काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

500 रुपयात लाखोंच्या बक्षिसाचं आमिष, सांगलीकरांना गंडा

सांगली : पाचशे ते आठ हजार रुपयांची गुंतवणूक करा आणि लाखो रुपयांची बक्षिसं जिंका, असं आमिष दाखवून सांगलीत शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. श्री साई एन्टरप्राईझेस नावाच्या कंपनीने तासगाववासियांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. श्री साई एन्टरप्राईझेस या कंपनीच्या ऑफरमध्ये तासगाव आणि परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. सुरुवातीला लोकांना हजारो रुपयांच्या वस्तू काहीशे रुपयांमध्ये मिळाल्या. पण सोमवारी शेवटचा ड्रॉ असतानाच या कंपनीच्या चालकांनी मुद्देमालासह पोबारा केला. गेल्या सहा महिन्यांपासून महिन्याला ठराविक रकमेचे हप्ते गोळा करण्याचे काम सर्रासपणे सुरु होते. कंपनीच्या नियमानुसार आठही सोडतीत मोठं बक्षिस लागलं नाही, तरीही बक्षिस न लागलेल्या ग्राहकांना फ्रीजचं हमखास वाटप होणार होतं. त्यामुळे अनेक ग्राहक सहज भुलले. प्रत्येक ग्राहकाकडून सुमारे आठ हजार रुपये कंपनीकडे भरण्यात आले होते. कंपनीच्या प्रतिनिधींनी पोबारा केल्याने ग्राहकांना आपली फसवणूक झाली. अनेक जणांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून नेमकी किती रुपयांची फसवणूक झाली, हे स्पष्ट झालेलं नाही.

आणखी >>

ऋणानुबंध जुने, भेट नवी! भुजबळ-उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. मात्र भुजबळांच्या तुरुंगवारीनंतर त्यांच्याबद्दल शिवसेनेतून सहानुभुती व्यक्त होत आहे. त्यातच आता या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट झाली. एका लग्नाच्या निमित्तानं दोघे एकमेकांना भेटले. शनिवारी 25 ऑगस्टला वरळीत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचं लग्न होतं. या लग्नाला दोघांनीही हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या भेटीत दोघांमध्ये कशावर चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याआधी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांविषयी सामनातून सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती. तर आमचे 25 वर्षांपासून ऋणानुबंध आहेत, असं उत्तर त्यावर छगन भुजबळांनी दिलं होतं. शिवाय भुजबळांचे पुतणे माजी खासदार

आणखी >>

खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा

पुणे : पुण्यातील खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची रविवारी (26 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास आमदार गोरे यांच्यासह 10 ते 11 कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. चाकण पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते चाकणदरम्यान मागील महिनाभरापासून होत असलेली वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नव्हती. अखेर तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः सुरेश गोरे रस्त्यावर उतरले होते. वाहनं मार्गस्थ करण्यासाठी गोरे आणि समर्थकांकडून आटापिटा सुरु होता. पण काही केल्या त्यांना वाहतूक सुरळीत करता येत नव्हती. आता रस्त्यावर उतरलोय आणि मध्येच निघून गेलो तर हसं होईल. म्हणून अखेर त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर राग काढायला सुरुवात केली. त्यांची तोडफोड करत कायदा हातात घेतला. सुरेश गोरे आणि कार्यकर्त्यांच्या तोडफोडीनंतर अवैध प्रवासी वाहनं चालवणाऱ्यांनी वाहनांसह तिथून पोबारा केला. त्यातच गुन्हा दाखल करु नये म्हणून वर शिरजोर सुरुच होता. त्यातून एकाने पुढे येऊन सोमवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार गोरे यांच्यासह चाकणमधील 10 ते 11 विद्यमान नगरसेवकांवर काल (27 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. आता चाकण पोलिस यात कसा तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, अवैध प्रवासीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई केली नाही. अखेर चौकात जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतरच शिक्षांची तोडफोड केली, असं स्पष्टीकरण आमदार सुरेश गोरे यांनी दिलं आहे.

