काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

भारत बंद LIVE : इंधन दरवाढीविरोधात भारत बंद

भारत बंद मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. तर देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेससह बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे नेते आज सकाळी आठ वाजताच आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी >>

राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त, वसुंधरा राजेंची घोषणा

जयपूर : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकलेल्या असताना राजस्थानमधील लोकांसाठी खुशखबर आहे. वसुंधरा राजे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील वॅटमध्ये चार टक्क्यांनी कपात केली आहे, ज्यामुळे पेट्रोल-डिझेल प्रति लिटर अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गौरव यात्रेदरम्यान हनुमानगडमधील रावतसरमधील एका सभेत इंधन स्वस्त करत असल्याची घोषणा केली. यानुसार राज्यात पेट्रोलवरील वॅट 30 टक्क्यांहून 26 टक्क्यांवर आणि डिझेलवरील वॅट 22 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दोन हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे. देशभरातील वाढलेल्या इंधन दरांविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी मुख्य शहरांमध्ये नवा उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती आणि रुपयाची घसरण यामुळे इंधन दर वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. आज पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 87.89 रुपये तर डिझेल 77.09 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काळातही पेट्रोल आणि डिझेलचे दररोज वाढणारे दर थांबले होते. आता राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर असताना वसुंधरा राजेंनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या राज्यात निवडणुका त्यांनाच दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आणखी >>

बँक अधिकारी सिद्धार्थ संघवींची नोकरीतील यशामुळे हत्या केल्याचा संशय

नवी मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एका खाजगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची त्यांना नोकरीत मिळत असलेल्या यशामुळे हत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणच्या हजी मलंग येथे सापडला. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ यांची हत्या केल्याचं ताब्यात घेतलेल्या एका आरोपीनेच पोलिसांना सांगितल्याचा दावा करण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांपैकी दोन जण सिद्धार्थ यांचे सहकारी, एक कॅब चालक असल्याचं बोललं जात आहे. तर एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. सिद्धार्थ यांची कमला मिल कम्पाऊंडच्या पार्किंगमध्ये हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही होतं. मात्र ते घरापर्यंत काही पोहोचलेच नाहीत. बराच वेळ ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता. रात्रभर शोधाशोध करुन, वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास चालू केला असता, शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. या गाडीत रक्ताचे डाग होते. अखेर आज नवी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

आणखी >>

राज्यात विविध ठिकाणी बैल धुण्यासाठी गेलेल्या नऊ तरुणांचा बुडून मृत्यू

मुंबई : बैलपोळा राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पण हा सण साजरा करताना अनेक ठिकाणी याला गालबोटही लागलं. बैल धुण्यासाठी पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विविध ठिकाणी घडली. राज्यभरात नऊ तरुणांनी आपला जीव गमावला. औरंगाबाद जिल्ह्यात आज वेगवेगळ्या चार गावात पोळा सणानिमित्त बैल धूत असताना सहा मुलांचा जलसाठ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी बार्शी टाकळी तालुक्यातील चिचखेड येथील ईसापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या धरणात बैल धुण्यासाठी गेलेला युवक बुडाला. गौरव संतोष एकणार असं त्या युवकाचं नाव आहे. गौरव आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान बैल धुण्यासाठी गेला. मात्र पाणी खोल असल्याने तो बुडाला असल्याची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर नागलकर यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात बैल धुण्यासाठी गेलेला 17 वर्षीय तरुण पाटाच्या पाण्यात वाहून गेला. येवला तालुक्यातील पाटोदा येथील घटना आहे. गोकुळ तनपुरे असं या युवकाचं नाव असून तो अकरावीत शिकत होता. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. विशाल ठोंबरे (17) असं मृत तरूणाचं नाव असून माळवटा गावातील आसना नदी पात्रात तो आज सकाळी बैल धुण्यासाठी गेला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मोठी दुर्घटना टळली. अर्धमासला गावचे किसन राऊत हे मानाचा बैल घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना अचानक पाठीमागून येणारे बैल जोरात धावले आणि त्यात अडकून किसन राऊत खाली पडले. यावेळी त्यांच्या अंगावरून काही बैल गेल्याने ते गंभीर जखमी झाले. प्रसंगावधान राखून त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना बाहेर ओढलं आणि जखमी अवस्थेत तात्काळ गेवराईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या डोक्याला इजा झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

