काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय : ललित मोदी

मुंबई : कर्जबुडव्या विजय मल्ल्यानंतर भारतातून फरार झालेल्या आणखी एका आरोपीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबाबत ट्वीट केलं आहे. मल्ल्याचा दावा खरा असल्याचा सांगत आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी जेटलींची तुलना सापाशी केली आहे.

आणखी >>

भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या, पाण्यात बुडून चौघींचा मृत्यू

नाशिक : भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकमधील सातपूर परिसरात ही घटना घडली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकाच कुटुंबातील चौघींचा मृत्यू झाल्याने सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात सर्वत्रच बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत असतानाच, नाशिकमध्ये मात्र एक दुःखद घटना घडली आहे. सातपूरच्या बेळगाव ढगा परिसरात शिंदे नामक एक कुटुंब राहत असून, आज सकाळी त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं. दुपारी मनीषा शिंदे या आपल्या दोन लहान मुलींसह सूनेला घेऊन भांडी घासण्यासाठी जवळीलच एका बंधाऱ्यावर गेल्या होत्या. काम आटोपल्यावर पाय धुवत असतांनाच एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने इतर तिघीही यात बुडाल्या. विशेष म्हणजे, घरातीलच एक लहान मुलगी या परिसरात खेळत असताना तिने हा सर्व प्रकार बघून घरातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली आणि स्थानिक नागरिकांसह परिवारातील इतर सदस्यांनी इथे धाव घेत त्यांचा शोध घेऊन चारही जणींना बाहेर काढलं आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं, मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृतांमध्ये मनीषा अरुण शिंदे, वृषाली अरुण शिंदे, ऋतुजा अरुण शिंदे आणि आरती निलेश शिंदे यांचा समावेश आहे. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या नोंदणीच काम सुरु असून गणेश चतुर्थीच्या दिवशीच काळाने शिंदे कुटुंबावर घाला घातला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककला पसरली आहे.

आणखी >>

पवार साहेबांनी तातडीने धनंजय मुंडेंच्या हातात नारळ द्यावा : सुरेश धस

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. कोर्टाच्या या निर्णयानंतर विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष नेते या घटनात्मक पदावर असलेल्या धनंजय मुंडे यांनी तत्काळ या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. शरद पवार साहेब शेतकऱ्यांचे कैवारी म्हटले जातात, त्यामुळे तातडीने पवार साहेबांनी त्यांच्या (धनंजय मुंडे) हातात नारळ द्यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या आदेशाने पोलिसांनी सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. यावरही सुरेश धस यांनी भाष्य केलं. ''काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असतानाच गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या गृहमंत्र्यांचा त्याच्याशी संबंध नाही. कोर्टाने एसआयटी नेमून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत,'' असं सुरेश धस म्हणाले. ''गुन्हे दाखल झाल्याचं वाईट वाटतं तर शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाका. जिल्हा बँकेचा ठेवीदार हा गोरगरीब आहे. हे पैसे न मिळाल्यामुळे अनेकांचे आई-वडील देवाघरी गेले, अनेकांच्या मुलामुलींचे लग्न मोडले. खोटं बोल पण रेटून बोल याचंही थोडं भान विरोधी पक्षाने ठेवलं पाहिजे,'' असं सुरेश धस म्हणाले. काय आहे प्रकरण?

आणखी >>

गृहमंत्र्यांच्या आदेशाने सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर : धनंजय मुंडे

नांदेड : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांनी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखातंही आहे) पोलिसांवर दबाव आणून 18 पैकी केवळ सात संचालकांवर सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. ''बीड जिल्हा बँकेचं कर्ज प्रकरण हे 1999 सालातील आहे. मी 2006 मध्ये सूतगिरणीवर संचालक झालो. राज्याच्या गृहमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव आणून 18 पैकी केवळ 7 संचालकांवर सूडबुद्धीने न्यायालयात अहवाल सादर केला, हा आदेश न्यायालयातून पारित होताना नैसर्गिक न्याय पद्धतीचा अवलंब करून किमान आम्हाला आमचं म्हणणं सादर करण्याची संधी द्यायला हवी होती, पण माझा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे,'' असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. काय आहे प्रकरण?

आणखी >>

बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा : धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर निर्बंध

बीड : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही.

आणखी >>

पतंजलीचं गायीचं दूध लॉन्च, दोन रुपयांनी स्वस्त मिळणार

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबांनी पतंजलीच्या उत्पादनामध्ये आणखी वाढ केली आहे. रामदेव बाबांनी आज (13 सप्टेंबर) गायीचं दूध आणि त्यापासून बनलेली उत्पादनं लॉन्च केली. गायीच्या दुधाचा दर 40 रुपये प्रति लिटर असेल. त्यामुळे बाजारात आधीपासूनच असेलल्या गायीच्या दुधापेक्षा हे दूध प्रति लिटर दोन रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये डेअरी प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याआधी स्वत: रामदेव बाबांनी गायीचं दूध काढलं. पतंजलीने गायीच्या दुधासह दही, ताक आणि पनीरही लॉन्च केलं. पतंजली आधीपासूनच बाजारात गायीचं तूप विकत आहे. पतंजलीने दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानमध्ये दुधाच्या पुरवठ्यासाठी 56,000 किरकोळ विक्रेते आणि व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे. यामधून 2019-2020 मध्ये दरदिवशी 10 लाख लिटर गायीच्या दुधाचा पुरवठा होईल, अशी आशा कंपनीला आहे. आम्ही पहिल्याच दिवशी चार लाख लिटर गायीच्या दुधाचं उत्पादन केलं आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. पतंजली लवकरच फ्लेवर्ड मिल्कही लॉन्च करणार आहे.