आणखी >>

ऑनलाईन ऑर्डर करा, डिसेंबरपासून थेट ड्रोनने डिलिव्हरी मिळणार

नवी दिल्ली : अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स कंपन्यांची ड्रोन डिलिव्हरीची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ड्रोन डिलिव्हरीसाठी परवाना आणि नियमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने धोरण जाहीर केलं आहे, ज्याची अंमलबजावणी डिसेंबरपासून होईल. सुरक्षेच्या दृष्टीनेही सरकारकडून पाऊल उचललं जात आहे. व्यावसायिक वापरासाठी ड्रोनला परवानगी दिली जाणार आहे. यासाठी एक रिमोट पायलट असेल. केवळ दिवसा 400 फुटापर्यंत ड्रोन उडवलं जाऊ शकतं आणि याला वजनाचीही मर्यादा असेल. सरकारकडून कडक नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत ई-कॉमर्स कंपन्यांना ड्रोन डिलिव्हरी देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अमेझॉनकडून

आणखी >>

आर्मीत नोकरीसाठी सांगलीतील तरुणाचं टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

सांगली : आर्मीत भरती होण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर निराश  झालेल्या एका तरुणाने सांगली शहरातील एका टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केलं. नोकरीची लेखी हमी दिल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेऊन तो तरुण सांगली शहरातील स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. यामुळे शहरातील सर्व यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. अनिल हणमंत कुंभार (वय 26 वर्ष) असं त्या तरुणाचं नाव असून तो वाळवा तालुक्यातील इटकरे गावचा आहे. सुमारे पाच तासाच्या आंदोलनांनंतर अधिकाऱ्यांनी त्याला लेखी पत्राचे आश्‍वासन दिलं. यानंतर तो युवक संध्याकाळी पाचच्या सुमारास टॉवरवरुन खाली उतरला.

आणखी >>

राजीव गांधीच सामूहिक हत्याकांडाचे जनक, दिल्लीत भाजपचे पोस्टर्स

नवी दिल्ली:  1984 च्या शीख हत्याकांडात काँग्रेसचा सहभाग नव्हता, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीत अनेक पोस्टर्स लावले आहेत. त्या पोस्टर्सवर ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ म्हणजेच जमावाकडून होणाऱ्या हत्याकांडाचे, सामूहिक हत्याकांडाचे जनक - राजीव गांधी असं म्हटलं आहे.  दिल्लीतल्या चौकाचौकात असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. स्वत: बग्गा यांनी ट्विटरवरही हे पोस्टर्स आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मोदी सरकारच्या काळात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप आहे. पण आता भाजपने मॉब लिंचिंगकचे  जनक हे राजीव गांधी असल्याचं म्हटलं आहे.

आणखी >>

SBI ने 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले!

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने देशभरातील सुमारे 1300 शाखांची नावं आणि आयएफएससी कोडमध्ये बदल केला आहे. संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणानंतर ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे.

आणखी >>

लिव्ह इन पार्टनरचा खून करणाऱ्या मुंबईकर तरुणाला पुण्यात बेड्या

पुणे : पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून पुरावा नष्ट करणाऱ्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आंबेगाव पठार परिसरात 23 ऑगस्टला मध्यरात्री ही घटना घडली. मृत महिला (वय 35 वर्ष) आणि आरोपी (वय 27 वर्ष) तरुण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपी तरुण हा मूळचा मुंबईतील जोगेश्वरीमधील होता. पुण्यातील एका आयुर्वेद कॉलेजमध्ये तो बीएएमएसच्या शेवटच्या वर्षात तो शिकत होता. मुंबईत असतानाच त्याचे देहविक्री करणाऱ्या महिलेशी सूत जुळले होते. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर त्याने महिलेलाही सोबत आणलं आणि आंबेगाव पठार इथल्या सोसायटीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. तीन वर्ष ते एकत्र राहिले. पण त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. महिलेला दिल्लीला जायचं होतं, त्यासाठी ती तरुणाकडे 50 लाख रुपयांची मागणी करत होती. पैसे न दिल्यास त्याच्या कुटुंबीयांना सांगण्याची धमकी ती तरुणाला देत होती. यावरुन दोघांचं सतत भांडण होत असे. 23 ऑगस्टलाही त्यांच्या पैशांवरुन वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, अमोलने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री तीनच्या सुमारास बेडशीटच्या सहाय्याने तिचा मृतदेह सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या टाकीत टाकला. मात्र दुसऱ्या दिवशी सोसायटीतील नळांना पाणी न आल्याने रहिवाशांनी पाण्याच्या टाकीचं झाकण उघडून पाहिलं असता त्यांना एका महिलेचे पाय तरंगताना दिसले. त्यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता, तरुणी आरोपी तरुणासोबत राहत असल्याचं समोर आलं. तसंच त्यांच्यात आर्थिक कारणावरुन वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली.

