काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आणखी एकाला जालन्यातून अटक

मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला जालन्यातून अटक केली. कट्टर हिंदूत्ववादी अशी ओळख असलेल्या श्रीकांत पांगारकरला एटीएसने अटक केली. जालना शहरातील महसूल कॉलनीमध्ये राहणारा श्रीकांत पांगारकर मूळचा शिवसेनेशी जोडलेला कार्यकर्ता होता. पक्ष कार्यकर्ता म्हणून ओळख असताना 2001 साली शिवसेनेने त्याला भाग्य नगर भागातून तिकीट दिलं, त्यावेळी तो या तिकिटावर निवडून आला. यानंतर 2006 साली पुन्हा तो या भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला. 2011 साली पक्षाशी फारसा सक्रिय नसल्याच्या कारणावरून त्याला पक्षाचं तिकीट देण्यात आलं नाही. या काळात त्याचा हिंदू जन जागृती संघटनेशी संबंध आला. यानंतर तो या संघटनेचा सक्रिय सदस्य म्हणूनच कार्यरत होता. आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा पांगारकरचा परिवार आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक? एटीएसने पांगारकरला काल औरंगाबादमध्ये ताब्यात घेऊन जालन्यात चौकशीसाठी नेलं होतं. नालासोपारा स्फोटकांच्या चौकशीनंतर एटीएसने अखेर त्याला अटक केली. नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसची ही आतापर्यंतची चौथी अटक आहे. नालासोपारामध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना शनिवारी

आणखी >>

एकाच डावात पाच झेल, पदार्पणाच्या सामन्यातच ऋषभ पंतचा विक्रम

नॉटिंगहॅम : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाच विकेट घेत इंग्लंडच्या पहिल्या डावाचं कंबरडं मोडलं. पंड्याच्या पाच, इशांत शर्मा आणि बुमरा यांच्या प्रत्येकी दोन विकेटमुळे इंग्लंडचा पहिला डाव 161 धावांवर आटोपला. भारतीय संघाला 168 धावांची आघाडी मिळाली आहे. आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतने मात्र या सामन्यात कमाल केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून पाच झेल घेतले, जो एक विश्वविक्रम आहे. पदार्पणाच्या सामन्यात एकाच डावात पाच झेल घेणारा तो आशियातील पहिलाच यष्टिरक्षक ठरला आहे. यापूर्वीही फलंदाजीमध्ये त्याने कमाल केली होती. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत खातं उघडणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता. त्यानंतर यष्टिरक्षण करतानाही त्याच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला. ऋषभने दोन झेल इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर घेतले, तर एक झेल जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर घेतला. पहिल्या डावाची सुरुवात इंग्लंडने चांगली केली. मात्र उपहारानंतर इंग्लंडची फलंदाजी ढासळली. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरता आला नाही.

आणखी >>

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट चुकीचीच : कॅ. अमरिंदर सिंह

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यानंतर वादात सापडलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू भारतात परतले आहेत. भारतात येताच त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत घेतलेल्या गळाभेटीचंही समर्थन केलं. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ''आपले जवान दररोज शहीद होत आहेत. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मारलेल्या मिठीचं मी समर्थन करणार नाही. खरं तर माणसाला हे मनानेच समजायला हवं, की आपल्या जवानांना दररोज मारलं जात आहे,'' असं म्हणत अमरिंदर सिंह यांनी आपल्याच कॅबिनेट मंत्र्याची कानउघाडणी केली.  

आणखी >>

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत गळाभेटीचं सिद्धूंकडून समर्थन

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला गेल्यानंतर वादात सापडलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू भारतात परतले आहेत. भारतात येताच त्यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत घेतलेल्या गळाभेटीचंही समर्थन केलं. “मी परवानगी घेऊन पाकिस्तानमध्ये गेलो होतो. देशाचा कोणताही नियम तोडलेला नाही,” असा दावा सिद्धू यांनी एबीपी न्यूजशी बोलताना केला.  