आणखी >>

'गोकुळ'च्या सभेत तुफान राडा, खुर्ची भिरकावून मारहाण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या करवीर तालुका संपर्क मेळाव्यात प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झाली. दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना मारहाण करण्यात आली. त्यातच एकाने नेजदार यांना खुर्ची फेकून मारली. काहींनी नेजदार यांना बाजूला नेल्याने पुढील अनर्थ टळला. 'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब विश्‍वास नेजदार यांनी केला. यावेळी नेजदार यांनी विश्वास पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने काहींनी त्यांच्यावर खुर्ची भिरकावली. दुसरीकडे, वार्षिक सभेच्या अपुर्‍या जागेवरुन संचालक वसंत खाडे आणि माजी संचालक बाबासाहेब चौगले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. फक्‍त करवीर तालुक्याच्या संपर्क सभेसाठीच ही जागा अपुरी पडत असताना सर्वसाधारण सभा या ठिकाणी कशाला घेता, असा जाब चौगले यांनी विचारल्यानंतर त्यांच्याही दिशेने कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यावरुन खाडे-चौगले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, गुंडगिरी करुन संस्था प्रतिनिधींना मारहाण केल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसंच याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आणखी >>

देश सोडण्याआधी सेटलमेंटसाठी जेटलींना भेटलो होतो : मल्ल्या

लंडन : देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर सेटलमेंटसाठी प्रस्ताव ठेवला होता, असा खळबळजनक दावा कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केला आहे. तसेच, लंडनला जाण्यापूर्वी जेटलींना मी भेटलोही होतो, असंही मल्ल्या म्हणाला. भारतातील बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून, 2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या भारताबाहेर फरार झाला. त्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनकडे मागणी केली. त्याबाबत लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी मल्ल्याने हा गौप्यस्फोट केला. “संपूर्ण प्रकरण सेटल करण्यासाठी भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. मी बँकांचे कर्ज भरण्यासाठी तयार होतो. मात्र बँकांनी माझ्या सेटलमेंटवर प्रश्न उपस्थित केले.” असे विजय मल्ल्या म्हणाला. माझ्यावरील आरोपांशी मी सहमत नाही. तरी कोर्टाला निर्णय घेऊ द्या, असेही विजय मल्ल्याने यावेळी सांगितले.

आणखी >>

‘चिपी’वर पहिले विमान उतरले, राणे-केसरकरांमध्ये खटके उडाले

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिलं विमान उतरुन काही तासही झालेले नाहीत, तोवर यावरुन राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. “नारायण राणेंना खाजवून खरुज काढण्याची सवय आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आले पाहिजे, त्यात मीठ कशाला कालवता”, असा सवाल सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना केला आहे. कोकणातील चिपी विमातळावर विमानच्या लँडिंगवरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. चिपी विमानतळावरील चाचणी अनधिकृत असल्याचा आरोप राणेंनी केला होता. या टीकेला उत्तर देताना केसरकरांनी राणेंवर निशाणा साधला. चिपी विमानतळावर अखेर पहिलं विमान उतरलं! यंदाचा गणेशोत्सव कोकणवासियांसाठी भरभराटीचा ठरला आहे. याचं कारण गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कोकणवासियांच्या पंखांना बळ मिळालं आहे. कोकणातल्या तारकर्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिपी विमानतळावर अखेर पहिलं विमान उतरलं. आज सकाळी 11.50 च्या सुमारास या विमानानं लाल मातीत उभारलेल्या चकचकीत विमानतळाच्या इमारतीसमोर लँडिग केलं. चेन्नईहून सकाळी हे विमान झेपावलं होतं, त्यानंतर गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर विमान चिपी विमानतळावर उतरलं. दरम्यान ही विमानाची चाचणी पाहण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी चिपी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. तरी या विमानानं बाप्पाच्या मूर्तींसह विमानतळावर हजेरी लावल्याची माहिती आहे. नारायण राणेंचा आरोप काय? विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. “चिपी विमानतळावर केलेली चाचणी अनधिकृत आहे. पालकमंञी दीपक केसरकर यांनी खासगी कंपनीला 10 लाख रुपये देऊन चुकीच्या पद्धतीने चिपीत विमान उतरवले. शासनाच्या परवानग्या नसताना स्वतःच्या अट्टाहासामुळे अनधिकृतपणे विमान उतरवले.” असा आरोप करत राणे पुढे म्हणाले, “शासनाच्या नियमाप्रमाणे  विमान उतरवल्यास मी स्वतः न बोलवताही गेलो असतो.” केसरकरांचं राणेंना उत्तर नारायण राणेंना खाजवून खरुज काढण्याची सवय आहे, “दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आले पाहिजे. त्यात मीठ कशाला कालवता?, असा सवाल दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना केला आहे. “या विमानतळासाठी जेव्हा जमिनी घेतल्या गेल्या, तेव्हा कवडीमोलाने गोरगरिबांच्या जमिनी कोणी घेतल्या? या विमानतळाला खडी सप्लाय कोणी केला? याचा शोध घ्या. हे सगळं राणेंच्या लोकांनीच केलं.”, असा आरोपही केसरकर यांनी केला. विमानतळ माझं स्वप्न आहे, असं राणे म्हणतात, मग गेल्या 19 वर्षात ते ते स्वप्न पूर्ण का करु शकले नाहीत? असा सवालही केसरकरांनी केला. तसेच, राणेंमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नाही, असेही केसरकर म्हणाले. “चिपी विमानतळ हा खासगी कंपनीचा आहे. ते त्यांना हवा तेव्हा टेस्ट लँडिंग करु शकतात. त्यात एवढं राणेंच्या पोटात दुखण्यासारखं काय होत?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.

आणखी >>

हिंगोलीतील बेपत्ता PSI नांदेडमध्ये सापडले!

हिंगोली : बाळापूर पोलिस ठाण्यातील बेपत्ता झालेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) तानाजी चेरले नांदेडमधील दवाखान्यात सापडले आहेत. कळमनुरीचे ठाणेदार गणपत राहिरे यांनी चेरलेंचा शोध लावला. बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे 10 सप्टेंबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती. तानाजी चेरले यांच्या पत्नी सरस्वती चेरले यांनी आपले पती बाळापूरचे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हिंगोलीपासून ते मुंबईपर्यंतच्या पोलिस दलामध्ये एकच खळबळ माजली होती. फौजदार चेरले निघून जाण्यामागचे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता त्या शंकांचे निरसन होणार आहे. कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी बेपत्ता फौजदाराचा  शोध लावला. नांदेड येथील तरोडा नाका भागात असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये तानाजी चेरले उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्यावर फौजदार चेरले यांना आणण्यासाठी गणपत राहिरे यांनी मध्यरात्रीच नांदेड गाठले. दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन  सकाळी चार वाजता त्यांना घेऊन कळमनुरी येथे हजर झाले आहेत. थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासमोर फौजदार चेरले यांना उपस्थित केले जाणार असून त्यानंतरच या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे.