आणखी >>

हिंदूंच्या भावना दुखावल्या, तर केरळसारखी शिक्षा मिळेल : भाजप आमदार

बंगळुरु : महापुरामुळे उद्ध्वस्त झालेलं केरळ आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांचे जीव गेले, अनेकजण बेपत्ता झाले, बेघर झाले... या सर्व गंभीर पार्श्वभूमीवर केरळवासियांना आधार देण्याऐवजी कर्नाटकातील भाजप आमदाराने जखमेवर मीठ चोळलं आहे. गोहत्यांमुळे केरळमध्ये महापूर आल्याचं धक्कादायक विधान भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी केले आहे. तसेच, हिंदूंच्या भावना दुखावल्या, तर केरळसारखी शिक्षा मिळेल, असेही आमदार पाटील म्हणाले. बसनगौडा पाटील हे कर्नाटकमधील विजयपुरा येथून भाजपचे आमदार आहेत. कायमच वादग्रस्त विधानांमुळे बसनगौडा पाटील हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. भाजप आमदार बसनगौडा पाटील नेमकं काय म्हणाले?

आणखी >>

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये डिझेलच्या किंमती विक्रमी स्तरावर पोहोचल्या आहेत. डिझेलच्या दरात 14 पैसे तर पेट्रोलच्या दरात 13 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज डिझेल 73 रुपये 84 पैशांनी मिळत असून पेट्रोलसाठी 85 रुपये 45 पैसे मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत डिझेलचा प्रतिलिटर दर 69.46 रुपयांवर पोहोचला असून तो आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. तर पेट्रोल 78 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत सेल्स टॅक्स किंवा व्हॅट कमी असल्याने दिल्लीत इंधनाचे दर कमी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयामधील घसरण, यामुळे डिझेलने नवा विक्रमी दर गाठला आहे. सोबत पेट्रोलचे दरही विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. 16 ऑगस्टपासून दरात सातत्याने वाढ डॉलरच्या तुलनेत रुपयात सर्वाधिक घसरण झाल्यानंतर 16 ऑगस्टपासूनच डिझेल-पेट्रोलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मागील दहा दिवसात मुंबईत डिझेलच्या किमतीत 49 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल प्रतिलिटर 57 पैशांनी महागलं आहे. वाढलेल्या किंमतीसाठी कोण किती जबाबदार? सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर 19.48 रुपये तर डिझेलवर 15.33 रुपये प्रति लिटर दराने एक्साईज ड्यूटी वसूल करते. यावर राज्य सरकार विविध दराने व्हॅट वसूल करतं. अंदमान आणि निकोबार पेट्रोल-डिझेलवर सर्वात कमी 6% दराने सेल्स टॅक्स वसूल करतं, तर मुंबई और तेलंगणा सरकार डिझेलवर सर्वाधिक 26-26 टक्के व्हॅट वसूल करतं. दिल्ली सरकार पेट्रोलवर 27% तर डिझेलवर 17.24% व्हॅट वसूल करतं.

आणखी >>

संघ राहुल गांधींना कार्यक्रमाला आमंत्रण देण्याची शक्यता

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आहेत. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता राहुल गांधींना आपल्या कार्यक्रमाला आमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

आणखी >>

मेजर लितुल गोगोईंवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली: श्रीनगरमधील एका हॉटेलबाहेर मुलीसह ताब्यात घेतलेले मेजल

आणखी >>

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेवर संजय राऊतांचे प्रश्नचिन्ह

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले की त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा केली असा प्रश्न संजय राऊतांनी शंका उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून 16 ऑगस्टला वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा केल्याचा दावा जय राऊतांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे संपादक राऊत यांनी वाजपेयींच्या निधनाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचे कोणतेही स्पष्टीकरण किंवा कारण दिलेले नाही. संजय राऊत काय म्हणाले? वाजपेयी यांच्या मृत्यूची घोषणा एम्सने 16 ऑगस्टला केली आणि त्यावेळी त्यांच्या निधनाची वेळही जाहीर करण्यात आली होती. आपल्या लोकांऐवजी, राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम 'स्वराज्य'काय आहे हे समजून घ्यावे. अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्टला निधन झाले, पण त्यांची प्रकृती 12-13 ऑगस्टपासून बिघडली होती. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय शोक व्यक्त करत नाही किंवा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवत नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधायचे होते म्हणूनच वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्टला झाले किंवा त्याची घोषणा त्या दिवशी केली असे संजय राऊत म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेजी यांचं 16 ऑगस्टला निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एम्स रुग्णालयातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांची टीम सध्या वाजपेयींवर उपचार करत होते. परंतु 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. संबंधित बातम्या

आणखी >>

यवतमाळमध्ये महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला

यवतमाळ | रक्षाबंधनादिवशीच यवतमाळमधील एका महिलेने चार मुलींना जन्म दिला आहे. यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राणी प्रमोद राठोड नावाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलींना जन्म दिला. मुली आणि त्यांची आई सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. राणी राठोड या महिलेला 25 जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान डॉक्टरांनी काळजी घेण्यासाठी या महिलेला येथे थांबण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून पती-पत्नी दोघेही रुग्णालयात राहात होते. आज रविवारी दुपारी 12.30 वाजता चार मुलींना महिलेने जन्म दिला. महिलेची डिलिव्हरी सामान्य झाली आहे, तसंच आई आणि मुली सुखरुप आहेत.

