काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

आशिया चषकात टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

मुंबई : सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी आज 16 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी  विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. दुखापतीतून सावरलेला केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, अंबाती रायुडू यांचंही आशिया चषकातून पुनरागमन होणार आहे. तर राजस्थानच्या खलील अहमद या युवा खेळाडूचंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होत आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर आणि खलील अहमद आशिया चषकाचं वेळापत्रक आशिया चषकातील गतविजेता भारतीय संघ यावेळच्या मालिकेत 19 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचं मालिकेत खेळणं निश्चित आहे. मात्र उर्वरित स्थानांसाठी यूएई, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. क्वालीफायर सामन्यांनंतर या संघांपैकी कोण जागा मिळवतं, ते निश्चित होईल. अ गटात भारत, पाकिस्तान, क्वालिफायर करणारा संघ आणि ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांना स्थान मिळालं आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला असेल. प्रत्येक गटातील टॉपला असलेले दोन संघ सुपर चारसाठी क्वालीफाय होतील. त्यानंतर या सामन्यांमधील विजेत्या संघांमध्ये चषक विजयासाठी लढत होईल. आशिया चषकाचं वेळापत्रक ग्रुप राऊंड 15 सप्टेंबर : बांगलादेश वि.श्रीलंका (दुबई) 16 सप्टेंबर : पाकिस्तान वि. क्वालीफायर (दुबई) 17 सप्टेंबर : श्रीलंका वि. अफगाणिस्तान(अबु धाबी) 18 सप्टेंबर : भारत वि. क्वालीफायर (दुबई) 19 सप्टेंबर : भारत वि. पाकिस्तान (दुबई) 20 सप्टेंबर : बांगलादेश वि. अफगाणिस्तान (अबु धाबी) 21 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट अ उप विजेता (अबु धाबी) 23 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट अ उप विजेता (दुबई), गट ब विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी) 25 सप्टेंबर : गट अ विजेता वि. गट ब विजेता (दुबई) 26 सप्टेंबर : गट अ उप विजेता वि. गट ब उप विजेता (अबु धाबी) 28 सप्टेंबर : फायनल (दुबई)

आणखी >>

सरकार भाजपचं, पण 'साखर पेरणी' राष्ट्रवादीची

उस्मानाबाद : राज्यात सरकार भाजपचं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर पेरणीला कुठेही आडकाठी आलेली नाही. राज्यातले सहकारी साखर कारखाने विक्री न करता भाडेतत्वावर द्यायचा निर्णय झाला. त्या निर्णयाचा राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा होताना दिसतोय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूमचा बाणगंगा सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी चालवायला घेतला. परळीच्या वैद्यनाथ बँकेने केलेल्या लिलावात राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सहकाऱ्यांनी दिलीप आपेट यांचा खाजगी कारखाना तब्बल 55 कोटी रुपयांना विकत घेतला. त्याआधीच काही दिवस राणा पाटील यांना किल्लारीच्या सहकारी साखर कारखान्यावर कब्जा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात सरकार भाजपचं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर पेरणीत कुठेही आडकाठी आलेली नाही असं एकंदरीत चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच दिलीप आपेट यांच्या मालकीच्या शंभूमहादेव या खाजगी साखर कारखान्याचा लिलाव पार पडला. या लिलावात उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह आणि मुरुडचे दिलीप नाडे यांनी हा कारखाना 55 कोटी रुपयांना खरेदी केला. राणा जगजित सिंह यांच्याकडे हा दुसरा कारखाना झाला आहे. या आधी किल्लारीच्या कारखान्यावरही राणा जगजीत सिंह यांनी बोली लावली होती.

आणखी >>

दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पुण्यात तरुणाची हत्या

पुणे : दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन झालेल्या वादातून पाच जणांनी एकावर तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड भागातील माणिकबाग परिसरातील मध्यरात्रीची ही घटना आहे. अक्षय गडशी (वय 23) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी निलेश चौधरी, सागर दारवडकर आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय आणि आरोपी एकाच भागातील आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी आणि अक्षय यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरून वाद झाला होता. त्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने मध्यरात्री माणिकबाग येथील पेट्रोल पंपासमोर अक्षयला गाठून त्याच्यावर तलवारीने वार करून त्याची हत्या केली. शहरात दहीहंडी मंडळाकडून मोठ-मोठे शुभेच्छा आणि आयोजित कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जात आहेत. त्यातून दोन गटात किरकोळ वादही होत आहेत. मात्र, शनिवारी मध्यरात्री याच वादातून थेट तरुणाला संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आणखी >>

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधून 56 कंपन्यांचं स्थलांतर

पुणे : वाहतूक कोंडीमुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून कंपन्या काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहेत.  हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा  बोजवारा उडाल्यामुळे आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहा बहुराष्ट्रीय कंपन्या आणि 50 लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतर केल्याचं समोर आलं आहे. एकीकडे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, तर दुसरीकडे पायाभूत सुविधांमुळे कंपन्या स्थलांतर करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातून जाऊन हिंजवडीत काम करायचं म्हणजे आठ तासांच्या शिफ्टचा निम्मा वेळ म्हणजे साडे तीन ते चार तास फक्त प्रवासात जातात. त्यामुळे कंपनीतील अधिकाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय कंपन्यांचे सेमिनार किंवा इतर कार्यक्रमही हिंजवडीत घेता येत नाहीत. या कंपन्या आपले कार्यक्रम इतर शहरांमध्ये आयोजित करतात. कारण, वाहतूक कोंडीमुळे हिंजवडीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणं शक्य होत नाही. गेल्या दोन वर्षांत हिंजवडी आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या अनुक्रमे बालेवाडी आणि खराडी येथे स्थलांतरित झाल्या होत्या. त्यातच आता आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच ते सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. तर पन्नासच्या आसपास लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी, तीर्थ आयटी टेक्नो स्पेस आणि पुण्यालगतच्या अन्य भागात स्थलांतरित झाल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी पार्कमधील त्यांचे ऑफ शोअर डेव्हलपमेंट सेंटर (ओएसडीसी) बंद केले आहे. वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीत येण्यास उशिर होतो. कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांच्या इंधनावरही मोठा खर्च होत आहे. छोट्या कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांचं स्थलांतर हा रोजगाराच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