आणखी >>

सार्वजनिक गणेश मंडळांना ‘महावितरण’कडून सवलतीत वीज

मुंबई : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना वीजपुरवठ्यासाठी महावितरणने सवलतीच्या वीजदरासह एकच स्लॅब ठेवलं आहे. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांनी वापरलेल्या शेवटच्या युनिटलाही वहन आकारासह केवळ 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट दर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशमंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यात गुरुवारी (13 सप्टेंबर) गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी पुरेसे वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध असलेले हे मीटर प्राधान्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अस्थिर आकार आणि 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलिंग) आकार असा एकूण 4 रुपये 38 पैसे प्रतियुनिट सध्याचा दर आहे. याउलट घरगुती व वाणिज्यिक (कमर्शियल) किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वेगवेगळे वीजदर निश्चित करण्यात आले आहे. मात्र सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे कितीही वीज वापरल्यास शेवटच्या युनिटपर्यंत केवळ 4 रुपये 38 पैसे दर आकारण्यात येणार आहे. या तुलनेत घरगुती व वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर स्लॅबनुसार दुप्पट व तिपटीने अधिक आहेत. वेगवान हवा किंवा पावसाच्या पाण्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाहीत किंवा विस्कळीत झालेले नाहीत, याची दैनंदिन तपासणी करावी. सुरक्षित अंतरापेक्षा ही लाईटिंग अधिक उंचीवर असल्याची तपासणी करीत राहावी. सार्वजनिक गणेशोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविकमंडळी श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी गणेश मंडपातील वीजयंत्रणेची वायरमनकडून दैनंदिन तपासणी करण्यात यावी. तातडीच्या मदतीसाठी गरज भासल्यास 24 तास सुरु असणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1912, 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

आणखी >>

आज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल : विखे पाटील

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात झालेल्या मारहाण प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असं ते म्हणाले. फाईल मंजूर करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला दहा लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप उस्मानाबादचे अरुण निटुरे यांनी केला. मात्र तरीही काम न झाल्याने निटुरे यांनी मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याला मारहाण केली. या सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिलं होतं आणि मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते आता अगदी‘पारदर्शक’ पद्धतीने समोर आलंय. पैसे घेऊन काम झालं नाही म्हणून चक्क मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होण्याचा एक आगळावेगळा ‘पराक्रम’भाजप-शिवसेना सरकारच्या नावे नोंदला गेला आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली. ही घटना राज्य सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या घटनेसाठी राज्य सरकारची भ्रष्टाचाराप्रती उदासीन आणि मवाळ भूमिका कारणीभूत आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांवर ठोस पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना अभय देण्याचेच उघड प्रयत्न झाले. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचाराविरूद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही, असा स्पष्ट संदेश सर्वत्र गेल्याचं विखे पाटील म्हणाले. मंत्री तर मंत्री पण त्यांचे अधिकारीही आता खुलेआम भ्रष्टाचार करताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता पैसे देऊन काम न झालेली मंडळी दिवसाढवळ्या मंत्रालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण करू लागली आहेत. हीच वेळ उद्या मंत्र्यांवर आली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही. ही या सरकारच्या कर्माची फळे असतील, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली. संबंधित बातम्या :

आणखी >>

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता मोफत प्रवासाचा पास

मुंबई : एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीसह वर्षातील सहा महिने मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. गेली कित्येक वर्षे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. अखेर दिवाकर रावतेंनी मागणी मान्य करुन, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गणेश आगमनाच्या मुहूर्तावर 'सुख वार्ता' दिली. एसटी महामंडळाचे सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे चार हजार कर्मचारी निवृत्त होतात. सध्या 25 हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रवासी पाससाठी मागणी केली आहे. सेवेमध्ये असताना दररोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष देता न आल्याने, किमान निवृत्तीनंतर तरी कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण घालवावेत, सपत्नीक धार्मिक-पर्यटन, देवदर्शन, नातेवाईकांना भेटावे यासाठी प्रवास हा अनिवार्य आहे. परंतु परिस्थिती अगदीच बेताची असल्याने दळण-वळणासाठी एसटी शिवाय पर्याय नाही. ज्या एसटीची ऐन  उमेदीत प्रामाणिक सेवा केली. त्या एसटीतून निवृत्तीनंतर धार्मिक व इतर पर्यटनासाठी प्रवास करण्याची 'सशुल्क' का असेना पण सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी परिवहनमंत्र्यांकडे केली होती. एकेकाळी एसटीच्या कुटुंबाचे सदस्य असलेल्या व गेली 70 वर्षे ज्या कर्मचाऱ्यांनी मनोभावे सेवा करुन एसटी सांभाळली, वृद्धिंगत केली, त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तर वयात 'सशुल्क' प्रवास-पास न देता वर्षातून सहा महिने आपल्या पत्नीसह मोफत प्रवास करण्याचा पास देण्याचा निर्णय परिवहन मंत्र्यांनी घेतला आहे. या निर्णयाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजीत सिंह देओल यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान राखत संमती दिल्याने, रावते यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