आणखी >>

भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन अटलजींसारखं आहे? गडकरींनी झापलं

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांचं चारित्र्य आणि वर्तन खरोखर अटलजींचे विचार आणि मिशनच्या जवळ जाणारं आहे का? असा प्रश्न केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना विचारला. नागपुरात दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देतानाच पक्षाचे विद्यमान नेते आणि कार्यकर्त्यांचा क्लास घेतला. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फक्त स्वतःबद्दल विचार करुन छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडत आहेत. माझं नाव पत्रिकेत छापलं नाही, पातळ हार घालून माझे स्वागत केले, माझा योग्य सन्मान केला नाही, मला घ्यायला कार्यकर्ते का नाही आले, मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा टोला गडकरींनी लगावला. भाजपमध्ये अनेक आमदार इतक्या संकुचित मनाचे आहे की ते अमुक कार्यकर्त्याला मंचावर बसवू नका, त्याला पक्षात घेऊ नका असे मुद्दे घेऊन वाद घालत बसतात. अशा छोट्या मनाने आपल्याला अटलजींच्या विचारांवर कसं चालता येईल? असा थेट सवाल गडकरींनी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना विचारला. अटलजी जसे खरोखर होते, तसे आपण आहोत का याचा विचार करा अशा शब्दात गडकरींनी कार्यकर्त्यांना सुनावले. पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डात अटलजी होते. मात्र त्यांनी कधीच आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी पद किंवा उमेदवारी मागितली नाही. पक्षाचे अनेक निर्णय त्यांच्या इच्छेविरोधातही व्हायचे, त्यांनी कधीच त्याला विरोध केला नाही. ते त्यांच्या व्यवहारातूनही लोकशाहीचे उपासक होते, असं गडकरी म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलजींमुळे भारत अण्वस्त्रसंपन्न देश होऊ शकल्याचं सांगितलं. अटलजींच्या आधीही भारतीय शास्त्रज्ञ देशाला अण्वस्त्र संपन्न बनवू शकत होते. मात्र तेव्हाचे पंतप्रधान शास्त्रज्ञांना परवानगी देत नव्हते. अटलजींनी एपीजे अब्दुल कलाम यांना पोखरण चाचण्या करण्याची परवानगी दिली. म्हणून देशाची ताकद वाढल्याचं फडणवीस म्हणाले.

आणखी >>

माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता : कन्हैया कुमार

मुंबई | माझं नाव कन्हैया अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता, असं म्हणत सीपीआयच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने विविध मुद्द्यांवर उघडपणे आपली मतं मांडली आहेत. ‘माझा कट्टा’वर कन्हैया कुमारने जेएनयू वाद, पीएचडी, तसंच आजवरच्या प्रवासावर दिलखुलास गप्पा मारल्या. केंद्रीय गृहमंत्र्यांनी माझे संबंध दहशतवादी हाफिज सईदशी असल्याचं विधान केलं होतं. मात्र आता सरकारच मला सुरक्षा पुरवत आहे. देशभर मी फिरतो तिथे मला सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. जर माझे संबंध हाफिज सईदशी असतील तर सरकार मला सुरक्षा का पुरवतं? असा सवालही कन्हैया कुमारने उपस्थित केला. तसंच गृहमंत्र्यांनी या विधानासाठी देशाची माफी मागावी अशी मागणीही केली. माझ्यावर जेएनयूमधील वादानंतर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला. जर मी कन्हैया अंबानी असतो तर हा आरोप झाला नसता. मी एका सामान्य कुटुंबातील असल्यामुळे मुद्दाम मला यात गोवण्यात आल्याचंही कन्हैयाने म्हटलं आहे. देशात कमकुवत लोकांची संख्या जास्त असल्याचा फायदा घेतला जात आहे. मात्र ज्यादिवशी सर्व कमकुवत लोक एकत्र येतील त्यादिवशी फायदा उठवणाऱ्यांची ताकत कमी होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. दरम्यान पीएचडीबद्दल कन्हैयाला प्रश्न विचारत आला. वयाच्या 30 व्या वर्षी मी पीएचडी मिळवली, जी सर्वसाधारणपणे इतक्याच वयात मिळते. पण मला प्रश्न विचारणाऱ्यांना मी आणखी एक प्रश्न विचारतो, मोदींना त्यांनी 35 व्या वर्षी MA का केलं असा प्रश्न कुणी का विचारत नाही? असा प्रतिप्रश्नही त्याने विचारला. आपण लोकांच्या कररुपी पैशांचा अपव्यय न केल्याचंही त्याने नमूद केलं.