आणखी >>

चंद्रकांत पाटील यांच्यात सहनशीलता राहिली नाही : अजित पवार

आणखी >>

सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या अफवांवर पती गोल्डी बहल संतापले

मुंबई : बॉलिवूड

आणखी >>

वधू व्हॉट्सअॅपवर खूप वेळ घालवते, वरपक्षाने लग्न मोडलं!

लखनौ : वधूचं रंग-रुप, अपंगत्व, अफेअर अशा कारणांमुळे लग्न मोडल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र तरुणी व्हॉट्सअॅपवर चॅटिंगमध्ये बराच वेळ वाया घालवत असल्याच्या कारणावरुन वरपक्षाने लग्न मोडल्याची घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोही जिल्ह्यातील नौगाव सदात गावात ही घटना घडली. लग्नाच्या दिवधी वधू आणि तिचे नातेवाईक नवरदेवाची वाट बघत होते. मात्र वरातीऐवजी वरपक्षाकडून फोन आला तो लग्न मोडल्याचा. व्हॉट्सअॅपवर वेळ घालवण्याच्या तरुणीच्या सवयीमुळे हे लग्न मोडत असल्याची सबब सांगण्यात आली. वरपक्षाने ऐनवेळी केलेली हुंड्याची मागणी धुडकावल्यामुळे लग्न मोडल्याचा दावा वधूपक्षाने केला आहे. सासरच्या मंडळींनी 65 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याची तक्रार वधूपित्याने पोलिसांकडे केली आहे. 'तरुणी व्हॉट्सअॅपचा अतिरिक्त वापर करत होती. ती लग्नाच्या आदल्या दिवशीही आम्हाला सारखे व्हॉट्सअॅप करत होती. तिच्या या सवयीमुळे आम्ही वैतागलो होतो' असा आरोप वरपित्याने केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आणखी >>

पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका कायम

मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. आज पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 87.89 रुपये तर डिझेल 77.09 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. राज्याच परभणीत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. या 

आणखी >>

कोंबडी पळाली, 'चार तंगड्यां'वर नाचायला लागली

पिंपरी : एक कोंबडी विकत घेतलीत, तर किती 'लेग पीस' मिळतात? हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. मात्र पिंपरी-चिंचवडकर सध्या या प्रश्नाचं 'चार' असं उत्तर देत आहेत. कारण निगडीतल्या एका चिकन शॉपमध्ये चक्क चार पायांची कोंबडी सापडली आहे. निगडीतील तन्वीर चिकन शॉप मध्ये नेहमीप्रमाणे शंभर-सव्वाशे कोंबड्या आल्या. दुकान मालक कुदबुद्दीन होबळे हे हॉटेलला चिकनचा पुरवठा करत असल्यामुळे सकाळीच कोंबड्या हलाल करणं सुरु झालं. तितक्यात एका कसायाने कुदबुद्दीन यांना कोंबडीला चार पाय असल्याचं सांगितलं. कुदबुद्दीन यांनी कसायाला दोन शब्द सुनावले आणि चेष्टा सोडून कामाकडे लक्ष द्यायला सांगितलं. शेवटी कसायाने ती कोंबडी बाहेर आणून कुदबुद्दीन यांना दाखवली, मग काय मालकसुद्धा अचंबित झाले. तीस वर्षांच्या व्यवसायात पहिल्यांदाच चार पायाची कोंबडी पाहिल्याने, त्यांना ही यावर विश्वासच बसेना. बघता-बघता ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आणि आबालवृद्धांनी ही कोंबडी पाहण्यासाठी गर्दी केली. कसायाला चार पाय दिसले आणि या कोंबडीचं नशीबच फळफळलं. मालक कुदबुद्दीन यांच्याकडून आता या कोंबडीला विशेष सेवा मिळत आहे.सकाळी पिंजऱ्यात ठेवलेल्या सर्व कोंबड्या हलाल झाल्या पण 'ती' ला मात्र मालकाने जपून ठेवलं आहे.

