी स्वतः च्या समाजाला झुकते माप देता येत नसले तरी शेतजमीनीवर अवलंबून असलेला समाज आता देशोधडीला लागला आहे. त्यामुळे आरक्षण ही मागणी खूप खूप महत्त्वाची आहे. आपण मध्यंतरीच्या काळात आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे असे विधान केले होते. पंरतु आपल्या बोलण्यात जरी सामान्य आणि आर्थिक दुर्बल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असा जरी असला तरी यावर पुन्हा कोणी तरी आयोगाचा अध्यक्ष होईल आणि वर्ष ना वर्ष ही मागणी तशीच खितपत पडेल. त्यामुळे जे आरक्षण आपणच दिले ते जैसे थे ठेवून लवकर लागू कसे होईल यासाठी प्रयत्न करा अशी आम्ही विनंती करतो. कारण, तमाम मराठा युवक आपल्याकडे अपेक्षेने बघतो आहे. आपण कोणतेही स्टेटमेंट केले तरी मराठा युवक खुप विचार करतो. आपणास जाणता राजाच्या भूमिकेत मराठा युवक बघतो,'' असं निवेदनाच्या शेवटी म्हटलं आहे.

आणखी >>

14 वर्षीय मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवून अश्लील चाळे, मुख्याध्यापकावर गुन्हा

पुणे : पुण्यात 14 वर्षीय विद्यार्थ्याला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील वानवडी परिसरातल्या एका शाळेतील मुख्याध्यापकानेच हे घृणास्पद कृत्य केले असून यात समुपदेशिकानेही मदत केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विन्सेट परेरा असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे, तर जॅकलिन वास असं महिला समुपदेशकाचं नाव आहे. हा सर्व प्रकार 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान शाळेतील मुख्याध्यापकाचे कार्यालय आणि रेस्टरुममध्ये घडला असल्याचं पीडित मुलाच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी मुख्याध्यापकाने पीडित विद्यार्थ्याला अश्लील व्हिडीओ दाखवून वेळोवेळी त्याच्याशी अश्लील चाळे केले. याबाबतची सर्व माहिती समुपदेशक महिलेलाही होती. मात्र, तिने याबाबत शाळा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता पीडित विद्यार्थ्याला याबाबत कुठेही वाच्यता न करण्याबाबत दम भरला. त्यामुळे पीडित विद्यार्थी हादरून गेला. सदर बाब विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी वानवडी पोलिसात तक्रार दिली असून यासंदर्भात मुख्याध्यापक आणि महिला समुवदेशकाविरोधात Protection of Children from Sexual Offences Act (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी >>

सांगली अवैध गर्भपात प्रकरण : 'ते' डॉक्टर शासकीय सेवेतही कार्यरत

सांगली : सांगलीतील चौगुले हॉस्पिटल येथील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात आणखी गंभीर माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील डॉक्टर रुपाली चौगुले आणि तिचे पती विजयकुमार चौगुले हे शासकीय आरोग्य सेवेत प्राथमिक आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते, असं समोर आलं आहे. या डॉक्टरांकडून आतापर्यंत एकूण नऊ गर्भपात झाल्याचं समोर आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत उद्यापासून  महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल तपासणीसाठी 10 पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून सात दिवसांच्या आत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. तसेच या गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झालेले डॉक्टर दाम्पत्य हे प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय डॉक्टर म्हणून सेवेत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वप्नील जगवीर जमदाडे, विजयकुमार शामराव चौगुले, रुपाली विजयकुमार चौगुले या तीन डॉक्टरांवर गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? सांगली शहरात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यात हॉस्पिटलमधून संशयास्पद  कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही हॉस्पिटलमध्ये सापडल्या आहेत. तसेच, हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे आतापर्यत समोर आलेले आहे. आणखी किती अवैध गर्भपात करण्यात आले आहेत याचा तपास सुरू असून या प्रकरणी डॉक्टरांसह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हे दाखलन करण्यात आले असून स्वप्नील जमदाडे, विजयकुमार चौगुले, रुपाली चौगुले अशी डॉक्टरांची नावे आहेत. दरम्यान हॉस्पिटलची तपासणी सुरु झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या  पोलिसांनी याठिकाणचे औषधे व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता तपास सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता आणि पुन्हा एक वर्षानंतर सांगलीमध्ये अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आणखी >>