आणखी >>

...तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या- उद्धव ठाकरे

मुंबई : केबल फुकट द्यायचे असेल तर रेशन आणि पेट्रोल-डिझेलही फुकट द्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जिओच्या नव्या सेट टॉप बॉक्सवरून रिलायन्सवर टीका केली. रिलायन्स जिओने सुरु केलेल्या नव्या सेट टॉप बॉक्सच्या घोषणेवरून केबल चालकाच्या व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची चिन्ह आहे. रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात सर्वात वेगानं संपूर्ण भारतात नेटवर्क पसरवलं. जिओनं आता सेट टॉप बॉक्स बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र व्यवसाय बंद पडण्याच्या भीतीनं सर्वच केबल चालकांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सला विरोध केला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केबल चालकांना मार्गदर्शन केलं.

आणखी >>

रामलीला मैदानाचं नव्हे, मोदींचं नाव वाजपेयी करा, तरच मतं मिळतील: केजरीवाल

नवी दिल्ली: दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाचं नाव बदलून, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महापालिकेतील भाजपच्या 5 नगरसेवकांनी दिला आहे. या प्रस्तावावरुन आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत, भाजपला पंतप्रधान मोदींचंच नाव बदलण्याची गरज आहे, तरच त्यांना मतं मिळतील, असं म्हटलं आहे. केजरीवालांचं ट्विट “रामलीला मैदान इत्यादीचं नाव बदलून अटलजींचं नाव दिल्याने मतं मिळणार नाहीत. भाजपला पंतप्रधानांचं नाव बदलावं लागेल. तेव्हा कुठे मतं मिळतील. कारण त्यांच्या नावे तर लोक आत मतं देत नाहीत”, असं केजरीवालांना म्हटलं आहे. दुसरीकडे आप नेत्या अलका लांबा यांनीही भाजपला धारेवर धरलं. “अटल बिहारी वाजपेयी हे काय रामापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल विचारत, भक्तांना कळत नाहीय की भगवान रामाच्या नावाला विरोध करावा की अटलजींच्या” असं लांबांनी म्हटलं आहे. भाजपचं स्पष्टीकरण आपच्या आरोपानंतर भाजपने पलटवार केला आहे. “आप खोटा प्रचार करत असून, भगवान राम आम्हा सर्वांसाठी आराध्य आहेत. त्यामुळे रामलीला मैदानाचं नाव बदलण्याचा प्रश्नच नाही”, असं दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं.

आणखी >>

स्तुती नको, भाषण आवरा, डोक्याला हात लावून पवारांच्या खाणाखुणा

बारामती (पुणे): एखाद्या वक्त्याने मंचावरील उपस्थित मान्यवरांची स्तुती करणं हे तसं सामान्य आहे. पण स्तुती नको, भाषण आवरा असं म्हणण्याची वेळ खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आली. ज्येष्ठ नागरिकांची पल्लेदार आणि विसंगत भाषणं ऐकून शरद पवारांनी डोक्याला हात लावून, भाषण आवरण्याच्या सूचना केल्या. बारामतीत वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयवदान आणि इतर उपकरणांचं वितरण करण्यात आलं. मात्र यावेळी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिकांनी योजनेविषयी न बोलता थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीचे गोडवे गाण्यास सुरुवात केली. त्यामुळे मंचावर उपस्थित असणाऱ्या शरद पवारांनी डोक्याला हात लावला.  आणि लाभार्थींचं मनोगत थांबवण्याच्या सूचना केल्या.