आणखी >>

उंटांची अवैधरित्या वाहतूक, उस्मानाबादजवळ 14 उंटांसह ट्रक जप्त

औरंगाबाद/उस्मानाबाद : अवैधरित्या उंटांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी उस्मानाबादजवळ जप्त केलाय. या ट्रकमध्ये 14 उंट होते, राजस्थानमधून आणलेल्या उंटांपैकी दोन उंटांचा प्रवासातच मृत्यू झाला. तर उर्वरित उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येत होते, अशी माहिती आहे. राजस्थानहून आणलेले हे उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून उस्मानाबादजवळ ट्रक अडवला. पोलिसांनी अडवलेल्या या ट्रकमध्ये 14 उंट होते. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन गाड्यांमध्ये 27 उंट होते. यातील एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यातील 14 उंटांपैकी दोन उंटांचा वाहतुकीदरम्यान मृत्यू झाला आहे. तर तीन उंट गंभीर जखमी आहेत. विश्व हिंदू परिषदेला याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय. पोलिसांकडून आता दुसऱ्या ट्रकचा शोध घेतला जात आहे. उंटांची अशा पद्धतीने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने यामागे एखादं मोठं रॅकेट आहे का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

आणखी >>

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा पुण्यात समारोप, लोकांचा चालू सभेतून काढता पाय

पुणे : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप पुण्यात झाला. समारोपाची सभा सायंकाळी पाच वाजता सुरु होणार होती, मात्र ती सहा वाजता सुरु झाली. ताटकळलेल्या उपस्थितांनी राज्यातील नेत्यांची भाषणं झाल्यानंतर मैदानातून काढता पाय घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. काँग्रेस पक्षातील राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं भाषण सुरू असताना लोक निघून जात असल्याचं पाहायला मिळालं. अनेक खुर्च्या रिकाम्या होत असतानाही आझाद यांचं भाषण सुरू होतं. कोल्हापुरातून 31 ऑगस्टला सुरु झालेली ही जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर आणि पुढे पुण्यात पोहोचली. पश्चिम महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याची समारोप सभा पुण्यात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सनातनच्या जयंत आठवलेंना अटक करा : विखे पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी संबंध आहेत का, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून करण्यात आली. सनातन संस्थेवर बंदी घाला आणि या संस्थेतील जयंत आठवलेंना अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. अशोक चव्हाणांचा सरकारवर निशाणा आमच्या मुली, बहिणी सुरक्षित नाहीत. प्रशांत परिचारक यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. माज उतरवायला सामान्य जनता आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी सरकारवर टीका केली. 100 नगरसेवक, 8 आमदार आणि एक खासदार पुण्यात आहे, पण शहरात खंडणी वसुली होत आहे, मर्सिडीज गाड्या भेट देत आहेत. मर्सिडीज गाडी खंडणी म्हणून वापरली जाते. पुणे सांस्कृतिक राजधानी होती, आता टोळीयुद्ध होत आहे, असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला. आधी आम्हाला विचारायचे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.. फडणवीस साहेब 'खड्ड्यात नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा'. 10 तारखेला देशात बंद आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्याविरोधात हा भारत बंद असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. दरम्यान, भाजप आमदारांच्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एक शब्द काढला नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांवर निशाणा साधला. शिवाय भाजप महिला आमदारांना विचारतो, तुम्ही तुमच्या मतदारसंघात राम कदम यांना समर्थन करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

आणखी >>

एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : पाटील

सिंधुदुर्ग : एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल, अशी ऑफर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. युतीबाबतच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील आज (08 सप्टेंबर) सिंधुदुर्गात बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की,

आणखी >>

कोकणची वाट लावणारे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न : राज ठाकरे