आणखी >>

कसोटी क्रिकेटमध्ये जलद 6 हजार धावा, विराट दुसरा भारतीय

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या साऊदम्प्टन कसोटीत अँडरसनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. या कामगिरीसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद सहा हजार धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला. गावस्कर यांनी 117 डावांत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराटने 70 कसोटी सामन्यांतल्या 119 डावांत ही कामगिरी करुन दाखवली. कसोटी क्रिकेटमध्ये जलद सहा हजार धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज : सुनील गावस्कर – 117 डाव विराट कोहली – 119 डाव सचिन तेंडुलकर – 120 डाव वीरेंद्र सेहवाग – 123 डाव राहुल द्रविड – 125 डाव

आणखी >>

बदली नाही तर घटस्फोटाला मदत करा, शिक्षक दाम्पत्य आक्रमक

मुंबई/नांदेड : वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शाळांमध्ये बदली झाल्यामुळे तब्बल 275 शिक्षक दाम्पत्यांनी जवळपासच्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. बदली देणार नसाल, तर घटस्फोट घेण्यासाठी मदत करा अशी टोकाची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. शबनम शेख हदगाव तालुक्यातील मार्लेगावच्या प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका म्हणून काम करतात. पहिली ते चौथीच्या मुलांना शिकवतात, तर पती बंदेनवाज लातूर जिल्ह्यात शिक्षक आहेत. शबनम यांनी 2008 मध्ये एकाच जिल्ह्यात बदली मिळावी म्हणून अर्ज केला. त्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही. शबनम आणि बंदेनवाज यांना एका मुलगा आणि एक मुलगी आहे. शबनम मुलीसह नांदेडमध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. मुलाला वसतिगृहात पाठवलं आहे. पती लातूर जिल्ह्यात. कुटुंब फक्त नावालाच उरलं आहे. राज्यभरात अशी अनेक शिक्षक दाम्पत्यं आहेत, ज्यांच्या कुटुंबाची अशी वाताहात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी 250 शिक्षक पती पत्नींनी तृप्ती देसाईंच्या नेतृत्वात पंकजा मुंडेंची भेट घेतली. बदली देणार नसाल, तर घटस्फोट घेण्यासाठी मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात विनंती बदल्यांसाठी तब्बल 275 शिक्षक प्रतीक्षेत आहेत. यावरुन राज्याची अवस्था काय असेल याचा अंदाज येतो. वर्षानुवर्ष फक्त करिअरसाठी दूर राहून मनस्वास्थ्य, कुटुंब कसं टिकेल? मुलांची शिक्षणं, त्यांचं आयुष्य समृद्ध कसं होईल? असे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. पण यंत्रणेतल्या कागदपत्रांना, लालफितीला किंवा सरकारी बाबूंना असे भावनात्मक प्रश्न पडत असतील यावर विश्वास बसत नाही.

आणखी >>

नालासोपारा स्फोटकं: आव्हाडांसह चौघे हिट लिस्टवर होते: एटीएस

मुंबई: नालासोपारा शस्त्रसाठ्यानंतर एटीएसनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रितू राज यांची नावं हिटलिस्टवर होती, असा दावा एटीएसने न्यायालायात केला. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसनं मुंबई सत्र न्यायालयात हा गौप्यस्फोट केला. आज अविनाश पवार या आरोपीला न्यायालयात हजर केलं. त्याच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने यापूर्वीच्या तपासात काय काय चौकशी केली, काय माहिती मिळाली, ते सांगा त्यानंतर कोठडी वाढवण्याची मागणी करा, असं बजावलं. त्यावेळी एटीएसने जितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोळकर आणि रितू राज यांची नावं पकडण्यात आलेल्या आरोपींच्या हिटलिस्टवर होती. त्यांना मारण्याचा किंवा त्यांना लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती एटीएसने कोर्टात दिली. कोण आहे अविनाश पवार? नालासोपाऱ्यातील स्फोटकांप्रकरणी मुंबईतील माझगाव डॉकमधून अविनाश पवार नावाच्या व्यक्तीला दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी (24 ऑगस्ट) रात्री बेड्या ठोकल्या. स्फोटक प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी वैभव राऊत (9 ऑगस्ट), शरद कळसकर (10 ऑगस्ट), सुधन्वा गोंधळेकर (10 ऑगस्ट) आणि श्रीकांत पांगारकर (18 ऑगस्ट) यांना अटक करण्यात आली होती. या चौघांच्या चौकशीत अविनाश पवारचं नाव आल्यानंतर एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या. संबंधित बातम्या