आणखी >>

मॅट्रिमोनी साईटवर 8 महिन्यात 102 उच्चशिक्षितांना गंडा

मुंबई : लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळल्या असल्या, तरी जोडाव्या लागतात भूतलावर! लग्न जुळवण्यासाठी विविध मॅट्रिमोनी साईट्सवर नोंदणी करणाऱ्या 102 जणांना या वर्षात लग्नाआधीच धोका मिळाला. 102 उच्चशिक्षित महिला आणि पुरुषांची गेल्या आठ महिन्यात फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. या विवाहोच्छुकांना तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा बसला आहे. यामध्ये मुख्यत्वे विधवा, घटस्फोटित किंवा तिशी ओलांडलेल्या महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षात (2017) मॅट्रिमोनी साईटवरुन फसवणूक झालेल्यांचा आकडा यंदा आठ महिन्यांतच पार झाला आहे. करिअर किंवा कौटुंबिक कारणांमुळे शहरात लग्न करण्याचं वय लांबत चाललं आहे. त्याचप्रमाणे विधवा-विधुर, घटस्फोटितही दुसऱ्या लग्नासाठी मॅट्रिमोनी साईटवर नोंदणी करतात. या साइटवर बनावट प्रोफाइल तयार करुन अशा व्यक्तींना हेरलं जातं आणि विविध शक्कल लढवून लूट करण्यात येते. परदेशात मोठ्या पगाराची नोकरी असल्याचं बनावट प्रोफाईलवर सांगितलं जातं. महिलांना 'रिक्वेस्ट' पाठवून त्यांच्याशी संपर्क साधायचा. त्यांचा विश्वास संपादन करुन लग्नासाठी मागणी घातायची. त्यानंतर विविध कारणं सांगून महिलांकडे पैसे मागितले जातात. भारतात आल्यानंतर विवाह करुन पैसे देण्याचे आश्वासन दिलं जातं. तर काही वेळा परदेशातून मोठ्या रकमेचं गिफ्ट पाठवलं असून ते कस्टमने पकडल्याच्या थापा मारल्या जातात. गिफ्ट सोडवून घेण्यासाठी महिला विविध बँक खात्यांत पैसे भरत राहतात. पण गिफ्टही मिळत नाही आणि लग्नाचं आश्वासन देणाराही संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातो. तेव्हा कुठे फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. मॅट्रिमोनी साइटवरुन फसवणूक करणाऱ्या काही टोळ्यांना सायबर सेलने अटक केली आहे. विशेष म्हणजे काही महिला लग्नाचं आमिष दाखवून नंतर ब्लॅकमेल करायच्या आणि पुरुषांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करायच्या, असंही समोर आलं आहे. मॅट्रिमोनी साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याशिवाय विश्वास ठेवू नये. त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करु नयेत, असं आवाहन सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं आहे. लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. नातेवाईक, मित्र यांच्याशी बोलून खात्री करावी आणि मगच लग्न करावं, असं आवाहन केलं जात आहे.

आणखी >>

संभाजी भिडे आणि नरेंद्र पाटील यांची एसटीत भेट

सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील काल सांगली दौऱ्यावर असताना, त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भेट कुठल्या बंद खोलीत वगैरे नाही, तर एसटीमध्ये झाली. आमदार नरेंद्र पाटील काल सांगली दौऱ्यावर होते. त्याची संभाजी भिडे यांच्या भेटीची वेळही ठरली होती. मात्र भिडेंना भेटण्यासाठी जाण्यास पाटील यांना थोडा उशीर झाला. तोवर भिडे आपल्या नियोजित दौरा आणि वेळेनुसार सांगली बसस्थानकतून सांगली-जत बसमधून जतकडे निघाले. त्यानंतर पाटील यांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितिन चौगुले यांच्याशी संपर्क साधत आपण भिडे गुरुजींना भेटण्यासाठी नियोजित ठिकाणी पोहोचत असल्याचे सांगितले. मात्र त्यवेळी चौगुले यांनी संभाजी भिडे बसमधून बाहेरगावी निघाले असल्याचे सांगितले. तेव्हा नरेंद्र पाटील यांनी कोणत्या मार्गाने आणि कोणत्या बसमधून जात असल्याची विचारणा केल्यानंतर  सांगली-मिरज रस्त्यावरून जाणाऱ्या या बसचा क्रमांक घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील चौकात बस थांबविण्याची  विनंती पाटील यांनी चालकाला केली. चालकानेही शासकीय वाहनांचा ताफा व नरेंद्र पाटील यांच्या विनंतीवरून बस थांबविली. तेव्हा नरेंद्र पाटील यांनी भिडे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. अण्णासाहेब पाटील महामंडळावर निवड झाल्याबद्दल भिडे यांनी नरेंद्र पाटील यांचे अभिनंदनही केले. जवळपास दहा मिनिटांच्या या भेटीनंतर आमदार पाटील यांनी प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करत संभाजी भिडे याचा निरोप घेतला. यावेळी पाटील यांनी एसटीतील चालक व वाहकांचे देखील आभार मानले. एसटीमधील प्रवाशांनीही बस थांबवून झालेल्या भेटीबाबत आणि त्यामुळे ताटकळत राहिल्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.

आणखी >>

पुणे कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरण, दोन जणांना अटक

पुणे : पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्ला करत तब्बल 94 करोड 42 लाख रुपये चोरल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई केली. याप्रकरणी आणखी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरु आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर महेश राठोड, कुणाल, अली, मोहम्मद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सर्वांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे क्लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचं तपासात समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींना पुणे न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एकूण रक्कम 94 कोटी रुपयांची आहे. मात्र अटक आरोपींनी 89 लाख रुपये कोल्हापुरमधील वेगवेगळ्या एटीएममधून कार्ड क्लोन करुन काढले आहेत. बाकी पैसे कोणी आणि कसे काढले याबात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सिस्टिमची फसवणूक करुन पैसे काढण्यात आल्यानंतर हे पैसे 28 देशांमधील एटीएममधून काढले गेल्याचं आणि त्यापैकी अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यामुळे अटक आरोपींचा कोणत्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित बातम्या :