मुंबई : विध्वसंक प्रकल्प कोकणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, तुम्ही सावधान राहा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. जमीन हातातून गेली की अस्तित्त्व संपलं कोकणातील जमिनीबाबत राज ठाकरे म्हणाले की, 

आणखी >>

कर्जबुडव्या मल्ल्याची भारत-इंग्लंड कसोटी पाहण्यासाठी हजेरी

लंडन : भारतीय बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावणारा विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मल्ल्याची मुजोरी दिसून आली. एएनआयच्या प्रतिनिधीने मल्ल्याला प्रश्नही विचारला की, भारतात कधी परतणार? याचा निर्णय न्यायाधीश घेतील, असं उत्तर मल्ल्याने एएनआयच्या प्रतिनिधीला दिलं. भारताकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तो अद्याप इंग्लंडमध्येच आहे.

आणखी >>

पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा परवाना रद्द करणारा अधिकारी निलंबित

मुंबई: साखर कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे कामगारांना जीव गमवावा लागल्याने, कारवाई करणाऱ्या एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांचंच निलंबन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कारखान्यावर कारवाई झाली होती, तो कारखाना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचा परवाना रद्द करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन तर केलंच, पण कारखान्याचा परवानाही पूर्ववत केला.

आणखी >>

अंगाला तेल लावून अर्धनग्न अवस्थेत घरात घुसणारा विकृत जेरबंद

पणजी : महिलांची अंतर्वस्त्र आणि किरकोळ रक्कम चोरणाऱ्या मानसिक विकृताला पणजी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुळशीदास शिरोडकर असं या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याच्या अटकेमुळे गेल्या दोन महिन्यापासून गोव्यातील ताळगाव टेकडीवरील उच्चभ्रू होरायझन कॉम्पेक्समध्ये दहशहतीखाली वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अंगाला तेल लावून केवळ अंडरवेअर घालणारा हा आरोपी मध्यरात्री मध्यरात्री महिलांच्या खोलीत शिरुन विकृत चाळे करायचा. खिडकीतून घरात घुसल्यानंतर तो महिलांची अंतर्वस्त्रे घेऊन पळून जायचा. मौल्यवान वस्तूंना त्याने हात लावत नसला तरी काहीवेळा किरकोळ रक्कम त्याने लांबवली होती. या विकृतामुळे ताळगावातील उच्चभ्रू वस्तीमधील नागिरक गेल्या दोन महिन्यांपासून काळ्या मानवी आकृतीची धास्तीखाली दिवस काढत होते. काही भाडेकरुंनी तर भीतीने फ्लॅटसुद्धा सोडले होते. यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी अखेर पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार, हा माणूस रात्री उशिरा 3.30च्या सुमारास ताळगाव टेकडीवर असलेल्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये शिरुन विकृत चाळे करायचा. खिडकीच्या काचा सरकवून तो आत शिरायचा. अंगाला तेल लावलेला हा आरोपी अर्धनग्न अवस्थेत असायचा. झोपलेल्या महिला पाहून तो निघून जायचा. तर काहीवेळा घरातील महिलांची अंतर्वस्त्रे पळवून न्यायचा. अडवपाल रेसिडेन्सीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार एकदा नव्हे तर बऱ्याच वेळा घडला आहे. घरातील लोकांनी त्याला दोन वेळा पाहिले होते. परंतु तो कधीच कोणाच्या हाती लागला नव्हता. तो आल्या मार्गे पुन्हा बाहेर पडून पसार होत असे. पणजी पोलिसांनी तक्रारीमधील वर्णनानुसार तपास सुरु केला. महिलांची अंतर्वस्त्र आणि किरकोळ रक्कम चोरुन नेणारा मानसिक विकृत असू शकेल याची कल्पना आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवली. त्यात ताळगाव इथल्या 35 वर्षीय तुळशीदास शिरोडकरपर्यंत धागेदोरे सापडले. शेवटच्या घटनेवेळी एक माणूस अंडरवेअरवर पहाटे तीनच्या सुमारास अडवलपालकर रेसिडेंसीमधून बाहेर पडताना एका टॅक्सी चालकाने पाहिले होते. रहिवाशांनी केलेले वर्णन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुळशीदासला त्याच्या घरातून अटक केली असून त्याच्या घरात घटनांशी संबंधित साहित्यही सापडलं आहे. पणजी पोलिस मनोविकार तज्ज्ञांच्या मदतीने त्याची वैद्यकीय तपासणी करणार असून आज ओळख परेड करुन त्याच्याविरोधात असलेल्या तक्रारी पडताळून पाहणार आहेत. पणजी पोलिसांनी संशयिताला गजाआड केल्यामुळे दोनापावल, ताळगावमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आणखी >>