मंत्री असल्याने फुकटात इंधन, दरवाढीचा फटका नाही : आठवले

जयपूर : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. मंत्री असल्यामुळे मला पेट्रोल-डिझेल फुकटात मिळतं, मंत्रिपद गेल्यावर इंधन दरवाढीचा फटका बसेल, असं रामदास आठवले म्हणाले. 'मंत्री असल्यामुळे मला इंधनभत्ता मिळतो. त्यामुळे इंधन दरवाढीची झळ मला बसलेली नाही. मात्र मंत्रिपद गेल्यावर मला पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांचा नक्कीच फटका बसेल' असं आठवले म्हणाले. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात सामाजिक न्याय विभागाचं मंत्रिपद भूषवत आहेत. जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. इंधन दरवाढीचा फटका तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात बसला आहे का, असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला होता. 'इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना त्रास होतो, हे मी समजू शकतो. दर कमी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यांनी करकपात केली, तर हे शक्य होईल. केंद्र सरकार या प्रश्नावर काम करत आहे' असंही आठवलेंनी सांगितलं.

आणखी >>

स्वतःच्याच मुलाला सेक्रेटरी करुन महापौर अमेरिका दौऱ्यावर

नागपूर : नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी महापौरांच्या एका जागतिक परिषदेला स्वतःच्या मुलाला नेल्याने वाद रंगला आहे. नंदा जिचकार यांनी मुलगा प्रियांशला महापौरांचा म्हणजेच स्वतःचाच पर्सनल सेक्रेटरी म्हणून नेल्याची माहिती आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी ( Global Covenant of Mayors for Climate & Energy) अशी परिषद पार पडली. या परिषदेत 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात जगभरातील महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. या परिषदेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करत नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केलं. मात्र परिषदेसाठी जाताना त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून आपला मुलगा प्रियांशची निवड केल्यामुळे वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे या परिषदेसाठी प्रियांशचा व्हिसा आणि इतर परवानग्या आयोजकांनी म्हणजेच ग्लोबल कोवेनंट ऑफ मेअर फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी यांनीच काढल्या आहेत. याशिवाय प्रियांशचा अमेरिकेला जाण्या-येण्याचा खर्चही त्यांनीच केला आहे. महापौर महापालिकेचं प्रतिनिधित्व करताना एखाद्या देशाचा दौरा करतात, तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला सेक्रेटरी म्हणून नेणं कितपत योग्य आहे, याबाबत आता नागपूर महानगरपालिकेत चर्चा सुरु झाली आहे.

आणखी >>

माझ्या मालमत्तेवर राजकीय द्वेषातून कारवाई : धनंजय मुंडे

बीड : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. यावर धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी खास बातचित करुन आपली भूमिका मांडली. धनंजय मुंडे काय म्हणाले? “संत जगमित्र सूतगिरणी संदर्भात 21 लोकांवर गुन्हा दाखल झाला, तेव्हा आम्ही 5 ते 6 कोटी रुपये बँकेत भरले. त्यानंतर बाकीचे पैसे भरण्यासाठी आम्ही सुतगिरणीची 22 एकर अतिरिक्त जमीन विकण्याची परवानगी मागितली. तसा अहवाल आम्ही सरकारला 2 ते 3 वर्ष झाले पाठवला आहे, मात्र आम्हाला ही जमीन विकण्याची परवानगी दिली नाही. एकीकडे जमीन विकायला परवानगी आम्हाला दिली जात नाही आणि दुसरीकडे आमच्यावर केसेस करुन आमच्या संपत्तीवर निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.”, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. “बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यामध्ये 126 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 103 लोकांवर सध्या  कारवाई चालू आहे. मात्र पोलिस अधीक्षकांनी संत जगमित्र सूतगिरणी कर्ज प्रकरणात सर्व संचालकांची नाव घेण्याऐवजी फक्त सातच संचालकांची नाव घेतली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल गृहविभागाकडे पाठवला आणि मुख्यमंत्र्यांनी त्या अहवालावर स्वाक्षरी केली. त्यानंतर पोलिसांनी फक्त सात लोकांचा कारवाई अहवाल कोर्टात सादर केला. खरंतर अगोदर त्या 103 लोकांवर कारवाई होणं आवश्यक होतं.”, असेही धनंजय मुंडे म्हणाले. ज्या लोकांनी बीडची जिल्हा बँक पूर्ण बुडवली, ते राजाभाऊ मुंडे आज सत्तेमध्ये आहेत. तर सुभाष सारडा यांचा मुलगा याच बँकेचा अध्यक्ष आहे. निव्वळ माझी अडवणूक करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला. धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “आमच्या प्रस्तावानंतर राज्यात इतर आठ सूतगिरण्या आणि 16 कारखान्यांना जमीन विकण्याची परवानगी दिली आहे आणि आमच्यावर कारवाई करण्यात येत आहे.” “1999 ला सूतगिरणीला कर्ज देण्यात आलं, तेव्हा मी संचालक नव्हतो. 2006 मध्ये मी संचालक झालो, त्यानंतर आम्ही 11 कोटी रुपयांचं व्याज बँकेत भरलं. या सर्व प्रकरणात सरकार आम्हाला नैसर्गिक न्याय न देता जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं म्हणणं कोर्टाने ऐकूण घ्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा.”, अशी मागणी धनंजय मुंडे  यांनी केलीय. काय आहे प्रकरण?