आणखी >>

अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थींचं गंगा नदीत विसर्जन

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आलं. यावेळी हरिद्वारमधील भल्ला कॉलेज मैदानापासून कलश यात्रा काढण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यात सहभागी झाले. विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. दिल्ली येथील स्मृती स्थळाहून तीन वेगवेगळ्या कलशात अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थी देशभरातील सुमारे 100 नदींमध्ये विसर्जित केल्या जाणार आहेत. वाजपेयींच्या स्मरणार्थ सोमवारी दिल्लीतील के .डी. जाधव स्टेडिअममध्ये सर्वपक्षीय प्रार्थना सभा होणार आहे. त्याचबरोबर सर्व राज्यांमध्ये प्रार्थना सभांचं आयोजनही करण्यात आलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राष्ट्रीय स्मृतिस्थळी शुक्रवारी (17 ऑगस्ट) अंत्यसंस्कार करण्यात आले. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

आणखी >>

‘डी-कंपनी’च्या तिजोरीची ‘चावी’ सापडली, दाऊदचा हस्तक अटकेत

लंडन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणांनी लंडनमध्ये जबीर मोतीवर कारवाई केली. पाकिस्तानी नागरिक असलेला जबीर मोती हा ‘डी-कंपनी’च्या तिजोरीचा सर्वेसर्वा आहे. दाऊदचे आर्थिक व्यवहार जबीर मोती पाहतो. शिवाय, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातही दाऊदचं काम जबीरच पाहतो. जबीर मोती ब्रिटनमध्ये राहत होता. दाऊदची पत्नी महजबीन, मुलगी महरीन आणि जावाई जुनैद (माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा) यांच्यातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीनंतर हिल्टन हॉटेलमधून जबीर मोतीला ताब्यात घेण्यात आले.

आणखी >>

नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्याला अटक

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने अटक केली आहे. नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला ताब्यात घेण्यात आलं आणि याच प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सचिनकडून दाभोलकरांच्या हत्येचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. सध्या एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी एकाने दाभोलकरांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे. सचिन औरंगाबादमध्ये एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करतो. सचिन अणदुरेनेच हत्या केली, असा सीबीआयचा दावा आहे. या प्रकरणात जालन्यातूनही एकाला अटक झाली आहे. त्याचीही आता सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. गोळ्या झाडणारे दोन जण होते, त्यामुळे दुसरा बंदूकधारी जालन्यात अटक करण्यात आलेला आहे का, या दिशेने आता तपास करण्यात येत आहे. श्रीकांत पांगारकर असं जालन्यात अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो हिंदूत्ववादी असल्याची माहिती आहे. काम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचीही चौकशी केली जात आहे. पानसरे हत्या प्रकरणाशी या अटक केलेल्यांचा संबंध आहे का याची चौकशी होणार आहे.

आणखी >>

विराटचं शतक तीन धावांनी हुकलं, पहिल्या दिवसअखेर भारत 307/6

नॉटिंगहॅम : विराट कोहलीने नॉटिंगहॅम कसोटीत कर्णधारास साजेशी खेळी उभारून टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडियाच्या कर्णधाराने अजिंक्य रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 159 धावांची भक्कम भागीदारी रचली. त्यामुळे भारताला पहिल्या दिवसअखेर सहा बाद 307 धावांची मजल मारता आली. त्याआधी या कसोटीत शिखर धवन आणि लोकेश राहुलने 60 धावांची सलामी दिली होती. पण ख्रिस वोक्सने धवन, राहुल आणि चेतेश्वर पुजाराला माघारी धाडून टीम इंडियाची तीन बाद 82 अशी केविलवाणी अवस्था केली. विराट आणि अजिंक्यच्या भागीदारीने भारतीय संघाला त्या संकटातून बाहेर काढलं. पण भारतीय कर्णधाराचं शतक तीन धावांनी हुकलं. आदिल रशिदच्या उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात विराटने पहिल्या स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल दिला. त्याने 152 चेंडूंत अकरा चौकारांसह 97 धावांची खेळी उभारली. अजिंक्य रहाणेला अखेर सूर गवसला टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अखेर सूर गवसला. त्याने नॉटिंगहॅम कसोटीत आपल्या भात्यातले फटके काढून लौकिकाला साजेशी खेळी उभारली. या खेळीत त्याने मानसिक ओझं झुगारून फलंदाजी केल्याचं दिसलं. अजिंक्यने 131 चेंडूंत 12 चौकारांसह 81 धावांची खेळी उभारली. त्याने आपल्या कर्णधाराला दिलेली दमदार साथ भारताच्या डावाच्या उभारणीत मोलाची ठरली. ऋषभ पंतने आपल्या पहिल्याच सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. सध्या तो 22 धावांवर खेळत आहे. 23 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 75 षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

आणखी >>

महिला प्रवाशाशी गैरवर्तन करणं आरपीएफ जवानाला महागात

कल्याण : महिलेशी असभ्य वर्तन करणं आरपीएफ जवानाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण, या आरपीएफ जवानाची सेवेतून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात 18 जून रोजी ही घटना घडली होती. ज्यात राजेश जांगीड नामक आरपीएफ जवानाने झोपेचं सोंग घेत एका महिलेशी असभ्य वर्तन केलं. याबाबतचा