आणखी >>

भटक्या कुत्र्याचा बाळावर हल्ला, तुटलेले कान कॅरीबॅगमध्ये घेऊन रुग्णालयात

सोलापूर: राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव काही कमी व्हायचं नाव घेत नाही. कालपर्यंत रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा चावा घेणारी कुत्री आता चिमुकल्यांच्या जीवावर उठली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माणकेश्वर गावात घडलेली घटना ऐकून थक्क व्हाल. अंगणात खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर हल्ला करून कुत्र्याने त्याचे कान तोडले.  दीड वर्षाच्या या जखमी  बालकावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीड वर्षाच्या या बालकावर भटक्या कुत्र्याने केलेला हल्ला पाहून जशी पालकांची घाबरगुंडी झाली, तसंच या बालकाची अवस्था पाहिल्यावर सामान्य नागरिकही हळहळला.  बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात ही घटना घडली. भटक्या कुत्र्याने अक्षरशः चिमुकल्याचे कान तोडले. दीड वर्षाच्या या मुलाचा कान कुरतडून बाजूला काढला. ताहेर बादेला असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. प्राथमिक उपचार करून या बाळाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तुटलेले कान पालकांनी कॅरीबॅगमध्ये आणलेलं पाहून डॉक्टरांच्या अंगावरही शहारे आले. ताहेरला अंगणात खेळत असताना कुत्र्याने  जबर चावा घेतला. बाळाचं ओरडणं ऐकून बाहेर आलेल्या आईने कुत्र्याला हुसकवून लावलं खरं. पण तोपर्यंत बाळाचे कान वेगळे झाले होते. आता शासकीय रुग्णालयात बालकावर उपचार सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या, चावा घेतल्याने होणारा रेबीज, शासकीय रुग्णालयात असणारी रेबीज प्रतिबंधक लसीची कमतरता आणि रस्स्यावर कुत्रे आडवे येऊन होणारे अपघात.  यावर उपाययोजना होत नसल्याने भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. या बाळाला आणखी 6 सहा दिवस शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. जखमा खोल असल्याने भरून येण्यासाठी वेळ लागेल. शिवाय तुटलेल्या कानावर प्लास्टिक सर्जरी करता येते का याचा विचार रुग्णालय प्रशासन करत आहे.

आणखी >>

एकतर्फी प्रेमातून वाद, तरुणीचं लग्न लावल्याने भावाची हत्या

नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणाने मुलीच्या भावाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आरोपी सूरज पाटीलने नियोजनपूर्वक काचेने मान आणि छातीवर वार करुन अमोल मेश्रामची हत्या केली. कुही तालुक्यातील खैरलांजी गावात गुरुवारी मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूरज पाटीलचे अमोल मेश्रामच्या धाकड्या बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. सूरज पाटीलने तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी मागणीही घातली होती. परंतु मेश्राम कुटुंबीयांनी ही मागणी नाकारुन तिचा विवाह मे 2018 मध्ये महाराष्ट्राबाहेर लावून दिला. यामुळे सूरज पाटील अतिशय संतप्त झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसात सूरजने नियोजनपूर्वक अमोलसोबत मैत्री वाढवली होती. अखेर गुरुवारी रात्री सूरजने अमोलला दारु पाजली. तो मद्यधुंद अवस्थेत असतानाच सूरजने काचेने मान आणि छातीवर वार करुन अमोलचा खून केला. वेलतूर पोलिसांनी आरोपी सूरज पाटीलला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.

आणखी >>

मुंबई एअरपोर्टचं नाव आता छत्रपती शिवाजी 'महाराज' आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्यात आली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असा शिवरायांचा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटलं जात होतं. मात्र आता त्यात 'महाराज' या शब्दाची भर घालण्यात आली आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील जनतेने यासंदर्भात कित्येक वर्षांपासून मागणी केली होती. ती अखेर पूर्ण झाल्याबद्दल प्रभूंनी महाराष्ट्रीय नागरिकांचं अभिनंदनही केलं. तसंच महाराष्ट्राच्या मागणीकडे लक्ष दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

आणखी >>

IndvsEng : पहिल्या डावात इंग्लंडच्या सर्वबाद 246 धावा

साऊदम्पटन: सॅम करनने आधी मोईन अली आणि मग स्टुअर्ट ब्रॉडच्या साथीने रचलेल्या भागिदाऱ्यांनी साऊदम्प्टन कसोटीत इंग्लंडला पहिल्या डावात सर्व बाद 246 धावांची समाधानकारक मजल मारुन दिली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी एका क्षणी इंग्लंडची सहा बाद 86 अशी दाणादाण उडवली होती. पण सॅम करनने मोईन अलीच्या साथीने 81 धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा डाव सावरला. मग त्याने ब्रॉडच्या साथीने 63 धावांची भागीदारी करुन इंग्लंडच्या डावाला सर्व बाद 246 असा आकार दिला. करनने आठ चौकार आणि एक षटकारासह 78 धावांची खेळी उभारली. मोईन अलीने 40, तर स्टुअर्ट ब्रॉडने 17 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन, तर ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. हार्दिक पंड्यानं एक विकेट काढली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या साऊदम्प्टन कसोटीत, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरली. भारताने या कसोटीसाठी नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीतला विजयी संघ कायम राखला. तब्बल 38 व्या सामन्यानंतर कोहलीने पहिल्यांदाच संघ कायम ठेवला आहे. यापूर्वी प्रत्येक कसोटीनंतर कोहली संघात काही ना काही बदल करत होता. पण या कसोटीच्या निमित्ताने पहिल्यादांच त्याने संघ कायम ठेवला आहे. इंग्लंडने या कसोटीसाठी ख्रिस वोक्सऐवजी सॅम करन आणि ऑलिव्हर पोपऐवजी मोईन अलीला संधी दिली आहे. साउदम्प्टनच्या रोज बाऊल स्टेडियमवर हा सामना आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे साउदम्प्टन कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी या युवा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण या दोघांनाही अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळालेली नाही. भारत: शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

आणखी >>

बँका सलग आठ दिवस बंद असल्याचा वायरल मेसेज खोटा

मुंबई : दोन सप्टेंबरपासून राज्यभरातील बँका सलग आठ दिवस बंद राहणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मात्र या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी गडबडून जाऊ नये, आणि आपले बँक व्यवहार सुरु ठेवावेत, असं आवाहन बँकिंग क्षेत्रातील तज्ञ्जांनी केलं आहे. 2 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. सोमवारी 3 सप्टेंबरला दहीहंडी असली, तरी मुंबई शहर आणि उपनगरातील फक्त सरकारी कार्यालयं बंद राहणार आहेत. मात्र बॅंका सुरु राहतील. मंगळवार 4 आणि बुधवार 5 सप्टेंबरला 'रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया'चा संप आहे. मात्र या संपाचा मुंबई शहरातील किंवा राज्यातील कोणत्याही बॅंकांशी संबंध नाही. त्यामुळे आरबीआयचा संप असला तरी बॅंका सुरु राहणार आहेत. गुरुवार 6 आणि शुक्रवार 7 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे बॅंका सुरु राहतील. 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्यामुळे काही बॅंका बंद राहतील, तर 9 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे सर्व बॅंका बंद राहतील. म्हणजेच एक ते आठ सप्टेंबर दरम्यान शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या वगळता कोणत्याही दिवशी बँक बंद राहणार नाही. थोडक्यात, सलग आठ दिवस बँका बंद राहण्याबाबत सोशल मीडियावर वायरल झालेला मेसेज खोटा आहे. तारीख - वार -