आणखी >>

भारताने मालिका 1-4 ने गमावली, इतिहास रचून अँडरसनचा कूकला निरोप

लंडन : सलामीचा लोकेश राहुल आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने झळकावलेली शतकं, तसंच त्या दोघांनी सहाव्या विकेटसाठी रचलेल्या 204 धावांच्या भागीदारीनंतरही टीम इंडियाला ओव्हल कसोटी वाचवता आली नाही. या कसोटीत इंग्लंडने भारताचा धावांनी 118 धावांनी पराभव करून, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा निर्विवाद विजय साजरा केला. या कसोटीत इंग्लंडने भारताला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुल आणि रिषभ पंत या शतकवीरांनी सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचून भारताचा दुसरा डाव 345 धावांत आटोपला. राहुलने 20 चौकार आणि एका षटकारासह 149 धावांची खेळी उभारली. पंतने 15 चौकार आणि चार षटकारांसह 114 धावांची खेळी केली. सॅम करन मालिकावीर विराट कोहलीने या मालिकेत पाच सामन्यांमध्ये 59 च्या सरासरीने 593 धावा केल्या. तो भारतीय मालिकावीर ठरला. तर इंग्लंडचा युवा गोलंदाज सॅम करन मालिकावीर ठरला. त्याने चार सामन्यांमध्ये 11 विकेट घेत 272 धावांची अष्टपैलू कामगिरी केली. जेम्स अँडरसनने इतिहास रचला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोहम्मद शमीला बाद करताच ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 564 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मॅकग्राच्या नावावर 563 विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार शेन वॉर्न (708), भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे (609) यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. या यादीत चौथ्या क्रमांकावर आता अँडरसन आहे. रिषभ पंतचं शतक, अनेक विक्रमांची नोंद षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतने ओव्हल कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे रिषभने हे शतकही षटकारानेच पूर्ण केलं. षटकार ठोकत कसोटीत शतक पूर्ण करणारा रिषभ चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव, इरफान पठाण आणि हरभजन सिंह यांच्या नावावर हा विक्रम होता. या कसोटीत रिषभने विविध विक्रमांची नोंद केली आहे. षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणं असो, किंवा एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणं असो. पहिलीच मालिका त्याने गाजवली. दरम्यान, खराब यष्टीरक्षणामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. चौथ्या कसोटी सामन्यात तर एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला होता. अॅलिस्टर कूकचा क्रिकेटला अलविदा इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूकने ओव्हल कसोटीत दमदार शतक साजरं केलं. कूकच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 33 वं शतक ठरलं. त्याने पदार्पणाच्या कसोटीतही शतक ठोकलं होतं आणि कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीतही शतक ठोकलं. ओव्हल कसोटी ही कूकच्या कारकीर्दीतली अखेरची कसोटी होती. अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा कूक हा जगातला चाळीसावा फलंदाज ठरला. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात आणि अखेरच्या सामन्यात शतक ठोकणारा जगातला केवळ पाचवा फलंदाज ठरला. कूकने मार्च 2006 साली भारताविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या त्या कसोटीतही कूकने शतकी खेळी साकारली होती. विशेष म्हणजे कूकचा अंतिम सामनाही भारताविरुद्धच झाला. अखेरच्या कसोटी सामन्यात सामनावीराचा मानही अॅलिस्टर कूकलाच मिळाला. त्याने पहिल्या डावात 71 आणि दुसऱ्या डावात 147 धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीत शतक ठोकणारे फलंदाज रेजिनाल्ड डफ (ऑस्ट्रेलिया) विल्यम पॉन्सफोल्ड (ऑस्ट्रेलिया) ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया) मोहम्मद अझरुद्दीन (भारत) अॅलिस्टर कूक (इंग्लंड) संबंधित बातम्या :

आणखी >>

स्प्रेची बाटली डोक्यात घालून जावयाकडून सासूची हत्या

ठाणे : पती-पत्नीच्या कौटुंबिक कलहात मद्यपी जावयाने स्प्रेची बाटली डोक्यात मारुन सासूची हत्या केली. त्यानंतर सासूला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले. घोडबंदर रोडवरील रुमा बाली या उच्चभ्रू संकुलात सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. कमलजीत कौर असे मृत सासूचे नाव असून कर्णबधीर विवाहित मुलीला जावयाकडून होणाऱ्या त्रासाबाबत जाब विचारण्यासाठी आली होती. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी जावई अंकुश भट्टी याला अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने अंकुश भट्टी याला 15 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दिली. हिरानंदानी संकुलात राहणारी कमलजीत कौर यांची मुलगी कर्णबधीर असून ती घटस्फोटिता होती. कमलजीत यांनी तिचा विवाह घोडबंदर रोडवरील रुमा बाली या उच्चभ्रू संकुलात पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अंकुश भट्टी याच्याशी करून दिला होता. लग्नात घर, गाडी आणि सासरच्या मंडळीचा ट्रान्सपोर्ट व्यवसायदेखील भट्टी याला दिला होता. तरीही तो मद्याच्या आहारी जाऊन कर्णबधीर मुलीला त्रास देत असल्याने कमलजीत कौर गेली वर्षभर तिला भेटण्यासाठी जात असे. मुलीने पतीबाबत माहेरी तक्रारी केल्याने याचा जाब विचारण्यासाठी कमलजीत कौर सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास रुमा बाली संकुलात आल्या होत्या. तेव्हा दारुच्या नशेत तर्र असलेल्या भट्टीने सासूलाच शिवीगाळ करीत तिच्या डोक्यात स्प्रेची बाटली मारली. तसेच रक्तबंबाळ अवस्थेतच तिला पकडून थेट बेडरूमच्या खिडकीतून इमारतीखाली फेकून देत तिची हत्या केली. याप्रकरणी मृत कमलजीतच्या मुलाच्या तक्रारीवरुन कासारवडवली पोलिसांनी भट्टी याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आणखी >>