आणखी >>

अवैध गर्भपात प्रकरण : तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल, हॉस्पिटल सील

सांगली : अवैध गर्भपात प्रकरणी सांगलीतील चौगुले हॉस्पिटल सील करण्यात आले असून, तीन डॉक्टरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने छापा टाकून हे प्रकरण उघडकीस आणलं. चौगुले हॉस्पिटलमध्ये या छाप्यात संशयास्पद कागदपत्रे आणि औषधेही जप्त करण्यात आली असून, गर्भपाताची सामग्री सुद्धा सापडली आहेत. गर्भपाताचे किट आणि दारुच्या बाटल्याही सापडल्या. स्वप्नील जगवीर जमदाडे, विजयकुमार शामराव चौगुले, रुपाली विजयकुमार चौगुले या तीन डॉक्टरांवर गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काय आहे प्रकरण? सांगली शहरात अवैध गर्भपात सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सांगली महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मिळून संयुक्तरीत्या चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकत हा प्रकार उजेडात आणला आहे. गेल्या एक वर्षांपासून विनापरवाना गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. यात हॉस्पिटलमधून संशयास्पद  कागदपत्रे आणि औषधे आढळून आली आहेत. त्याचबरोबर या छाप्यामध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि दारूच्या बाटल्या ही हॉस्पिटलमध्ये सापडल्या आहेत. तसेच, हॉस्पिटलच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ठिकाणी सहा गर्भपात केल्याचे आतापर्यत समोर आलेले आहे. आणखी किती अवैध गर्भपात करण्यात आले आहेत याचा तपास सुरू असून या प्रकरणी डॉक्टरासह तिघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्भपात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिघांवर गुन्हे दाखलन करण्यात आले असून स्वप्नील जमदाडे, विजयकुमार चौगुले, रुपाली चौगुले अशी डॉक्टरांची नावे आहेत. दरम्यान हॉस्पिटलची तपासणी सुरु झाल्यानंतर हॉस्पिटलकडून काही औषधपत्रे जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या  पोलिसांनी याठिकाणचे औषधे व रोख रक्कम जप्त केली आहे. तर या हॉस्पिटलमध्ये आणखी बेकायदेशीर गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत आता तपास सुरु करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हैसाळ येतील गर्भपातामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक हादरुन गेला होता आणि पुन्हा एक वर्षानंतर सांगलीमध्ये अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आणखी >>

राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरुन डॉ. संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून, या पदावर आता संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   या अधिकाऱ्यांच्या बदल्या :   डॉ. कविता गुप्ता आता - व्यवस्थापकीय संचालक, SICOM, मुंबई   संजय सेठी आधी – सीईओ, महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण, मुंबई आता – अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई   डॉ. के. एच. गोविंदा राज आधी – व्यवस्थापकीय संचालक, SICOM, मुंबई आता -  आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई   डॉ. संजय मुखर्जी आधी- अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई आता – सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई   अनुप कुमार यादव आता – आयुक्त, कुटुंब कल्याण आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई   परिमल सिंह आधी – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्या एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई आता – विशेष विक्रीकर अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई   डॉ. एच. यशोद आधी – आयुक्त, राज्य कर्मचारी विमा योजना, मुंबई आता – आयुक्त, महिला आणि बाल विकास विभाग, पुणे   ई. रावेंदिरन आधी – आयुक्त, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई आता – सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई   एम. जे. प्रदीप चंद्रन आता – उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग (माहिती आणि तंत्रज्ञान), मुंबई   डॉ. बी. एन. पाटील आता – संचालक (पर्यावरण), पर्यावरण विभाग, मुंबई   ए. बी. धुलाज आधी – अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नागपूर आता – आयुक्त, राज्य कर्मचारी विमा योजना, मुंबई