आव्हाडांची सुरक्षा कमी का केली? धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा एटीएसने खुलासा केल्यानंतरही त्यांची सुरक्षा कमी का केली असा जाब विचारणारं पत्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. आव्हाडांच्या खुनाच्या कटात सरकारचे संगनमत आहे काय? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाचं बरं-वाईट झालं तर याला पूर्णत: सरकार जबाबदार असेल, असंही मुंडेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसंच आव्हाडांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस पाऊलं उचलावीत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. पत्रात काय लिहिलं आहे? जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करवी, यासंदर्भात मी यापूर्वीही तुम्हाला विनंती केली होती. त्यांच्या घराची रेकी झाल्याचंही सांगितलं. तरीही काही महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली. सुरक्षाव्यवस्था कमी करताना राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल विचारात घेतला जातो. एकीकडे एटीएसने न्यायालयात आव्हाड हिटलिस्टवर असल्याचं सांगूनही गुप्तचर यंत्रणेने त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट होत आहे.

आणखी >>

अमरावती शतकापासून 11 रुपये दूर, पेट्रोल 89.03 रुपये!

मुंबई: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा पराक्रम आजही कायम आहे. या महिन्यात सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ झाली. पेट्रोल आज 39 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 87 रुपये 77 पैशांवर तर डिझेल 76 रुपये 98 पैशांवर पोहोचला आहे. तर अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.03 रुपये इतका आहे. शंभरी गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. काल पेट्रोल 48 पैशांनी, तर डिझेल 55 पैशांनी महागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधीपक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनीदेखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं. 7 दिवसात पेट्रोल 1 रु 69 पैशांनी महागलं गेल्या सात दिवसात पेट्रोल सातत्याने महागतंय. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.77 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1 रुपये 69 पैशांची वाढ झाली आहे. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद  दुसऱ्या क्रमांकावर आहेत. महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर मुंबई –  पेट्रोल – 87.77,   डिझेल – 76.98 पुणे –  पेट्रोल – 87.57,    डिझेल – 75.60 ठाणे – पेट्रोल -            डिझेल - नाशिक – पेट्रोल -88.15,   डिझेल – 76.16 औरंगाबाद – पेट्रोल -  88.82,   डिझेल – 78.04 नागपूर –  पेट्रोल -  88.26,    डिझेल – 77.50 कोल्हापूर - पेट्रोल -  87.95,   डिझेल – 75.99 सोलापूर –  पेट्रोल -  88.82,   डिझेल – 77.60 अमरावती – पेट्रोल – 89.03,    डिझेल – 78.27 सिंधुदुर्ग – पेट्रोल – 88.69,     डिझेल – 76.70 अहमदनगर –  पेट्रोल – 87.62  डिझेल – 75.66 पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याची गरज पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणाय़ला हवं असं मत केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. इंधन दरवाढीमुळं लोकांना त्रास सहन करावा लागतोय याची जाणीव असल्याचंही प्रधान म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरण्यामागंही इंधनदरवाढ हे महत्वाचं कारण असल्याचं धर्मेंद्र प्रधानांनी सांगितलं. संबंधित बातम्या