आणखी >>

भाजप खासदार शरद बनसोडेंची भरसभेत कमरेखालची भाषा

सोलापूर : कुठे, कधी, कसे तारे तोडावेत, याचं भान राहिलं नाही की काय होतं हे सोलापूर जिल्ह्यात बघायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातले खासदार शरद बनसोडे यांना हातात माईक मिळाला आणि ते वाट्टेल ते बरळू लागले. इतकं बरळले की त्यांना 'चाबरा खासदार' अशी उपाधीच मिळाली आहे. भर सभेत सभ्यतेची पातळी सोडली, बाया-बापड्यांसमोर गुप्तांगाची गोष्ट सांगितली, सुशीलकुमार शिंदेंसमोर अकलेचे तारे तोडले, यंदाच्या आंबटशौकीन खासदार पुरस्काराचे मानकरी कोण? नाव फक्त एक... शरद बनसोडे... सोलापुरातल्या पनमंगरुळ या त्यांच्या जन्मगावी काल एका डॉक्टरांची एकसष्ठी होती. त्या कार्यक्रमात बनसोडे अनेक पुड्या सोडत होते. पण भाषण रंगात आलं आणि साहेबांचाही तोल सुटला. सायबांनी शाळेत असताना त्यांना झालेल्या गुप्तांगाच्या दुखण्याची कहाणी भरसभेत सांगितली. ते कन्नडमध्ये सांगत होते... मी लहानपणी आठवी-नववीत असताना एकदा झाडावरुन पडलो. त्यामुळे माझे गुप्तांगच सरकले. माझे वडील मला दवाखान्यात घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मला चड्डी काढण्यास सांगितलं. मग काय, माझी पंचाईतच झाली. मी वडिलांकडे बघितलं तर ते डॉक्टरांना 'बघून घ्या' असं सांगत तिथून निघून गेले. डॉक्टरांनी एका बाजूला पकडून जोरात हिसका मारला आणि मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर त्रास कमी झाला. तेव्हापासून औषध नाही की काही नाही. बनसोडे असे सुटले होते, की त्यांना आवरणं अवघड झालं होतं. अखेर प्रेक्षकांमधूनच आरडाओरड सुरु झाली. खासदार महाशय जरा गांगरले. पण त्यानंतरही बनसोडेंनी कडी केली. गुप्तांगाची कहाणी कन्नडमधून कळली नसेल, तर मराठीतनं सांगू का? असा आर्ची स्टाईल डायलॉग मारला. अखेर आयोजकांनीही खासदार महोदयांना आवरतं घ्यायला लावलं आणि बनसोडेंनी माईक सोडला. बनसोडेंचा हा पहिला किस्सा नाही. भाषणबाजीत मोकळेढाकळे असलेले बनसोडे याआधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात अडकले आहेत. पण आता मात्र बनसोडेंनी आपल्याच कमरेखालच्या अश्लाघ्य विनोदाने हद्द केली. त्यामुळे बनसोडेसाहेब, जरा बोलताना स्वतःला आवरा!

आणखी >>

सोशल मीडियावरुन द्वेष पसरवू नका, नरेंद्र मोदींचं आवाहन

नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन द्वेष पसरवू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वाराणसीमधील भाजप कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी 'नमो अॅप'च्या माध्यमातून संवाद साधताना मोदींनी हे आवाहन केलं. एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन कुटुंबांतील भांडण ही आजकाल राष्ट्रीय बातमी होते. त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. देशाबाबतच्या सकारात्मक बातम्यांचं वातावरण निर्माण करुया. समाजाला बळकटी देणारी माहितीच शेअर करुया, असंही मोदी यावेळी म्हणाले. 'लोक काहीतरी चुकीचं पाहतात किंवा ऐकतात आणि फॉरवर्ड करतात. पण त्यामुळे समाजाचं किती नुकसान होत आहे, याचा कोणी विचार करत नाही. सभ्य समाजाला अशोभनीय असणारे शब्द काही जण वापरतात. महिलांविषयी वाईट-साईट लिहिलं किंवा बोललं जातं' असंही मोदींनी पुढे म्हटलं. सोशल मीडियावरुन गलिच्छ गोष्टी पसरवण्यापासून प्रत्येकाने स्वतःला थांबवायला हवं. स्वच्छता अभियान हे फक्त साफसफाईबाबत नसून मानसिक स्वच्छतेबाबतही असल्याचं मोदींनी सांगितलं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगा, असंही मोदी म्हणाले.

आणखी >>

पुण्यात उबरचालकाची हत्या, टॅक्सी विकणारे दोघे लातुरात अटकेत

लातूर : झटपट पैसे कमवण्यासाठी पुण्यात उबर टॅक्सीचालकाची हत्या करुन टॅक्सी विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यात टॅक्सी चोरल्यानंतर चोरट्यांनी लातूर गाठलं, मात्र पोलिसांनी दोघांना गजाआड केलं. पुण्यातून विजय देवराव कापसे या चालकाची उबर टॅक्सी भाडयाने घेऊन मज्जू अमीन शेख आणि समीर शेख हे दोघं सासवडला आले. टॅक्सीचालक विजयची हत्या केलानंतर टॅक्सी घेऊन ते लातूर शहरात आले. तिथे ही चोरीची टॅक्सी विकण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी माग काढला चौकशीसाठी दोघा तरुणांना ताब्यात घेतलं. अखेर दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली. लातूर पोलिसांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर स्थानिक पोलिस घटनास्थळी गेले. तिथे विजयचा मृतदेह आढळला. कर्ज फेडून झटपट पैसे कमवण्यासाठी आपण हा मार्ग निवडल्याचं आरोपींनी सांगितलं. सासवड पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेऊन आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सासवड पोलिस पुढील तपास करत आहेत.