आणखी >>

मोबाईलच्या वादातून मोठ्या भावाची डोक्यात फावडा घालून हत्या

भिवंडी : माहेरी गेलेल्या पत्नीला फोन करण्यासाठी मोठ्या भावाने घेतलेला मोबाईल लहान भावाने परत मागितला असता, त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या लहान भावाने फावड्याने डोक्यात प्रहार करुन मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील बासे गावात घडली आहे. दत्तात्रेय काळुराम पवार (वय 35 वर्षे) से हत्या झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर संतोष पवार (वय 32 वर्षे) असे लहान भावाचे नाव असून त्याच्यावर मोठ्या भावाच्या हत्येप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. मृतक दत्तात्रेय याची पत्नी माहेरी गेल्याने तिच्याशी बोलण्यासाठी आरोपी संतोषकडून त्याने मोबाईल घेतला होता. मात्र बराच उशीर झाल्याने सदरचा मोबाईल संतोष याने परत मागितला. त्यावेळी मोबाईल परत देण्यावरुन मृतक दत्तात्रेय व संतोष या दोघा भावांमध्ये वाद झाला झाला. या वादातून चिडलेल्या संतोष याने घराच्या कोपऱ्यात असलेला फावडा हातात घेऊन त्या फावड्याने दत्तात्रेय याच्यावर दणादण प्रहार केले. यातील एक फटका डोक्याच्या पाठीमागील भागात वर्मी लागल्याने दत्तात्रेय याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती महिला पोलीस पाटील वैभवी विनोद पालवी यांनी पडघा पोलीस ठाण्यास दिली असता पडघा  पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर या हत्येतील आरोपी संतोष पवार हा रात्री पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पडघा पोलिसांनी सापळा लावून शिताफीने अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता, 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहे.

आणखी >>

बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्या!

बदलापूर : एकीकडे वडापावमध्ये पाल सापडण्याचं सत्र सुरु असतानाच, बदलापुरात आता बुंदीच्या लाडूत अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात समोर आलेल्या या प्रकारामुळे ग्राहक चांगलेच धास्तावलेत. वांगणीला राहणारे किरण मेढेकर हे गुरुवारी संध्याकाळी बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे त्यांचे मित्र शशांक सिनलकर यांच्याकडे येत होते. शशांक यांच्याकडे गणपती असल्यानं त्यांनी प्रसाद म्हणून मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातून अर्धा किलो बुंदीचे लाडू घेतले. मात्र घरी गेल्यावर हे लाडू उघडून खात असतानाच त्यात अळ्या असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी तडक हे दुकान गाठून दुकानदाराला जाब विचारला. यावेळी लाडूतल्या काजूमधून या अळ्या लाडूत गेल्याची शक्यता असल्याचं सांगत दुकानदाराने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसंच, दुसरे लाडू घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी किरण यांनी या दुकानाचा कारखाना पाहिला असता तिथेही प्रचंड अस्वछ वातावरण दिसून आलं. त्यामुळे या दुकानावर कारवाईची मागणी किरण मेढेकर आणि शशांक सिनलकर यांनी केली आहे. दुसरीकडे, दुकानदाराला याबाबत विचारलं असता तक्रारदार किरण मेढेकर आणि शशांक सिनलकर यांनीच आपल्याकडे 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप दुकानदार रमेश त्रिवेदी यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे 23 ऑगस्ट रोजी बदलापूरजवळील

आणखी >>

आमदार होण्यासाठी ‘वर्षा’वरील नाही, राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद हवा- धनंजय मुंडे