आणखी >>

मुलाच्या नाकात अडकलेली काडी तब्बल सहा वर्षांनी काढली

पुणे : एखादी गोष्ट आपल्याला बोचत असेल तर ती वेदना असह्य होते. मात्र 15 वर्षांच्या सुरज सवंत याने तर तब्बल सहा वर्ष नाकात अडकलेल्या काडीसोबत काढले. आता पुण्यातील ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करुन त्याच्या नाकातली ही काडी काढण्यात आली आहे. सुरज हा मूळचा नेपाळमधील काठमांडू इथे राहणारा आहे. सूरज सहा वर्षांपूर्वी झाडावरून खाली पडला होता. त्यावेळी एक काडी त्याच्या डोळ्याला लागली. ती काडी डोळ्यातून थेट त्याच्या नाकात गेली. हा अपघात घडल्यानंतर सूरजच्या आई-वडिलांनी लगेचच डॉक्टरकडे धाव घेतली. पण स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. अखेर सूरजच्या नातेवाईकांनी त्याला पुण्याच्या ससून रूग्णालयात दाखल केलं. यादरम्यान सुरजला वेदनाही सहन कराव्या लागल्या. ससूनच्या डॉक्टरांनी सुरजचं सिटी स्कॅन केलं. तेव्हा आठ सेंमीचा काडीचा तुकडा त्याच्या नाक आणि मणक्याच्या मध्ये अडकल्याचं लक्षात आलं. ही शस्त्रक्रीयाही अत्यंत आव्हानात्मक होती. यामध्ये सुरज कायमस्वरुपी अपंग होण्याचीही शक्यता होती. मात्र ससूनच्या डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रीया यशस्वी करुन दाखवली.

आणखी >>

पिंपरी चिंचवडमध्ये 800 रुपये आणि मेमरी कार्डसाठी मित्राची हत्या

पिंपरी चिंचवड : आठशे रुपये आणि मेमरी कार्ड परत न दिल्याने मित्राने मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली. 15 जुलैच्या रात्री ही घटना थेरगावमध्ये घडली होती. पवन सुतार असं मयताचं, तर अनिल मोरे असं आरोपी मित्राचं नाव आहे. दोघे मित्र सुतार काम करायचे, तर एका खाजगी बसवर पवन चालक म्हणूनही कार्यरत होता. दोघांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या सुतार कामाची मजुरी पवनने घेतली. त्यापैकी आठशे रुपये पवनने अनिलला न देता, स्वतः खरचले. तशी तर दोघांची मैत्री घट्ट होती, दारूच्या पार्ट्या ही एकत्रच रंगायच्या, इतकंच काय तर ते दोघात एकच मोबाईल वापरत असे. हा मोबाईल अनिलचा होता, मात्र मैत्रीखातर तो पवनला वापरायला देत असे. तेव्हा स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ ठेवण्याची तयारी तो नेहमीच दाखवत असे. एके दिवशी मात्र पवनकडचे पैसे संपले आणि त्याने मोबाईलमधील मेमरी कार्ड गहाण ठेवून दारू घेतली. मग मात्र अनिल आणि पवनमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. हत्येच्या दिवशी सकाळी दारू पिताना पुन्हा आठशे रुपये आणि मेमरी कार्डवरून वादंग पेटला. यात पवननेच अनिलच्या कानशिलात लगावल्या. अनिलला मात्र हे सहन झाले नाही, तो रात्री पुन्हा दारू प्यायला. त्याच नशेत बसमध्ये झोपलेल्या पवनवर चाकूने हल्ला करत, त्याची हत्या केली. अनिलनेच पवनची हत्या केली होती, मात्र वाकड पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहचायला महिना लागला. दोघे एकच मोबाईल वापरत असल्याने, सीडीआरमध्ये एकमेकांना फोन केल्याचं निष्पन्न झालं नाही. त्यामुळेच पोलिसांना हत्येचा उलघडा करायला वेळ लागला.

आणखी >>

काँग्रेसचे आमदार-खासदार केरळसाठी एक महिन्याचं वेतन देणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील काँग्रेसचे आमदार आणि खासदार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलं एक महिन्याचे वेतन देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेतल्यानंतर ही माहिती दिली. राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. दरम्यान, केरळसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. आम आदमी पक्षानेही केरळसाठी सर्व आमदार, मंत्री आणि खासदारांचं एक महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केरळला 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं आहे. राज्य सरकारचाही मदतीचा हात केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. शिवाय विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून 20 कोटींचं अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.