आणखी >>

राष्ट्रीयकृत बँकांच्या चलाखीमुळे पात्र असूनही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

उस्मानाबाद : राष्ट्रीयकृत बँकांच्या भानगडीची नवीन आकेडवारी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निकषात महाराष्ट्रातले हजारो शेतकरी बसत असूनही वंचित राहत आहेत. एबीपी माझाच्या टीमने असं का झालं याचा शोध घेतला. तेव्हा लक्षात आलं, की सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपला तोटा लपवण्यासाठी शेतकऱ्यांचं कर्ज राईट ऑफ म्हणजे आपल्या तोट्याच्या लेख्यातून कमी केलं. राईट ऑफ झालेल्या खात्यांची यादी कर्जमाफीसाठी गेलीच नाही. रिझर्व्ह बँकेपर्यंत आमच्या टीमने शोध घेतल्यावर मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. मार्च 2014 पासून मार्च 2018 पर्यंत बँकांनी 3 लाख 15 हजार 514 कोटी रुपयांची कर्ज राईट ऑफ केली. त्यात शेतकऱ्यांच्या कर्जाचा वाटा आहे फक्त 17 हजार 426 कोटी रुपये.. शेतकऱ्यांना कल्पनाही नाही काजळा गावचे असे 80 शेतकरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निकषास पात्र होते. मात्र कर्जमाफीच्या कोणत्याच यादीत या शेतकऱ्यांचं नाव येत नव्हतं. एक लाखापेक्षा कमी असलेली शेती कर्ज चार वर्षांपासून थकल्याने बँकांचा तोटा वाढत होता. बँकांनी आपापल्या संचालक मंडळाकडून मान्यता मिळवून शेतकऱ्यांची कर्ज राईट ऑफ म्हणजे बँकांच्या तोटा लेख्यातून वगळली. शेतकरी नाईलाजाने आज ना उद्या आपलं कर्जमाफीच्या यादीत नाव येईल अशी आशा लावून बसले आहेत. मात्र त्यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळण्याचं कारण बँकांनी कर्ज राईट ऑफ केली तरी शेतकऱ्यांच्या नावावरचा बोजा कमी होत नाही. बँकांनी राईट ऑफ केलेल्या खात्यांची यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेसाठी गेलीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शिवाय शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सध्या कर्ज दिसत असल्यामुळे त्यांना इतर बँकांकडूनही नवं पीककर्ज मिळू शकत नाही. नवं कर्ज मिळावं यासाठी बँकेने शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. उस्मानाबादमधील सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सध्या कॅनरा बँकेची तक्रार आली आहे. इतरही बँकांनी असा प्रकार केला असल्याची शक्यता असल्याने बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी दिली. राईट ऑफ म्हणजे काय? राईट ऑफ हा शब्द गतवर्षी देशभरातील प्रमुख बँकांनी मोठ्या उद्योगपतींच्या थकबाकीला राईट ऑफ केल्यानंतर सर्वपरिचित झाला. त्यावेळी शेतकऱ्यांचीही कर्ज राईट ऑफ का केली जात नाहीत, असा सूर संसदेतही निघाला. बँका तोटा लपवण्यासाठी अनेक वर्षे कर्ज राईट ऑफ करत आहेत. बँकेचा एनपीए म्हणजे बुडीत कर्ज कमी करण्यासाठी दरवर्षी काही रकमेची संशयित बुडीत कर्जासाठी तरतूद केली जाते. यामध्ये प्रत्येक वर्षी 10 पुन्हा 15 टक्के अशी वाढ करून या संशयित बुडीत कर्जाच्या तोट्याची तजवीज केली जाते. थकबाकीदाराला डिफॉल्टर म्हणून घोषित केलं जातं. मोठ्या कंपन्यांना डिफॉल्टर घोषित केल्यावर त्यांचे संचालक नवीन नावाने फर्म रजिस्टर करून पुन्हा कर्ज घेण्यास मोकळे होतात. या शेतकऱ्यांची नावे डिफॉल्टरमध्ये गेल्याने शासनाचीही कर्जमाफी नाही आणि त्यांना इतर बँकाही कर्ज देण्यास तयार नाहीत अशी अवस्था झाली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात बुडालेल्या सहकारी बँकांसारखीच ही पध्दत आहे. देशातल्या खातेदारांचा सरकारी बँकांवर कमालीचा विश्वास आहे. आजही प्रत्येक जण सरकारी बँकांतून व्यवहार करायला उत्सुक असतो. त्यामुळे तोटा कमी करण्यासाठी बँकांनी केलेली हातचलाखी किती मोठी आहे, याचा एबीपी माझाच्या टीमने शोध घ्यायचं ठरवलं. एबीपी माझाला मिळालेली कागदपत्रं सांगतात, मार्च 2015 ते मार्च 2018 पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांची वसूल होत नसलेली थकबाकी 6 लाख 16 हजार 586 कोटी होती. वसूल होण्याची शक्यता नसलेली कर्ज बँकांनी बँकेच्या तोटा खात्यातून वगळली. किती कोटींचं कर्ज राईट ऑफ? 2014-15 मध्ये 49 हजार 18 कोटी 2015-16 मध्ये 57 हजार 585 कोटी 2016-17 मध्ये 81 हजार 683 कोटी 2017-18 मध्ये 1 लाख 28 हजार 228 कोटी असं पाच वर्षात 3 लाख 15 हजार 541 कोटींचं कर्ज राईट ऑफ म्हणजे बँकांच्या तोट्यांच्या रकान्यातून वजा केलं. या कर्जात उद्योगपती विजय मल्ल्यासारख्यांची कर्ज होती हे विशेष. बँकांनी राईट ऑफ केलेल्या कर्जात शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज किती होतं? याचाही शोध एबीपी माझाच्या टीमने घेतला. आरबीआयमधील सूत्रांकडून दोन वर्षांच्या कर्जाची आकडेवारी मिळाली. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरी आणि शेतीच्या नावावर घेतलेल्या कर्जापैकी 2016-17 मध्ये 7 हजार 91 कोटी 2017-18 मध्ये 10 हजार 335 कोटी असे दोन वर्षात 17 हजार 426 कोटी राईट ऑफ म्हणजे बँकांच्या तोट्यांच्या खात्यातून वजा केले. याच दोन वर्षात उद्योगपतींचे एक लाख 92 हजार 485 कोटी राईट ऑफ केले. बँकिंग तज्ञ देविदास तुळजापूरकर यांच्या मते, बँकांनी कर्ज राईट ऑफ केल्यामुळे सरकारला त्याची माहिती मिळाली नाही. ताळेबंदानुसार शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज नाही, त्यामुळे सरकारकडून कर्जमाफीची रक्कम पाठवण्यात आलीच नाही. बँकांच्या या घोळामुळे शेतकरी मात्र भरडला गेला आहे. कारण, नवं कर्जही मिळत नाही. कोणकोणत्या बँकांची चलाखी? आम्ही सांगितलेली सगळी माहिती 7 ऑगस्टच्या आरबीआयच्या नोटमधली आहे. ज्या राष्ट्रीयकृत बँकांनी खाती राईट ऑफ केली, त्यात देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय, एसबीआयमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँका, देना बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक अशा सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत. आता पर्याय काय? राईट ऑफ केलेल्या कर्ज खात्याचा शेतकऱ्यांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनाच धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. कर्जमाफीसाठी आणखी एक मुदतवाढ देताना राईट ऑफ शेतकऱ्यांची यादी मागून त्यांना कर्जमाफी दिली नाही, तर हे शेतकरी भविष्यातही थकबाकीदार राहतील आणि त्यांना नव्या कर्जाचा लाभ मिळणार नाही.