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे 'वर्षा' बंगल्यावर गणपतीची आरती केली. याची चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बीडचा आमदार व्हायचं असेल तर वर्षावरील गणपतीचा नाही, तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळायला हवा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता लगावला. विशेष म्हणजे राजुरी हे जयदत्त क्षीरसागर यांचं मूळ गाव आहे. राजुरीचा गणपती या परिसरात प्रसिद्ध आहे. राजुरी इथे गणपतीचे मंदिर असून ते जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणाला राजकीय महत्त्व देखील आहे. आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना धनंजय मुंडे क्षीरसागरांचे नाव न घेता म्हणाले की,

आणखी >>

जम्मू-काश्मीर : कुलगाम जिल्ह्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चौगाममध्ये सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, चौगम भागात दहशतवाद्यांसोबत चकमक जारी आहे. या दहशतवाद्यांना मारणं ही पोलिसांची मोठी कामगिरी आहे. कारण, मारलेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्कर आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या संघटनांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात आहे. यापैकी काही जणांवर दोन बँक कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आणि लूट केल्याचा आरोप आहे. चौगाममध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्च ऑपरेशन चालू असतानाच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दरम्यान, 13 सप्टेंबर रोजीही जम्मू काश्मीरमधील तीन विविध कारवाईत सुरक्षा दलांनी आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या मारलेल्या दहशतवाद्यांपैकी तीन जण पाकिस्तानचे असल्याचं समोर आलं. या तीन जणांना पाकिस्तानला लागून असलेल्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मारण्यात आलं. जैश ए मोहम्मद (जेईएम) च्या दोन दहशतवाद्यांना सोपोर भागातील आणि जेईएमशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना रियासी जिल्ह्यात 33 तास चाललेल्या चकमकीत कंठस्नान घालण्यात आलं.

आणखी >>

पुण्यात चक्क कोंबड्याचं बर्थ-डे सेलिब्रेशन!

पिंपरी-चिंचवड : अण्णा... हाक मारणारा कोंबडा, तात्या... अशी आरोळी ठोकणारा कोंबडा आणि त्यानंतर चार पायाची कोंबडी आपण पाहिली. आता आणखी एक लाडका कोंबडा चर्चेत आला आहे. पुण्यात एका कुटुंबाने चक्क आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे. पुण्याच्या खेडमध्ये कोंबड्यावर जीवापाड प्रेम करणारं सोनावणे आहे. सोनावणे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे. दोन वर्षापूर्वी मुलगा ऋतूराज सोनावणे याला गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हा कोंबडा रस्त्यावर सापडला होता. सोनावणे कुटुंबियांनी आवडीने या कोंबड्याचं नाव 'पिल्लू' असं ठेवलं. दोन वर्षापूर्वी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना मुलाग ऋतूराजने घरी कोंबडा आणल्याने घरचे त्याला ओरडले होते. मात्र मुलाच्या हट्टापायी या कोंबड्याला सोनावणे कुटुंबियांनी आपल्या घरातील सदस्य बनवलं. त्यानंतर सोनवणे कुटुंबियांना या कोंबड्याचा लळा लागला आणि त्यांनी पुढे त्याचं 'पिल्लू' असं नामकरण केलं. आता 'पिल्लू'ला सोनवणे कुटुंबियांची भाषा समजू लागली आहे. सोनवणे कुटुंबियही 'पिल्लू'चा हट्ट पूर्ण करू लागले आहेत. म्हणूनच दोन वर्षापूर्वी ज्या दिवशी 'पिल्लू' सोनवणे कुटुंबियांचा सदस्य झाला, त्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवशी केक कापून 'पिल्लू'ला तो भरवला जातो. अशारितीने रस्त्यावर सापडलेल्या कोंबडीचं नशीब फळफळलं आहे.

आणखी >>

कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच: उदयनराजे

सातारा: कोर्टाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे  भोसले आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचं मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे. न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असंही उदयनराजे म्हणाले. दुसरीकडे डॉल्बी वाजवू न देण्याच्या भूमिकेवर पोलिसही ठाम आहेत. दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची भूमिका स्पष्ट केली होती. गणेशोत्सव शांततेत साजरा केला जाईल असा विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला होता. हायकोर्टाच्या नियमांच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं होतं. https://www.youtube.com/watch?v=I3cp2fzKIPA https://www.youtube.com/watch?v=rvJ-Yz48Mv8 कोर्टाचा नकार गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. सण-उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय. याबाबत पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे.