आणखी >>

रिषभ पंतचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण, भारताचा 291वा कसोटीपटू

नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचं मोठं दडपण टीम इंडियासमोर असणार आहे. पहिल्या दोन सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघान मोठे बदल केले आहेत. विकेटकीपर दिनेश कार्तिकला आजच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. रिषभ पंतचं कसोटी संघात आगमन कार्तिकच्या जागी 20 वर्षीय रिषभ पंतला कसोटी सामन्यात संधी देण्यात आली आहे. रिषभ पंतचा हा पहिला कसोटी सामना असणार आहे. भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण करणार रिषभ 291वा खेळाडू ठरला आहे. रिषभने भारत अ संघाकडून खेळताना इंग्लंडमध्ये जबरदस्त खेळी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे.

आणखी >>

साताऱ्यात उपसरपंचाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये त्रास देणाऱ्यांची नावे

सातारा : सातारा जिल्ह्यात विद्यमान उपसरपंचाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विनोद भोसले असे विद्यमान उपसरपंचाचे नाव आहे. विनोद भोसले यांनी मध्यरात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते होळ गावाचे उपसरपंच होते. आत्महत्येपूर्वी विनोद भोसलेंनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. व्याजाच्या त्रासाला कंटाळून विनोद भोसले यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटवरुन समोर आले आहे. सुसाईड नोटमध्ये विनोद भोसले यांनी व्याज मागणाऱ्यांची नावं लिहून ठेवली आहेत.

आणखी >>

राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

मुंबई : केरळात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे. नंदुरबार, यवतमाळ, धुळे, अकोला या जिल्ह्यातील काही भागांत पावासाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तर गोंदियातही अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर देवरी तालुक्यातील डोंगरगावाला चक्रीवादळाच तडाखा बसला आहे. नवापूरमध्ये पावसाचा कहर, पाच जण ठार महाराष्ट्राच्याही अनेक भागांतही पावसानं धुमाकूळ घातला आहे..नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात पावसाने 5 जणांचा मृत्यू झालाय. तर सहाजण बेपत्ता आहेत. सध्या परिसरातील तब्बल 300 च्यावर घरांची पडझड झाली आहे. तसेच 60 जनावरे देखील दगावली आहेत. नवापुर तालुक्यात शुक्रवारी पहाटे 140 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. दुसरीकडे विसरवाडी परिसरातील वाडी शेवाडी प्रकल्पाला भगदाड पडल्याने सरपणी नदीला पुर आला आहे. अकोल्या विक्रमी पाऊस गेल्या 48 तासांत अकोला जिल्ह्यात या मोसमातला सर्वाधिक पाऊस झाला आहे. मागच्या 48 तासात जिल्ह्यात सात तालुक्यांत सरासरी 90 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्याला अतिवृष्टीनं झोडपलं आहे. अकोला जिल्ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पुर्णा, मोर्णा या नद्यांना पूर आला आहे. बाळापूर तालूक्यातील निंबा, अंदूरा या गावांमध्ये तर मुर्तिजापूर तालूक्यातील काटेपूर्णा नदीकाठावरील शेलू बोंडे,भटोरी, दाताळा, मंगरूळ कांबे या गावांमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे धरणसाठ्यात मात्र काही प्रमाणात वाढ झाली आहे. यवतमाळमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान दिग्रस तालुक्यातील धानोरा येथील बाजीराव डेरे आणि उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील अंकूश साबळे हे दोन तरुण पुरात वाहून गेले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने 937 घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये दिग्रस तालुक्यातील 400, महागाव तालुक्यातील 251, उमरखेड तालुक्यातील 100 घरांचा समावेश आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यात 29 जनावरं देखील वाहून गेली आहेत. दिग्रस शहरात काल एकूण 210 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अडाण प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. हवामान विभागाच्यावतीने अनेक गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपुरातही पावसाची जोरदार हजेरी चंद्रपूरमध्ये कोरपना तालुक्यातील अंतरगाव या गावाला पुराच्या पाण्याने विळखा दिला आहे. सध्या अंतरगावकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने लोकांचा देखील संपर्क खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिसरातील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी गावात आणि शेतात घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे. धुळ्यात ओढ्यांना, नाल्यांना पूर धुळे जिल्ह्यात शुक्रवारच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे लोंढा नदीला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. तर एक बैल गाडी वाहून गेली आहे. सध्या शिरपूर, साक्री तालुक्यातील लहान नदी, ओढ्यांना देखील पूर आला आहे. तर, दुसरीकडे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील जलपातळी वाढली नसल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.