आणखी >>

गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा बळी, दोन तांत्रिकांना बेड्या

चंद्रपूर : चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा इथून बेपत्ता झालेल्या दोन वर्षीय युग मेश्रामची गुप्तधनाच्या लालसेतून हत्या झाल्याचं समोर आलं आहे. घराशेजारील तांत्रिकाने युगचा बळी दिला. या प्रकरणी सुनील आणि प्रमोद बनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. केसात तीन भोवरे असलेल्या युग मेश्राम 22 ऑगस्ट रोजी घराशेजारी खेळताना अचानक बेपत्ता झाला होता. युग मेश्रामच्या घराजवळच असलेल्या एका तनशीच्या ढिगाऱ्यात काल (29 ऑगस्ट) त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांची तीन पथकं त्याचा शोध घेत होती. मात्र काल पोलिसांना घराशेजारीच त्याचा मृतदेह आढळला. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखेर युग मेश्रामाचा नरबळीच असल्याचं सुनील आणि प्रमोद बनकरच्या चौकशीतून समोर आलं. घरासमोर खेळणाऱ्या युगला चॉकलेटचं आमिष दाखवून हे आरोपी त्याला घेऊन गेले. त्यानंतर युगची पूजा करुन त्याची हत्या केली. गुप्तधनाच्या लालसेपोटी युगचा बळी दिला. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात याआधीही जोदूटोणा, भानामती, मजली अशा प्रकारात अनेकांचे बळी गेले आहेत.

आणखी >>

99.3 टक्के बाद नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत, RBI चा अहवाल

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटा बँकेत परत आल्यामुळे नोटाबंदी फसल्याच्या चर्चा आहेत. आरबीआयच्या वार्षिक अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 41 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपये किमतीच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा परत बँकेत आल्या आहेत. केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नाहीत. ही आकडेवारी अत्यल्प असल्यामुळे नोटाबंदीचा काहीच फायदा नसल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानंतर देशभरात अभूतपूर्व चलनटंचाई होऊन जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणात काळा पैसा बँकेत परत येणार असा दावा करण्यात येत होता. मात्र तब्बल 99.30 टक्के नोटा परत बँकेत आल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आणखी >>

गुंतवणूकदारांची फसवणूक, भाजप आमदाराच्या पतीला बेड्या

जालना : दामदुप्पट पेसे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या राजस्थानमधील माजी आमदाराच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जालन्यातील तब्बल तीन हजार गुंतवणूकदारांना माजी आमदार बनवारीलाल कुशवाह यांनी फसवलं. बनवारीलाल कुशवाह हे भाजपच्या विद्यमान आमदार शोभाराणी कुशवाह यांचे पती आहेत. शोभाराणी या राजस्थानातील धोलपूरमधून भाजपच्या आमदार आहेत. बनवारीलाल कुशवाह हे गरिमा रिअल इस्टेट अलाईड लिमिटेड या कंपनीचा सूत्रधार आहेत. जालन्यात त्याच्याविरोधात फसवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अखेर जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत, थेट राजस्थानातून बनवारीलाल कुशवाह यांना अटक केली.

आणखी >>

'त्या' पाच आरोपींचे काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंध : पुणे पोलिस

पुणे : एल्गार परिषदेच्या आयोजनामागे माओवादी संबंध असल्याप्रकरणी पत्र-मेलसह अनेक महत्वाचे पुरावे मिळाले असून एल्गार परिषदेसाठी कबीर कला मंच, सीपीआय माओवाद्यांनी निधी पुरवला असल्याची माहिती पुण्याचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. आरोपींचे काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला. सरकारविरोधी कृत्य करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे पुरावे आढळले असून कायदा राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासंबंधीचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला होता. बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या कटात या पाच आरोपींचा सहभाग असल्याचा स्पष्ट पुरावा हाती लागल्याचंही पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. एल्गार परिषदेच्या आयोजन प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे विद्यार्थ्यांना भडकवणे, शस्त्र जमा करणे, दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या घातपात करण्याचा कट असल्याचंही आढळून आलं. लॅपटॉप, हार्डडिस्कसह अनेक साहित्य आणि पुरावे मिळाले आहेत. कबीर कला मंचाने पैसे पुरवले असून देशातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची तयारी सुरु केली असल्याचं तपासात पुढे आलं, अशी माहिती पोलिस उपायुक्तांनी दिली.