आणखी >>

ईशांत, बुमरा, जाडेजाची वेसण, दिवसअखेर इंग्लंडच्या 7 बाद 198 धावा

लंडन: भारताच्या जसप्रीत बुमरानं इंग्लंडच्या अॅलिस्टर कूक आणि ज्यो रुटला एकाच षटकात माघारी धाडून ओव्हलच्या पाचव्या कसोटीला कलाटणी दिली. भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसअखेर एक बाद 133 धावांवरुन सात बाद 198 अशी झाली. भारताकडून ईशांत शर्मानं तीन, तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडच्या डावात अॅलिस्टर कूकनं कीटन जेनिंग्सच्या साथीनं सलामीला 60 आणि मोईन अलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं इंग्लंडला 63 षटकांत 133 धावा जमवता आल्या होत्या. त्याच धावसंख्येवर बुमरानं कूक आणि रूटला माघारी धाडून खेळाची सूत्रं टीम इंडियाच्या हाती आणून दिली. त्यामुळं पुढच्या 27 षटकांत इंग्लंडनं अवघ्या 65 धावांत सहा विकेट्स गमावल्या.

आणखी >>

सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली, राम कदम पुन्हा ट्रोल

मुंबई : मुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम पुन्हा अडचणीत सापडले आहे. कॅन्सरवर अमेरिकेत उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबद्दल ट्वीट केल्याने, राम कदम यांना सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. राम कदम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दुपारी दोनच्या सुमारास अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या मृत्यूचं ट्वीट पोस्ट केलं.

आणखी >>

महिलांविषयी बेताल वक्तव्य, राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा

मुंबई : महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बार्शीमध्ये राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कलम 405, 505 ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे. कदम यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र आता पोलिस काय कारवाई करतात याकडे महिलावर्गासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

आणखी >>

पुण्यात दहा लाख बेशिस्त वाहनचालकांना 22 कोटींचा दंड

पुणे : पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आले आहेत. मात्र आपल्यासाठी हा नियम नाही अशा अर्विभावात पुणेकर झेब्रा क्रासिंगवरील स्टॉप लाइनच्या पुढे आपली वाहने दामटवतात. वाहतुकीचे असेच नियम पायदळी तुडवणाऱ्या पुणेकरांकडून या वर्षात 22 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनचालकांकडून कित्येक वेळा वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडले जातात. नियमांना वाट दाखवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. गेल्या आठ महिन्यांत दहा लाख वाहनधारकांकडून 22 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणाऱ्या तीन लाख 37 हजार 384 वाहनधारकांना सात कोटी रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. तर हेल्मेट न घालणाऱ्या 37 हजार दुचाकीस्वारांकडून दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. लेनचा नियम न पाळणाऱ्या 354 वाहनधारकांना 71 हजारांचा दंड करण्यात आला. तर सिग्नल तोडणे आणि इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी 12 कोटींचा दंड ठोठावला गेला आहे. नियम मोडल्यानंतरही आपली चूक मान्य करतील, तर ते पुणेकर कसले? उलट वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यात ते धन्यता मानतात. बेशिस्त पुणेकरांना नियमांचं महत्व कळावं, यासाठी वाहतूक पोलिसांनी एक अफलातून प्रयोग केला. एका कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या प्रत्येक नियमाचं पालन करत कात्रज ते शिवाजीनगर असा प्रवास केला, तर दुसऱ्याने तोच प्रवास नियमांचं उल्लंघन करत केला. नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्याला या प्रवासासाठी 24 मिनिटं लागली, तर नियमांचं पालन करणाऱ्या कर्मचाऱ्याला 28 मिनिटांचा कालावधी लागला. त्यामुळे अवघ्या 4 ते 5 मिनिटांसाठी स्वत:च्या आणि इतरांच्या जिवाशी खेळणं, कितपत योग्य आहे? हा प्रश्न उरतोच. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढती संख्या... यामुळे वाहतूक कोंडी हे पुणेकरांचं दुखणं झालं आहे. मात्र नियम वाहनांच्या चाकाखाली तुडवणं, हा यावरचा उपाय नाही. सर्वांनी मिळून वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं ठरवलं, तर वाहतूक कोंडीवर मार्ग निघू शकेल.