आणखी >>

प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ, जोडप्याचं ग्रामसभेतच पुन्हा लग्न

नागपूर : लग्न झाल्याचे पुरावे वारंवार देऊनही लग्नाचं प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला एका जोडप्याने चांगलाच धडा शिकवला आहे. कागदपत्रं देऊनही काही उपयोग होत नाही, यामुळे या जोडप्याने चक्क ग्रामसभेतच पुन्हा एकदा लग्न केलं. ग्रामसेवक आणि लोकांसमोरच पुन्हा एकमेकांना हार घातले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तातडीने लग्नाचं प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. नागपूर जिल्हयातल्या जलालखेडा गावात ही घटना घडली. सुरेंद्र आणि अश्विनी निकोसे यांचं जुलै महिन्यात लग्न झालं होतं. एका नोंदणीकृत संस्थेच्या कार्यालयात लग्न केल्यानंतर ग्रामपंचायतीत लग्न प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रं त्यांनी दिली होती. मात्र, ग्रामसेवक आनंद लोलुसरे यांनी असं लग्न मान्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नरखेड कोर्टात कोर्ट मॅरेज करुन तिथली कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतरच ग्रामपंचायतीतून लग्न प्रमाणपत्र मिळेल, असं सांगितलं होतं.

आणखी >>

खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हरचा टायर फुटला

नाशिक : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका बसला. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर घोटीजवळ फुटला. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावं लागल्याची माहिती आहे. मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात ही घटना घडली. तेथे रस्त्याला खूप मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमधून जाताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याचं सांगितलं जात आहे. खड्ड्यांचा त्रास तुम्हा-आम्हाला नवीन नाही. पण जेव्हा आदित्य ठाकरेंसारख्या महत्वाच्या नेत्याच्या गाडीचा टायर मध्यरात्री फुटतो, तेव्हा मात्र सोबतच्या सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडते. या घटनेनंतर दुसऱ्या गाडीने आदित्य ठाकरे मुक्कामासाठी हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर टायर फुटलेली गाडी टोईंग करुन नाशिकमध्ये आणली गेली आणि दोन्ही टायर बदलण्यात आले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना ज्या घोटी परिसरात घडली, त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे. एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी अशाच एका रस्त्याची दुर्दशा मांडली होती. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या भागात झाली आहे. खड्डे हुकवण्याच्या नादात या भागात एका दुचाकीस्वाराला आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

आणखी >>

यूपीएससी उत्तीर्ण दृष्टीहीन जयंत मंकलेची सरकार दरबारी लढाई सुरुच

नवी दिल्ली : आपल्या अंधत्वावर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत (सीएसई) उत्तीर्ण होणाऱ्या जयंत मंकलेची सरकार दरबारी लढाई सुरुच आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने (डीओपीटी) आता ही जबाबदारी दुसऱ्या मंत्रालयावर ढकलली आहे. डीओपीटीचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत आणि नंतर डीओपीटीचे जॉईंट सेक्रेटरी विजय कुमार सिंह यांच्यासोबत जयंतची चर्चा झाली. ''ज्या तीन पोस्ट शिल्लक आहेत, त्या परराष्ट्र मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय यांच्याकडून डीओपीटीला असं लेटर यायला पाहिजे, की ते अशा 75 टक्के अंध विद्यार्थ्याला पोस्ट द्यायला तयार आहेत,'' असं डीओपीटीकडून सांगण्यात आलं आहे. मंत्रालयाचा रिप्लाय आल्यानंतरच आम्ही पुढची कारवाई करू शकतो, असं जॉईंट सेक्रेटरींनी सांगितलं आहे. हा रिप्लाय कधीपर्यंत येणार असं विचारल्यावर, “त्यांचे उत्तर आहे, आम्ही ते सांगू शकत नाही”, असं उत्तर देण्यात आलं. ''आत्ता माझी सध्याची जी स्थिती आहे त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी काही द्या, यावरही त्यांचं म्हणणं आहे की ते आम्ही नाही देऊ शकत,'' अशी माहिती जयंत मंकलेने दिली. दरम्यान, ज्या तीन मंत्रालयांकडे डीओपीटीने बोट दाखवलं आहे, त्या तीनही मंत्रालयांनी या मुद्द्याकडे संवेदनशीलपणे पाहावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. https://twitter.com/supriya_sule/status/1033040451773726720 परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना टॅग करुन सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. https://twitter.com/supriya_sule/status/1033040612545781766 https://twitter.com/supriya_sule/status/1033040612545781766

आणखी >>

आरएसएसची विचारसरणी मुस्लीम ब्रदरहूडसारखी : राहुल गांधी

लंडन : परदेशातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) निशाणा साधला आहे. जर्मनीनंतर राहुल गांधी आता लंडनला पोहोचले आहेत. आरएसएस भारतीय संस्थांवर कब्जा करु पाहत आहे. आरएसएसची विचारसरणी आखाती देशांमधील मुस्लीम ब्रदरहूडसारखी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. ''आरएसएस भारताची नैसर्गिक रचना बदलण्याचा प्रयत्न करत आहे. इतर पक्षांनी कधीही संस्थांवर कब्जा मिळवण्यासाठी हल्ला नाही केला. आरएसएसची विचारसरणी आखाती देशांमधील मुस्लीम ब्रदरहूडसारखी आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणानंतर भारत यशस्वी झाला, पण गेल्या चार वर्षात सत्तेचं केंद्रीकरण होत आहे,'' असं राहुल गांधी म्हणाले.  