आणखी >>

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सात टक्के महागाई भत्ता मिळतो. आता दोन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 1 जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत. तर 61 लाखांपेक्षा जास्त पेंशनधारक आहेत. सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याआधी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ 1 जानेवारीपासून लागू झाली होती. महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाऊन्स हा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेंशनधाकरांना मिळते. वाढती महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर महागाई भत्ता ठरवला जातो.

आणखी >>

कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी बिग बींकडून दीड कोटींची मदत

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन जेवढे मोठे कलावंत आहेत, तितकेच ते संवेदनशील म्हणूनही ओळखले जातात. देशातील अनेक दुर्घटनांवेळी त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. आता अमिताभ बच्चन यांनी देशातील कर्जबाजारी शेतकरी आणि शहीद कुटुंबीयांनाही मदतीचा हात दिला आहे. कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन एक पाऊल पुढे टाकत, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांची मदत दिली. ‘कौन बनेगा करोडपती’च्या दहाव्या मोसमाच्या लॉन्चिंग सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्याचसोबत, शहीद सैनिकांच्या कुटुंबांनाही आर्थिक मदतीची घोषणा अमिताभ बच्चन यांना केली. अमिताभ बच्चन हे शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये दिली आहे. कर्जबाजारी झालेल्या 200 शेतकरी कुटुंबांना दीड कोटी रुपये, तर 44 शहीद सैनिकांच्या कुटुंबाना एक कोटी रुपये अशी अडीच कोटींची मदत अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. बँकांकडून 200 कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती आणि त्यांच्यावरील कर्जाच्या रकमेबाबत आकडेवारी मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, “शहीद सैनिकांचे कुटुंबीय आणि कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीमुळे व्यथित झालोय. आणि त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा निर्णय घेतला.” दरम्यान, याआधी अमिताभ बच्चन यांनी केरळमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली होती. तसेच, अत्यावश्यक वस्तूही अमिताभ बच्चन यांनी केरळमधील नुसानग्रस्तांना दिल्या होत्या.

आणखी >>

मोदींच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी देशभरात धाडसत्र, पोलिसांच्या हाती पत्र

मुंबई : देशभरात विविध ठिकाणी कथित नक्षलसमर्थनाच्या आरोपाखाली पुणे पोलिसांचं धाडसत्र सुरु आहे. पुणे पोलिसांची देशभरातली कालची कारवाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपाखाली केल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे. यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या रोना विल्सन यांच्या घरातून पोलिसांच्या हाती एक पत्र लागलं होतं. या पत्रात मोदींना संपवण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येसारखीच पुनरावृत्ती करण्याचा उल्लेखही आहे. शिवाय चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं M4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लॅन या पत्रात आहे. त्यासाठी आठ कोटींची गरज असल्याचं म्हटलंय. पत्रातून धक्कादायक माहिती उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांकडून देशभरात काल 9 ठिकाणी चौकशी करण्यात आली, त्यातील 5 ठिकाणांहून 5 जणांना अटक करण्यात आली.

आणखी >>

देवाची अती भक्ती करणाऱ्या आईचा मुलाने गळा चिरला

ठाणे: देवाची अति भक्ती करणे एका महिलेच्या जिवावर बेतले आहे. मुलानेच धारदार चाकूने गळा चिरुन आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर पूर्व भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला गजाआड केले आहे. तर आई गंभीर जखमी आहे. बदलापूर पूर्व येथील मिनाताई ठाकरे नगरमधील राणे चाळीमध्ये सुनिता धेंडे (44) ही महिला मुलगा आकाश धेंडे (21) याच्यासोबत राहते. बहुतेक घरात देव्हारा असतो, त्याप्रमाणे सुनिता यांच्याही घरी देव्हारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपूजा करत. पण आपली आई सतत देवदेव करत असल्यामुळे त्याचा राग मुलगा आकाशला येत होता. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास देवदेव करण्याच्या कारणावरून आई आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणात संतापलेल्या आकाशने आई सुनिता हिच्या गळयात धारदार चाकू खुपसून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांना उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात आकाश धेंडेविरुध्द आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली. आकाशला न्यायालयात हजर केले असता 29 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव करीत आहेत.

आणखी >>

MIT कॉलेजमध्ये 160 विद्यार्थ्यांना विषबाधा, 16 जण आयसीयूत

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील 160 विद्यार्थ्यांना कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या 80 विद्यार्थ्यांवर विश्वकर्मा रुग्णालयाच्या जनरल वॉर्ड, तर 16 विद्यार्थ्यांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु आहेत. लोणी काळभोर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयातील मॅनेजमेंट विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल (28 ऑगस्ट) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अल्पोपहार केला. काही वेळानंतर त्यातील काही विद्यार्थ्याना उलट्या आणि जुलाब होण्याचा त्रास झाल्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल्पोपहारावेळी गुलाबजाम खाल्याने अधिक त्रास झाल्याचे काहींनी सांगितले. या विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी >>

चाऱ्यात लपवलेलं पाच तोळ्यांचं मंगळसूत्र म्हशीने गिळलं!