आणखी >>

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास तूर्तास हायकोर्टाची परवानगी नाहीच

मुंबई | सण-उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करुन पाठ फिरवू शकत नाही, अशी भूमिका घेत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी 'पाला' संघटनेला विसर्जनादरम्यान डिजे आणि डॉल्बीच्या वापरासाठी कोणताही दिलासा देण्यास तूर्तास नकार दिला. त्यामुळे दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनापाठोपाठ पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास प्रशासनाकडून तूर्तास परवानगी नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलीस सध्यातरी विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करू शकतात. या कारवाईतून दिलासा मागण्याचा प्रयत्न याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला. मात्र तुम्ही लेखी हमी जरी दिलीत तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर डिजेच्या आवाजाची पातळी किती असते हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. कारण सण हे वर्षभर एका पाठोपाठ एक येतच असतात. असा टोलाही न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं लगावला. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं हे कितपत योग्य आहे?, असा सवालही राज्य सरकारला विचारत हायकोर्टानं मिरवणुकीदरम्यान साऊंड सिस्टिमच्या सरसकट वापरावर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही सवाल उपस्थित केले आहेत. ठराविक मर्यादेच्या स्पीकर्सवर बंधन शिथील करण्याबाबत राज्य सरकारची काय भूमिका आहे याचं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारनं यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. त्यानुसार हायकोर्टानं 19 सप्टेंबरपर्यंत ही  सुनावणी तहकूब केली. दरम्यान शुक्रवारच्या सुणावणीत ध्वनी प्रदूषण आणि शांतता क्षेत्रासंदर्भात याचिका करणाऱ्या आवाज फाऊंडेशनचीही बाजू ऐकून घेण्यात आली. ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादेत राहून डीजे आणि डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्यांवर बंदी का? असा सवाल करत प्रोफेशनल ऑडियो आणि लायटिंग असोसिएशन (पाला) या संघटनेनं अड. सतीश तळेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. मुळात यासंदर्भात कायदा अस्तित्त्वात असतानाही त्याची योग्यपद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला. तसंच पोलीस हे आयोजकांना सोडून साऊंड सिस्टिम भाड्यानं देणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचं या याचिकेतून सांगण्यात आलं. लाखो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं विकत घेऊन या व्यवसायात उतरलेल्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची खंतही या याचिकेतून व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाची सुरुवात झाली की विसर्जन मिरवणुकांत डीजेंच्या वापराचा मुद्दा उपस्थित होतो. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून साऊंड सिस्टिमची गोदामं गणेशोत्सवापर्यंत सील केली आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत पोलिसांकडून अशाप्रकारे व्यवसायावर गंडांतरं येत असतील तर या व्यवसायात आलेल्या मराठी तरुणांनी करायचं काय? असा सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे.

आणखी >>

पाच लाखांसाठी सासरच्यांकडून महिलेचा खून, हत्येनंतर मृतदेह लटकवला!

हिंगोली : पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा गळा दाबून हत्या केल्याची घटना हिंगोलीच्या वसमत तालुक्यात घडली आहे. हत्या केल्याचा संशय येऊ नये यासाठी तिचा मृतदेह लटकवण्यात आला. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वसमतमधील गुलशननगर भागात 13 सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सलमा बेगम अब्दुल रहमान (वय 28 वर्ष) लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. मृत सलमा बेगम यांचे वडील मोहम्मद खलील महम्मद शिकूर (वय 48 वर्ष) यांच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींचा व्यवसाय वाढवण्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांची मागणी करत होते. पण मागणी पूर्ण न झाल्याने सासरची मंडळी कायम सलमा बेगमचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यानंतर 13 तारखेला त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. हत्येचा संशय येऊ नये यासाठी तिने आत्महत्या केल्याचं दाखवण्यासाठी सासरच्या लोकांनी मृतदेह लटकवला. या प्रकरणी मृत महिलेचा पती अब्दुल रहमान गुलाम अहमद, दीर आरेफ गुलाम अहमद, जाऊ समीनाबी आरेफ, सासरा गुलाम अहमद, सासू जैनबी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सगळ्यांवर कलम 498(अ), 302, 34, भांदवि अंतर्गत वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.