आणखी >>

'त्या' वक्तव्याप्रकरणी शरद पवारांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. दोनदा मतदान करण्याच्या विधानासंदर्भातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला. इंडिया अगेंस्ट करप्शन संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पवारांविरोधात याचिका दाखल केली होती. दाखल केलेली याचिका ही सुनावणी योग्य नसल्याने आम्ही ती फेटाळत आहोत. मात्र याचिकाकर्ते ही याचिका आम्ही फेटाळण्याआधी मागे घेऊ शकतात. अशी विचारणा न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने करताच याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आपली याचिका मागे घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माथाडी कामगारांच्या एका सभेत पवारांनी म्हटलं होतं की, निवडणुका दोन वेगळ्या तारखांना आहेत. तेव्हा एकदा गावी आणि नंतर कामाच्या ठिकाणी असं दोनदा मतदान करा. यावर शरद पवारांनी मतदारांची दिशाभूल केली, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तसेच संबंधित विभागाकडेच दाद मागण्याचे निर्देश दिले होते. मात्र निवडणूक आयोगाने योग्य दखल न घेतल्याने याचिकाकर्त्यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाने यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.

आणखी >>

गुप्तधनासाठी चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न, तिघे अटकेत

औरंगाबाद | गुप्तधनासाठी मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. फुलंब्री तालुक्यातील रांजणगावमध्ये एका चिमुकलीचा बळी दिला जाणार होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने मुलीचा जीव बचावला आहे. अंधश्रद्धेतून मुलीचा बळी देण्यासाठी रांजणगावात सर्व तयारी करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि वडोदबाजार पोलिसांनी अचानक छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. इमाम पठाण आणि बाळू शिंदे अशी यातील दोन आरोपींची नावं आहेत. ही पूजा करण्यासाठी एकाला 1 लाख 68 हजार रुपये देण्यात येणार होते, अशी माहितीही समोर आली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी नग्न पूजा आणि बालिकेचा बळी दिला जाणार होता. मात्र, अंनिस आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळं पुढील अनर्थ टळला आहे.

आणखी >>

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पहिल्याच पिल्लाचा सातव्या दिवशी मृत्यू

मुंबई | राणीच्या बागेतील हॅम्बोल्ट पेंग्विनच्या नवजात पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी या पिल्लाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आणखी >>

फॉरवर्डेड मेसेजचा सोर्स सांगण्यास व्हॉट्सअॅपचा नकार!

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर मेसेजचा सोर्स माहिती करुन घेण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी नकार दिला आहे. केंद्र सरकारने या प्रकारचं तंत्र विकसित करण्याची मागणी कंपनीकडे केली होती, जी व्हॉट्सअॅपने फेटाळली आहे. व्हॉट्सअॅपचं सरकारला उत्तर सरकारचं म्हणणं आहे, की असं तंत्र विकसित करावं, ज्यामुळे बनावट मेसेज कुणी पाठवला आहे, त्या मूळ सोर्सचं नाव माहित होईल. अफवांच्या आधारावर देशात अनेक ठिकाणी जमावाकडून निरपराध लोकांच्या हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे. याबाबत व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे. या प्रकारचं सॉफ्टवेअर विकसित केल्यास मेसेज सिस्टम प्रभावित होईल आणि व्हॉट्सअॅपच्या खाजगी नियमांवरही त्याचा परिणाम होईल. शिवाय या तंत्राचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता आहे. “आम्ही सुरक्षा कमकुवत होऊ देणार नाही”, असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. ''बँक तपशील असो किंवा इतर खाजगी माहिती, युझर्स व्हॉट्सअॅपचा वापर संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी करतात. आमचं लक्ष्य भारतीयांसोबत मिळून त्यांना चुकीच्या माहितीपासून जागृत राहण्याबाबत प्रशिक्षण देणार आहोत. याच माध्यमातून युझर्सना सुरक्षित ठेवलं जाईल,'' असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांच्या मते, सरकार या गोष्टीवर जोर देत आहे, की भडकाऊ मेसेज रोखण्याच्या दृष्टीने व्हॉट्सअॅपने प्रयत्न करावेत आणि असे मेसेज करण्याऱ्यांची माहिती मिळावी. जगभरात व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या दीड अब्ज आहे. भारत कंपनीसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात 20 कोटींपेक्षाही जास्त व्हॉट्सअॅप युझर्स आहेत.