सातारा : चाऱ्यामध्ये लपवून ठेवलेलं मंगळसूत्र चुकून म्हशीने खाल्ल्याचा प्रकार साताऱ्यात घडला. सुदैवाने डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन मंगळसूत्र बाहेर काढलं, त्याचप्रमाणे म्हैसही सुखरुप आहे. साताऱ्यातील खटाव तालुक्यात राहणाऱ्या सुनिल दादासो खाडे यांची नवविवाहित मुलगी साधना रक्षाबंधन सणासाठी माहेरी आली होती. गावात चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याने रात्री झोपताना तिने स्वतःचे दागिने जनावरांच्या चाऱ्याजवळ ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीच्या वडिलांनी पोत्यातील पेंड म्हशीला चरायला दिली. त्यामध्ये मुलीने ठेवलेले दागिनेही म्हशीसमोर पडले. त्यातला नेकलेस म्हशीने चघळून खाली टाकला, परंतु पाच तोळ्यांचं गंठन तिने गिळलं. ही बाब वडिलांच्या लक्षात येताच म्हशीला पशुवैद्यांकडे नेण्यात आलं. वडुज पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक उपायुक्त डॉ. नितीन खाडे आणि त्यांच्या टीममधील डॉ. तानाजी खाडे, डॉ. प्रकाश बोराटे आणि साबळे यांनी यशस्वीरित्या ऑपरेशन करुन पाच तोळ्यांचं मंगळसूत्र बाहेर काढलं. त्याचप्रमाणे तिने आधी गिळलेली चप्पल, फोनची वायर आणि प्लास्टिकच्या पिशव्याही बाहेर काढल्या.

आणखी >>

राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. ईव्हीएमवर बंदी घालण्याचं आवाहन राज ठाकरेंनी या पत्रातून केलं आहे. राज ठाकरे ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. एव्हीएमवर बंदी घालण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं. भाजप वगळता सर्व पक्षाच्या प्रमुखांना राज ठाकरेंनी पत्र दिलं. 'ईव्हीएमवर बंदी आणुया, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घालूया' असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून केलं आहे. या पत्राला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्याकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र शिवसेनेकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं.

आणखी >>

तासाला 300 ते तीन हजार मोजा, भाड्याने बॉय-फ्रेण्ड मिळवा

मुंबई : नैराश्य घालवण्यासाठी तुम्हाला भाड्याने बॉय-फ्रेण्ड मिळू शकणार आहे. मन मोकळं करण्यासाठी मित्र शोधायला 'रेंट अ बॉय|फ्रेण्ड' हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. सध्या मुंबई-पुण्यातच ही सुविधा उपलब्ध असेल. बॉय-फ्रेण्ड म्हणजे पुरुष मित्र अशी या अॅपची संकल्पना आहे. रुढार्थाने ज्याला 'बॉयफ्रेण्ड' म्हटलं जातं, तसा प्रियकर तुम्हाला मिळणार नाही. अॅपच्या नावात 'बॉय-फ्रेण्ड' या दोन शब्दांमध्ये असलेला स्पेस हेच सुचवत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बॉय-फ्रेण्डसोबत शारीरिक जवळीक किंवा खाजगी जागेतील भेट घेता येणार नाही. विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये असणारं नैराश्य लक्षात घेता त्यांना एका चांगल्या मित्राची गरज असते. याच विचारातून 29 वर्षीय कौशल प्रकाशने हा अनोखा व्यवसाय सुरु केला. सध्या ही सुविधा केवळ मुंबई आणि पुण्यात सुरु करण्यात आली असली तरी येत्या काळात तिचा इतर शहरांत विस्तार करण्यात येईल. सेलिब्रेटी मित्रसाठी तुम्हाला तासाभराचे तीन हजार रुपये, तर मॉडेलसोबत वेळ घालवण्याचे दोन हजार रुपये मोजावे लागतील. सर्वसामान्य व्यक्ती अवघ्या 300 ते 400 रुपयात उपलब्ध होणार आहे. 70 टक्के रक्कम ही संबंधित बॉय-फ्रेण्डला मिळेल. नैराश्यात असलेल्या व्यक्तीला आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं आणि आपल्याला समजून घ्यावं, इतकीच अपेक्षा असते. या अॅपच्या माध्यमातून हेच काम साध्य होईल, असा विश्वास 'RABF' टीमला वाटतो.  

आणखी >>

लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर : सूत्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी शिवसेनेने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर शुभा राऊळ, नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे. येत्या गणेशोत्सावाच्या आधी शिवसेना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. शिवसेनेच्या राज्यभरातील 18 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकांसाठी पक्षबांधणी आणि रणनीतीसाठी शिवसेना भवनात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. मुंबईतील भाजप खासदारांविरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी शिवसेनेतून अनेक नावं पुढे येत आहेत. मुंबईत एकूण सहा खासदार असून तीन खासदार शिवसेनेचे आहेत तर तीन खासदार भाजपचे आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, उत्तर पश्चिम मुंबईतून गजानान कीर्तीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. कोणाकोणाच्या नावाची चर्चा ? उत्तर पूर्व मुंबईत भाजप खासदार

आणखी >>

रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भावाकडून बहिणीची हत्या

वसई : रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधून आपलं रक्षण करण्याचं वचन घेतलं, मात्र अवघ्या 24 तासात हाच भाऊ तिच्या जीवावर उठला. बहीण मोबाईलवर जास्त वेळ बोलत असल्याच्या रागातून सख्ख्या भावाने तिची गळा आवळून हत्या केली. मुंबईजवळच्या वसईत ही घटना उघडकीस आली आहे. वसईच्या वालीव हद्दीतील पाळणापाडामधील दुमंडा चाळीत बहीण-भावाच्या नात्याला रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी गालबोट लागलं. मयत तरुणीला चार ते पाच महिन्यांपूर्वी नवीन मोबाईल घेऊन देण्यात आला होता. त्यामुळे मोबाईलविषयी तिच्या मनात कुतूहल होतं. नव्या मित्रांसोबत ती फोनवर बराच वेळ गप्पा मारत असे. हत्येच्या दिवशी वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, तर आईसुद्धा घरी नव्हती. खाजगी कंपनीत कार्यरत असलेला मोठा भाऊ ऑफिसला गेला होता. हीच संधी साधत राहत्या घरी दुपारी ओढणीच्या सहाय्याने भावाने तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. कोणाला संशय येऊ नये म्हणून, आरोपी भावानेच पोलिसांना बोलावून घेतलं आणि हत्येची माहिती दिली. पोलिसांना सुरुवातीला कुटुंबातील व्यक्तींवर संशय नव्हता, मात्र तपासाची चक्रं फिरताच अल्पवयीन भाऊ समोर आला. अखेर चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी भावाला ताब्यात घेतलं. अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आणखी >>
  • 1