पदार्पणातच्या मालिकेत षटकार ठोकून रिषभचं पहिलं शतक साजरं

लंडन : षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतने ओव्हल कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात शानदार शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे रिषभने हे शतकही षटकारानेच पूर्ण केलं. षटकार ठोकत कसोटीत शतक पूर्ण करणारा रिषभ चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी कपिल देव, इरफान पठाण आणि हरभजन सिंह यांच्या नावावर हा विक्रम होता. रिषभचं शतक साजरं होताच दिग्गज यष्टीरक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टनेही त्याचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. पदार्पणाच्या मालिकेत रिषभचे विक्रम या कसोटीत रिषभने विविध विक्रमांची नोंद केली आहे. षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात करणं असो, किंवा एका सामन्यात सर्वाधिक झेल घेणं असो. पहिलीच मालिका त्याने गाजवली. दरम्यान, खराब यष्टीरक्षणामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. चौथ्या कसोटी सामन्यात तर एक नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला होता. धोनीचा विक्रम मोडित यापूर्वी रिषभ पंतने आणखी एका विक्रमाची नोंद केली. इंग्लंडमध्ये खेळताना एका डावात सर्वोच्च धावसंख्या उभारणारा तो पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने ओव्हलच्याच मैदानावर 2007 मध्ये खेळताना 92 धावा केल्या होत्या. शतकी खेळी करणाऱ्या रिषभने हा विक्रम मोडित काढला. SENA मध्ये सर्वाधिक धावा SENA म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या आशियाबाहेरच्या चार महत्त्वाच्या देशांमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारणारा रिषभ पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरलाय. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (सेन्चुरियन) धोनीची 90 ही सर्वोच्च धावसंख्या होती. फारुख इंजिनियर यांनी अॅडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियात 89 धावा केल्या होत्या. तर सय्यद किरमानी यांनी न्यूझीलंडमध्ये 78 एवढी धावसंख्या उभारली होती. षटकार ठोकत खातं उघडलं कसोटी क्रिकेटमध्ये षटकार लगावत सुरुवात करणारा रिषभ पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकाराने आपलं खातं खोलणारा रिषभ जगातील बारावा खेळाडू ठरला. एकाच सामन्यात सर्वाधिक झेल आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतने मात्र या सामन्यात कमाल केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून पाच झेल घेतले, जो एक विश्वविक्रम आहे. पदार्पणाच्या सामन्यात एकाच डावात पाच झेल घेणारा तो आशियातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला आहे.

आणखी >>

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली थांबवण्यास राज्य सरकारचा नकार

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलवसुली थांबवण्यास राज्य सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. या महामार्गावरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायची नाही, तसेच हलक्या वाहनांना त्यात सूटही द्यायची नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमित मलिक अहवाल आणि अन्य तपशिलाचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. आरटीआय कर्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केलेली आहे. बांधकामाची पूर्ण किंमत वसूल होऊनही कंत्राटदाराकडून 2019 पर्यंत टोलवसुली सुरु ठेवण्यास विरोध केला आहे. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2016 मध्ये 1300 कोटींची रक्कम कंत्राटदाराला अदा करुन, राज्य सरकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे महामार्ग आपल्या ताब्यात घेऊ शकत होतं. मात्र राज्य सरकारने याबाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे गेल्या 23 महिन्यांत कंत्राटदाराच्या झोळीत 1500 कोटी रूपये जमा झाले आहेत. जमा झालेली रक्कम ही ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक असल्याची माहिती यापूर्वी झालेल्या सुनावणीत (7 जून) हायकोर्टापुढे मांडण्यात आली होती.

आणखी >>

नागराजसह आर्ची-परशाचा मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश

मुंबई: सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे राजकीय पक्षाच्या जवळ गेला आहे. नागराज मंजुळेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे. केवळ नागराजनेच नाही तर सैराट सिनेमा गाजवलेला परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही ‘मनचिसे’चं सभासदत्व स्वीकारलं आहे.

आणखी >>

आंध्र प्रदेश, राजस्थाननंतर पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त

कोलकाता : आधी राजस्थान, नंतर आंध्र प्रदेश आणि आता पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारनेही आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक रुपयाची कपात करण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पेट्रोल-डिझेलवरील वॅट चार टक्क्यांनी कमी केला, ज्यामुळे दर अडीच रुपये प्रति लिटर एवढे कमी झाले. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायुडू यांनीही आंध्रवासियांना दिलासा देत पेट्रोल-डिझेल दोन रुपये प्रति लिटरने स्वस्त केलं. आता पश्चिम बंगाल सरकारनेही आपल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत आहे. परभणीत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे राज्य सरकार नागरिकांना दिलासा कधी देणार याकडे लक्ष लागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून एक्साईज ड्युटी, तर राज्य सरकारकडून वॅट वसूल केला जातो. वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा देणं राज्य सरकारच्या हातात असतं, तर एक्साईज ड्युटी कमी करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही सुरुच आहे. आज पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागलं. मुंबईत पेट्रोलचा दर 88 रुपये 26 पैसे तर डिझेल 77 रुपये 47 पैसे प्रति लिटर आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलची वेगाने शंभरीकडे कूच सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा संतापाचा पाराही त्याच वेगाने चढत आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल तब्बल 2 रुपये 17 पैशांनी महागलं आहे. संबंधित बातम्या :

आणखी >>

मुख्यमंत्री, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द पाळा : उद्धव

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातील असं सांगितलं गेलं. आता मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपण मराठा समाजासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. 'आरक्षण आणि इतर काही मागण्यांसाठी मराठा समाज चवताळून रस्त्यावर उतरला आहे. लाखा-लाखांचे मोर्चे काढले गेले. आंदोलन शांततेत सुरु होतं, पण कोणी फारसं लक्ष दिलं नाही, व्यथा गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळे ठोक मोर्चा निघाले.' असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा समाजाच्या आडून आंदोलनात काही समाजकंटकांनी हिंसा घडवली मात्र, त्याचं खापर मराठा समाजाच्या डोक्यावर फुटलं, त्यामुळे कारवाई होणार असेल तर न्यायाने व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आणखी >>

पेट्रोल पुन्हा महागलं, 11 दिवसात 2 रुपये 17 पैशांनी दरवाढ

मुंबई: पेट्रोल-डिझेलची दरवाढ आजही सुरुच आहे. आज पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 15 पैशांनी महागलं. मुंबईत पेट्रोलचा दर 88 रुपये 26 पैसे तर डिझेल 77 रुपये 47 पैसे प्रतिलीटर आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोलची वेगाने शंभरीकडे कूच सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा संतापाचा पाराही त्याच वेगाने चढत आहे. गेल्या 11 दिवसात पेट्रोल तब्बल 2 रुपये 17 पैशांनी महागलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत असताना,

आणखी >>

चंद्राबाबूंचा आंध्रवासियांना दिलासा, पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त