आणखी >>

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर गँगरेप

चंदीगड: देश पुन्हा एकदा गँगरेपने हादरला आहे. हरियाणात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित तरुणीने सीबीएसई बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं होतं. इतकंच नाही तर 26 जानेवारी 2016 रोजी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं.  दुर्दैव म्हणजे पोलिसांनी पुन्हा एकदा हद्दीचा मुद्दा उपस्थित करत पीडित कुटुंबाला मानसिक त्रास दिला. पीडित तरुणी रेल्वेच्या परीक्षेची तयार करते. त्यासाठी ती क्लासला जात होती, त्यावेळी गावातीलच तीन जण पंकज, मनीष आणि निशू यांनी तिचं अपहरण केलं. या तिघांनी तरुणीला महेंद्रगढ आणि झज्जर जिल्ह्याच्या सीमेवरील शेतात, एका विहिरीजवळ घेऊन गेले. तिथे आणखी काही नराधम आधीच हजर होते. दारुच्या नशेत असलेल्या 12 जणांनी  मुलीच्या शरिराचे अक्षरश: लचके तोडले. या सर्व पाशवी कृत्यानंतर नराधमांनी दुपारी चारच्या सुमारास पीडित तरुणीला बेशुद्ध अवस्थेत सोडून पोबारा केला. संतापाचा कळस म्हणजे आरोपी नराधमांपैकी एकाने पीडित तरुणीच्या घरी फोन करुन, तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याचं सांगितलं. या फोननंतर कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, समोर जे चित्र होतं, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. पीडित कुटुंबाने याबाबतची तक्रार रेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्याऐजी, कुटुंबाला हद्दीचं कारण दिलं. त्यांना महेंद्रगढमधील कनीना ठाण्यात खटला दाखल करण्यास सांगितलं.  तिकडे गेल्यावर कनीना पोलिसांनीही ती हद्द आमची नसल्याचं सांगत, परतवून लावलं. हरियाणात भाजपशासित मनोहरलाल खट्टर यांचं सरकार आहे. मुख्यमंत्री खट्टर याप्रकरणी काय भूमिका घेतात, संबंधित पोलिसांवर काय कारवाई करतात, आणि आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'कुठे आहे बेटी पढाव, बेटी बचाव' या घटनेनंतर धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी >>

पेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली

मुंबई: पेट्रोल-डिझेल दरवाढीचं विघ्न अद्याप दूर झालेलं नाही. आजही इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 88.67 तर डिझेल 77.82 रुपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 90.45 रुपये तर डिझेल 78.34 रुपये लिटर आहे. त्यामुळे पेट्रोल दर वेगाने शंभरीकडे वाटचाल करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीपासून एखादा दिवस वगळता सलग पेट्रोल दरात वाढ होत आहे. दरम्यान महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांमध्ये नांदेडचा दुसरा नंबर लागला आहे. नांदेडमध्ये आजचा पेट्रोलचा दर 90.25 रुपये इतका आहे. तर डिझेल 78.17 रुपये लिटर आहे. या यादीत अमरावती तिसऱ्या नंबरवर आहे. अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर 89.92 रुपये इतका तर डिझेल 79.10 रुपये लिटर आहे. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर मुंबई पेट्रोल- 88.67 रुपये डिझेल 77.82 रुपये   परभणी पेट्रोल 90.45 रुपये डिझेल 78.34 रुपये नांदेड पेट्रोल- 90.25 रुपये डिझेल 78.17 रुपये अमरावती पेट्रोल – 89.92 डिझेल – 79.10 सोलापूर पेट्रोल – 89.72 डिझेल – 78.44 औरंगाबाद पेट्रोल 89.71 रुपये डिझेल 78.88 रुपये नाशिक – पेट्रोल 89.04 रुपये डिझेल 76.98रुपये जळगाव पेट्रोल 89.63 रुपये डिझेल 77.55  रुपये नंदुरबार पेट्रोल 89.52रुपये डिझेल 77.46 रुपये नागपूर – पेट्रोल 89.15 रुपये डिझेल 78.74 रुपये पुणे – पेट्रोल 88.45 रुपये डिझेल 76.42 रुपये धुळे पेट्रोल 88.59 रुपये डिझेल 76.56 रुपये पंतप्रधानांनी बैठक बोलावली पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत घटणारं रुपयाचं मूल्य यामुळे मोदी सरकार टीकेचे धनी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर बैठक बोलवली आहे. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटलींसह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. संबंधित बातम्या 

आणखी >>
  • 1