आणखी >>

आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा, पोटच्या मुलीची अजब मागणी

पालघर : आजच्या इंटरनेटच्या युगात अनेक कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत. मात्र निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला येऊ न शकलेल्या मुलीने चक्क पार्थिवाचं अंत्यदर्शन व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगने घेऊन, अस्थी कलश कुरियर करण्याची मागणी गावकऱ्यांकडे केली आहे. मनोर इथील निरीबाई धीरज पटेल या 65 वर्षीय पारशी महिलेचं वृद्धापकाळाने निधन झालं. पती धीरज पटेल यांच वय झाल्याने त्यांना चालण्याचीही ताकद नाही. तर एकुलती एक मुलगी लग्न करुन गुजरातमधील अहमदाबादमध्ये असल्याने, त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला. ग्रामस्थांनी ही बाब मुलीला कॉल करुन सांगितली. पण मला यायला जमणार नाही, असं सांगत तिने व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगने आईच्या पार्थिवाचं दर्शन द्या आणि अस्थीही कुरिअर करा, अशी अजब मागणी केली. मुलीच्या या मागणीनंतर गावकऱ्यांनी तोंडात बोटं घातली. पटेल दाम्पत्य पारशी असल्याने मनोरमध्ये पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सुविधा नाही. त्यामुळे गावातील हिंदू-मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारशी असलेल्या निरीबाई यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. सध्या सुरु असलेल्या धावपळीमुळे अनेक काम ऑनलाईन झाली आहेत. मात्र यामुळे संवेदनशीलता कमी झाली आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होऊ लागला आहे.

आणखी >>

'मोरुची मावशी' विजय चव्हाण यांची कारकीर्द

मुंबई : 'टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक, टुंग' ही गाण्याची धून वाजली की डोळ्यासमोर येणारा एकमेव चेहरा म्हणजे दिग्गज अभिनेते विजय चव्हाण यांचा. 'मोरुची मावशी' नाटकामुळे लोकप्रिय झालेल्या विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबागमध्ये झाला होता. भारतमाता चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर विजय चव्हाणांनी रुपारेल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला होता. विजय कदम, विजय चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून 'रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरु केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे 'टूरटूर' नाटक करत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना विजय चव्हाणांचं नाव सुचवलं. या नाटकातूनच त्यांना 'हयवदन' हे नाटक मिळालं. या नाटकाचे भारतभरासोबतच परदेशातही प्रयोग झाले. हे नाटक पाहून त्यांना सुधीर भटांनी 'मोरुची मावशी' नाटकासाठी विचारणा केली. त्यावेळी विजय चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरु केले. आचार्य अत्रे लिखित 'मोरुची मावशी' या नाटकात त्यांनी रंगवेलं स्त्री पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं. या नाटकात विजय चव्हाणांचं विनोदाचं टायमिंगही भाव खाऊन गेलं. 'मोरुची मावशी' नाटकाने दोन हजारापेक्षा जास्त प्रयोग करत रंगभूमीवर इतिहास घडवला. त्यानंतर चव्हाण यांना 'तू तू मी मी' हे नाटक मिळालं. या नाटकात त्यांनी 14 भूमिका साकारल्या होत्या. अक्षरशः काही सेकंदांमध्ये वेशभूषा बदलून ते रंगभूमीवर यायचे आणि प्रेक्षकही अवाक व्हायचे.

आणखी >>

मराठी सिनेसृष्टीतील तारा निखळला, अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. विजय चव्हाण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. पुढे अनेक चित्रपट आणि मालिकाही केल्या. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं. गेले काही दिवस विजय चव्हाण हे आजारी होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आजारावर मात करत, ते घरी परतले होते. यावेळी मात्र विजय चव्हाण मृत्यूशी झुंज हरले. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत, टूरटूर, हयवदन यांसारखी अनेक नाटकं विजय चव्हाण यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली. सिनेमा क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी सिनेसृष्टीचा मोठा कालावधी विजय चव्हाण यांनी पाहिला, त्यातील बदल पाहिले आणि त्यात बहुमूल्य योगदानही दिले.  

आणखी >>
  • 1