हैदराबाद : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर संपूर्ण देशात वातावरण तापलं असताना, चंद्राबाबूंनी आंध्र प्रदेशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे दोन रुपये कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी घेतला. पेट्रोल-डिझेलवरील दोन रुपयांची कपात उद्या (11 सप्टेंबर) सकाळपासून आंध्र प्रदेशमध्ये लागू करण्यात येईल. त्यामुळे उद्यापासून आंध्रमध्ये पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त असेल. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कालच (9 सप्टेंबर) पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट 4 टक्क्यांनी कमी केला होता. त्यानंतर राजस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 2 रुपये ते 2.5 रुपये प्रति लिटर कपात झाली. मात्र, वसुंधरा राजे यांचा इंधन दर कपातीचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या करामध्ये कपात अशक्य असल्याचे अर्थ मंत्रालयाने आजच स्पष्ट केले आहे. जर कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढले, तर यावर विचार होईल, असेही अर्थ मंत्रालयाने सांगितले. शिवाय, जर एक्साईज ड्युटी घटवली, तर त्याचा परिणाम विकासावर होण्याची शक्यता आहे, असा दावा अर्थ मंत्रालयाने केला आहे. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीअंतर्गात आणल्यावरही दरांवर फारसा फरक पडणार नाही आणि राज्यांची आर्थिक स्थिती सुद्धा चांगली नाहीय. त्यामुळे सध्या पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या शुक्रवारी म्हटले होते की, पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणणं गरजेचं आहे. मात्र मोदी सरकारमधीलच दोन मंत्र्यांची मतं परस्पर विरोधी असल्याचे दिसून येते आहे. तूर्तास, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमधील राज्य सरकारांनी आपापल्या राज्यातील जनतेला इंधनाचे दर कमी करुन काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

आणखी >>

शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे

मुंबई : शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही, अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेवर टीकास्त्र शिवसेनेने ‘भारत बंद’वर टीका केली. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “शिवसेना केसाळ कुत्र्यासारखी आहे. कुठून बघायचं हेच कळत नाही. शिवसेनेला स्वत: ची भूमिका राहिली नाही.” तसेच, राज ठाकरे पुढे म्हणाले, “शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही. ह्यांची पैश्याची कामं अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि कामं झाली की सत्तेत राहतात.” महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन “महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलनं केली. मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करतो. त्यांनी सतत असा जागता पहारा ठेवला पाहिजे.”, असे म्हणत राज ठाकरेंनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी मनसैनिकांचे अभिनंदन केले. भाजपला इशारा “आज महाराष्ट्र सैनिकांवर ज्या पद्धतीची कलमं टाकली गेली, ती पाहून मला भारतीय जनता पक्षाला सांगावसं वाटतं की, आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या तुम्ही विरोधात असाल. याचा आम्ही समाचार घेऊच, पण भाजपच्या अंगलट हे येणार नक्की”, असा इशारा राज ठाकरेंनी भाजपला दिला. लोकांचा आक्रोश दिसून आलाय” “रविशंकर प्रसाद म्हणाले की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणं आमच्या हातात नाही. मग 2014 च्या आधी तुम्ही यासाठी का बंद पुकारला होतात? पेट्रोल डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला आहे, रुपयाने निचांक गाठलाय आणि तरीही त्याची भाजपला लाज नाही वाटत. लोकांचा आक्रोश दिसून आलाय.”, असे राज ठाकरे म्हणाले. ...म्हणून ‘भारत बंद’ला पाठिंबा : राज ठाकरे “भारत बंद कोणत्या पक्षाने पुकारला होता हे महत्वाचं नाही. कारण पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ हा विषय महत्वाचा आहे आणि या दरवाढीमुळे महागाई सर्वत्र वाढली आहे आणि म्हणून हा विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही बंदमध्ये सामील झालो.”, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. तसेच, “नोटबंदी, जीएसटी फसली आणि त्यामुळे अर्थव्यवस्था गाळात गेली आणि ती बाहेर काढायला मोदी पेट्रोल-डिझेलवर वाट्टेल तेवढे कर लावत सुटलेत.” असा आरोप राज ठाकरेंनी मोदी सरकारवर केला. निवडणुका जिंकायच्या त्यातून पैसे कमवायचे आणि पुन्हा निवडणुका जिंकायच्या हाच भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, असाही गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. देशाचा प्रमुख हा राजा असावा, व्यापारी नसावा, असा टोलाही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

 • माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आज उत्तम आंदोलन केलं - राज ठाकरे
 • आजचा बंद कुणी पुकारला, हे महत्वाचं नाही, पेट्रोल-डिझेल हा विषय महत्वाचा आहे - राज ठाकरे
 • पेट्रोल-डिझेलचे दर सरकारच्या हातात नाही, मग भाजप विरोधात असताना का आंदोलन करत होती? - राज ठाकरे
 • लोकांचा रोष महाराष्ट्रभर दिसून आला - राज ठाकरे
 • ज्या प्रकारचं राजकारण भाजप खेळतंय, हे त्यांच्याही अंगलट येईल - राज ठाकरे
 • परिणाम दिसायला बाहेर यावं लागतं, राज ठाकरे यांचा शिवसेनेला टोला
 • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही - राज ठाकरे
 • शिवसेनेला स्वत:ची भूमिका नाही, त्यामुळे त्यांना भाव देण्यात काही अर्थ नाही - राज ठाकरे
 • पैश्याची कामं अडली की शिवसेना सत्तेतून बाहेर पडायची धमकी देते आणि कामं झाली की सत्तेत राहते - राज ठाकरे
 • शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी - राज ठाकरे
 • देशाचा प्रमुख राजा असावा, व्यापारी नसावा - राज ठाकरे
 • नोटाबंदी, जीएसटी फसल्याने लोकांच्या खिशात हात - राज ठाकरे
 • हे (मोदी सरकार) काँग्रेसपेक्षा वाईट आहेत, खास करुन दोन माणसं, म्हणजे मोदी आणि शाह  - राज ठाकरे
 • लोकांच्या सुख-दु:खाशी शिवसेनेला काहीही घेणं-देणं नाही - राज ठाकरे
VIDEO : राज ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