आणखी >>

अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!

केनिंग्टन ओव्हल (लंडन) : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं ओव्हल कसोटीत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाचही कसोटी सामन्यात नाणेफेक हरण्याचा अनोखा विक्रम विराटच्या नावावर जमा झालाय. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचहीवेळा नाणेफेकीचा कौल गमावणारा तो भारताचा आजवरचा तिसरा कर्णधार ठरला. या मालिकेत नाणेफेकीच्या वेळी पाचही वेळा विराटनं छापा (हेड्स) मागितला होता. मात्र पाचही वेळा काटाच (टेल्स) पडला आणि नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. याआधी 1948-49 साली वेस्ट इंडिजविरुद्ध लाला अमरनाथ यांनी पाचही सामन्यात नाणेफेक गमावली होती. त्यानंतर 1982-83 साली वेस्ट इंडिज दौऱ्यात कपिल देव यांच्यावरही अशीच वेळ ओढवली होती. भारताकडून सलग पाच कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकणारे टायगर पतौडी हे एकमेव कर्णधार आहेत. 1963 साली पतौडींनी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्धच सलग पाच वेळा नाणेफेक जिंकली होती.

आणखी >>

पेट्रोल-डिझेलची लांब उडी, इंधन दरात मोठी वाढ

मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहेत. कारण आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोल 87.39 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 76.51 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. काल पेट्रोलमध्ये 19 पैशांनी तर डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली होती. आज त्यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली. या

आणखी >>

एटीएसची पुन्हा कारवाई, जळगावातून एक जण ताब्यात

जळगाव: दहशतवादी विरोधी पथकाने जळगाव जिल्ह्यातील साकळी गावातून एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेल्याची माहिती एटीएसनं तरुणाच्या नातेवाईकांना दिली. पथकाने या युवकाच्या घराची जवळपास अडीच ते तीन तास झाडाझडती घेतली. कोणत्या प्रकरणाबाबत एटीएसनं कारवाई केलीय, याची प्रचंड गोपनीयता एटीएसनं बाळगली आहे. शिवाय त्याच्या घरातून पथकास काय आक्षेपार्ह आढळले याची माहिती पथकाने दिली नाही. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या युवकाचा दुचाकीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. एटीएसच्या कारवाईचं हे वृत्त हळूहळू साकळीसह यावल तालुक्यात समजताच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.  या तरुणाला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतलं असावं, इतक्या वेळ बंद घरात काय चौकशी आणि पाहणी केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ज्या तरुणाला ताब्यात घेतलंय, तो मूळचा रमुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील हिवासी आहे. त्याचं मोटारसायकल गॅरेज आहे. संबंधित बातम्या 

आणखी >>

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची 10 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीचा भडका उडाल्यामुळे काँग्रेसने 10 सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घट या प्रश्नांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात हल्लाबोल चढवला. 10 सप्टेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत 'भारत बंद' ठेवण्याचं आवाहन काँग्रेसने केलं आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. जनतेमध्ये आक्रोश आहे. भारत बंद ठेवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे, असं काँग्रेस नेते अशोक गेहलोत म्हणाले. 11 लाख कोटी रुपयांच्या 'फ्यूएल लूट'विरोधात काँग्रेस जन आंदोलन छेडणार आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पेट्रोल, डिझेलसह एलपीजीच्या किमती दुपटीने वाढल्याचा उल्लेख केला. दूध दरापासून प्लॅटफॉर्म तिकिटापर्यंत सर्वच गोष्टींचे भाव वधारल्याचंही सुरजेवाला म्हणाले. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत असल्याचंही ते म्हणाले. पेट्रोलचे दर प्रतिलीटर 79.51 रुपयांवर, तर डिझेल 71.55 रुपयांवर पोहचलं आहे.

आणखी >>

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या तोंडावर येऊन ठेपल्या असताना, भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळ्यांनाच धक्का देणारी घोषणा केली आहे. यापुढे कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. कोल्हापुरात ‘गणराया’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. या भाषणात चंद्रकांत पाटलांनी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली. मी यापुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “मला ना लोकसभा, ना विधानसभा, ना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही.” चंद्रकांत पाटील हे राज्य भाजपमधील अत्यंत मोठे नेते असून, राज्य मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे महत्त्वाची मंत्रिपदं आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री अशी तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपलं सार्वजनिक आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपच्या माध्यमातून केले. 2004 साली भाजपमध्ये प्रवेश करत, त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. पुढे 2013 साली चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 2014 मध्ये ते विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 साली राज्यात सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. सध्या त्यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण खाती असून, राज्य मंत्रिमंडळातून वजनदार मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

आणखी >>

“महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी”

बारामती : महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिला आहे. इंदापूर दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळेंनी राम कदमांच्या बेताल वक्तव्यासंदर्भातही भाष्य केलं. खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सकाळपासून त्या तालुक्यातील गावांना भेटी देत होत्या. त्यावेळी तालुक्यातील हिंगणगाव येथील एका सभेत बोलताना त्यांनी राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेत असणारा एक आमदार जर महिलांना व मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, तर यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय, “संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” असेही त्या म्हणाल्या. “मुख्यमंत्र्यांनी जाहीर निषेध करायला हवाय, त्यांनी स्वतः या विषयावर दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. जर दिलगिरी  व्यक्त करता येत नसेल, तर या आमदारावर ॲक्शन घ्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. शिवाय, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना झेपत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महिलांच्या सुरक्षेचं काय करायचे, ते आम्ही बघू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी, “महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे”, असा इशाराही दिला. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

आणखी >>

राम कदम यांचं प्रवक्तेपद धोक्यात येण्याची शक्यता

मुंबई : महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचं प्रवक्तेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रवक्ता म्हणून कोणत्याही वाहिनीवर न जाण्याच्या सूचना राम कदम यांना भाजपने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाची थेट बदनामी होत असल्यामुळे राम कदम यांचं प्रवक्तेपद काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केवळ राम कदम यांना पक्षाकडून तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. राम कदम यांच्या वक्तव्याला 72 तास झाल्यानंतर भाजपने केवळ कारवाईचे संकेत दिले आहेत. विधिमंडळाच्या नियमांनुसार राम कदम यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? 1) राम कदम यांच्या निलंबनाचा अशासकीय प्रस्ताव सभागृहात आणावा लागेल. हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी मान्य केला तर तो सभागृहात बहुमताने सिद्ध करावा लागेल. 2) विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहता विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेचा साथ मिळाली तर राम कदम यांच्यावर कारवाई होऊ शकते. भाजप - 122 रासप - 1 बहुजन विकास आघाडी - 3 अपक्ष - 7 ------- एकूण = 133 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी काँग्रेस - 41 शेकाप - 3 एमआयएम - 2 मनसे - 1 सपा - 1 भारिप - 1 माकप - 1 ------- एकूण = 155 3) सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठित करुन शिक्षेच्या पुढील शिफारशी करण्यात येतील. -  विशेषाधिकार भंग, - कारावासाची शिक्षा, - निलंबन करणे - सदस्यत्व कायमचे रद्द करणे चौकशी पूर्ण करुन अहवाल सभागृहासमोर ठेवला जाईल. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

आणखी >>

राम कदम यांची जीभ छाटा, पाच लाख रुपये मिळवा : सुबोध सावजी

बुलडाणा : घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता बुलडाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राम कदमांबाबत चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. राम कदम यांची जीभ छाटून आणा आणि पाच लाख रुपये घेऊन जा, असं वक्तव्य सुबोध सावजी यांनी केलं आहे. राम कदम यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात संताप उफाळला आहे. अनेकांनी राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतलं, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन त्यांच्या प्रतिमेचं दहन केलं. जोडेमारो, बांगड्यांची माळ, चपलेचा हार अशा सर्व मार्गांनी चीड व्यक्त केली. आता सुबोध सावजी यांनी राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

आणखी >>
  • 1