आणखी >>

464 धावांचं आव्हान असताना भारताची 3 बाद 58 अशी अवस्था

लंडन : ज्यो रूटच्या इंग्लंडने ओव्हल कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं असून, त्या आव्हानाच्या दडपणाखाली भारताची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडाली आहे. जेम्स अँडरसनने शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना एकाच षटकात पायचीत केलं. मग स्टुअर्ट ब्रॉडने कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था तीन बाद दोन अशी केविलवाणी झाली. त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने भारताचा डाव तीन बाद 58 असा सावरून धरला आहे. ज्यो रूट आणि अॅलिस्टर कूकने झळकावलेली वैयक्तिक शतकं, तसंच त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 259 धावांची भागीदारी यांच्या जोरावर इंग्लंडने ओव्हल कसोटीत आपला दुसरा डाव आठ बाद 423 धावसंख्येवर घोषित केला. त्यात पहिल्या डावातली 40 धावांची आघाडी जमेस धरून, इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडच्या डावात रूटने 125 धावांची, तर कूकने 147 धावांची खेळी उभारली. कूकने अखेरच्या कसोटी डावात झळकावलेल्या शतकाचं टीम इंडियाने खिलाडूवृत्तीने कौतुक केलं. तो बाद होऊन माघारी परतत असताना कर्णधार विराट कोहलीने आणि त्याच्या शिलेदारांनी त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ओव्हलवर उपस्थित प्रेक्षकांनीही उभं राहून टाळ्यांच्या गजरात कूकला मानवंदना दिली.

आणखी >>

2007 हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरण : दोन दोषींना फाशी, एकाला जन्मठेप

हैदराबाद : आंध्र प्रदेशची तत्कालीन राजधानी हैदराबादमधील दुहेरी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोन दहशतवाद्यांना फाशी आणि एकाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. हैदराबादमधील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. शहरात 25 ऑगस्ट 2007 रोजी प्रसिद्ध रेस्टॉरंट गोकुळ चाट आणि लुम्बिनी पार्क येथील एका ओपन एअर थिएटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला होता, तर 68 जण जखमी झाले होते. या अकरा वर्षे जुन्या प्रकरणात चार सप्टेंबर रोजी अनीफ शफीक सैयद आणि मोहम्मद अकबर इस्माईल चौधरी यांना दोषी ठरवलं होतं. हैदराबादमधील द्वितीय अतिरिक्त मेट्रोपॉलिटन सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (प्रभारी) टी श्रीनिवास राव यांनी हा निर्णय दिला होता. सबळ पुराव्यांअभावी फारुख शरफुद्दीन तर्कश आणि मोहम्मद सादिक इसरार अहमद शैक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाने या प्रकरणातील पाचवा आरोपी तारिक अंजुमला सोमवारी दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलिसांच्या आरोपपत्रात उल्लेख असलेले आणखी तीन कुख्यात दहशतवादी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ, त्याचा भाऊ इकबाल आणि आमिर रजा फरार आहेत. मूळचे कर्नाटकचे असलेले भटकळ बंधू पाकिस्तानमध्ये वास्तव्य करत असल्याचं बोललं जातं.

आणखी >>

पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचं पद रद्द होणार, सरकारकडे शिफारस

पुणे : विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांवर राज्यभरात कारवाई सुरु आहे. पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचं रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये भाजपचे पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या या नगरसेवकांचे पद जाणार आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, महापालिका आयुक्तांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांबद्दल अहवाल तयार करण्यास सांगण्यात आलं होतं. आयुक्तांनी सर्व प्रकरणांची पडताळणी करुन पद रद्द करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यामुळे पद रद्द होण्याची आता केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपचे नगरसेवक किरण जठार आरती कोंढरे फरजाना शेख कविता वैरागे वर्षा साठे राष्ट्रवादी नगरसेवक बाळा धनकवडे रूखसाना इनामदार पुणे महापालिकेत भाजपने मोठ्या बहुमताने सत्ता मिळवली होती. त्यामुळे याचा सत्ता समीकरणांवर परिणाम होणार नाही. पद रद्द झालेल्या सदस्यांच्या जागेवर पोटनिवडणुका हाच पर्याय आहे. पोटनिवडणूक झाल्यास ती आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय? महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल अॅक्टच्या कलम 9 अनुसार आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विजयी उमेदवारांना सहा महिन्यात (निवडणुकीवेळी सादर केलेलं नसल्यास) जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने 23 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. या कायद्यातील हे कलम बंधनकारक आहे की नाही याबाबत वाद सुरू होता. जात पडताळणी प्रमाणपत्र आहे, पण ते सहा महिन्यांनंतर सादर करणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी त्याला अशी कालमर्यादा नसल्याचा दावा केला होता. पण कोर्टाने तो मान्य केला नाही. संबंधित बातम्या :

आणखी >>

शिवसेना सत्तेसाठी लाचार, खरा मुखवटा स्पष्ट झाला : अशोक चव्हाण

मुंबई : काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला देशभरातील 21 प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रात या आंदोलनात कुठेही हिंसा झाली नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. शिवाय शिवसेनेवरही त्यांनी निशाणा साधला. भारत बंद मागे घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. इंधन दर कमी करणं हे सरकारच्या हातात नाही, असं म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचाही काँग्रेसने समाचार घेतला. सरकार चालवण्यात मोदी सरकार अपयशी ठरलंय. जे दरवाढ रोखू शकत नाहीत, ते सामान्यांचे प्रश्न कसे सोडवतील, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. बंददरम्यान हिंसा नाही राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष या सर्व पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला. काँग्रेस आणि सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा बंद यशस्वी झाला. आंदोलनादरम्यान कुठेही हिंसा झाली नाही. व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद करुन बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला, असा दावा अशोक चव्हाण यांनी केली. शिवसेनेचा खरा मुखवटा समोर आला काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला विविध प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला असला, तरी शिवसेनेने मात्र यामध्ये सहभाग घेतला नव्हता. यावरुन अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचा आता खरा चेहरा समोर आल्याची टीका केली. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, त्यांचा खरा मुखवटा आता स्पष्ट झाल्याचं ते म्हणाले.

आणखी >>
 • 1