आणखी >>

45 देश, 36 खेळ, 572 खेळाडू आणि लक्ष्य एकच... एशियाडचं पदक

ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आता सज्ज. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात 18 व्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तातल्या गेलोरा बन्ग कार्नो स्टेडियमवर आज संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या घवघवीत यशानंतर एशियाडमध्येही भारतीय शिलेदारांकडून त्याच कामगिरीची अपेक्षा केली जातेय. 45 देश... 36 खेळ... 572 खेळाडू... आणि लक्ष्य एकच....एशियाडचं पदक. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात आयोजित अठराव्या एशियाडसाठी भारताचं 572 खेळाडूंचं पथक सज्ज झालंय. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली. त्यानंतर आता एशियाडमध्येही भारतीय पथकाकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे. एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठीचा सर्वोच्च क्रीडामेळा. ऑलिम्पिकच्या धर्तीवर दर चार वर्षांनी आशियाई देशांसाठी होणारा बहुविध खेळांचा महोत्सव म्हणजे एशियाड. आशियाई ऑलिम्पिक समितीच्या वतीनं एशियाडचं आयोजन करण्यात येतं. आशिया खंडातल्या तब्बल 45 देशांचा एशियाडमध्ये सहभाग असतो. ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे. इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेमबान्ग शहरांमध्ये यंदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तात होणारं हे आजवरचं दुसरं एशियाड आहे. याआधी 1962 साली जकार्तामध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जकार्तासह पालेमबान्ग शहरातही एशियाडच्या काही क्रीडाप्रकारांचं आयोजन करण्यात येईल. इंडोनेशियातल्या अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं पणाला लागलेली असतील. त्यासाठी 45 देशांमधले हजारो खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सिद्ध झाले आहेत. आपला भारत आणि एशियाडचं भावनिक नातं आहे. भारतानं आजवर दोनवेळा एशियाडचं यशस्वी आयोजन केलं आहे. 1951 साली म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत भारतात पहिल्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळं नवी दिल्लीत एशियाडचा हा मेळा संपन्न झाला होता. आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पुढे 1982 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नवी दिल्लीत दुसऱ्यांदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. 1982 सालच्या एशियाडमध्ये भारताला 13 सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पाचवं स्थान मिळालं होतं. त्या एशियाडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोधचिन्ह अप्पू. आज ४५ ते ५० वयोगटातल्या भारतीयांच्या मनात तो अप्पू आजही घर करुन आहे. एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये भारताला 11 सुवर्ण, नऊ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. गत एशियाडमधली 57 पदकांची ती कमाई यंदा आणखी वाढवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न राहील. ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्स ही भारतीय खेळाडूंची एशियाडआधीची पूर्वपरीक्षा होती. त्या परीक्षेत भारतीय शिलेदारांनी घवघवीत यश मिळवलं. भारताचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं ते यश एशियाडमध्ये परावर्तित होतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आणखी >>

फलक लावणारा पिंपरी चिंचवडमधील 'तो' प्रियकर अखेर सापडला

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील 'त्या' पाट्यांमागील गूढ अखेर उकलले आहे. प्रियकराने प्रेयसीला माफी मागण्यासाठीच असे फलक लावल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. हा प्रताप करणाऱ्याचे निलेश खेडेकर असं नाव असून तो पुण्यात राहणारा आहे. निलेश खेडेकर राजकीय नेत्याचा पाहुणा असल्याची माहितीही समोर येतेय. निलेशने त्याचा मित्र आदित्य शिंदेला हे फ्लेक्स लावायला सांगितले आणि त्याने ही एका रात्रीत 'शिवडे, आय एम सॉरी' अशा आशयाच्या पाट्या झळकवल्या. बरं हे एक दोन नव्हे तर बहात्तर हजाराचे तब्बल 300 फ्लेक्स छापून घेतले होते. निलेशची 'शिवडे' ही पिंपळे सौदागर मध्ये राहणारी असल्याने, पिंपळे सौदागर ते वाकडच्या भुजबळ चौक मार्गावर या मनधरणीच्या पाट्या लावल्यात. या पाट्या अनधिकृत असल्याने प्रसिद्धीचा खर्च समजू शकला नाही. पण जाहिरातीचा खर्च हा पाच रुपये प्रति चौरस फूट आकारला जातो, त्यामुळे हा माफीनामा लाखोंच्या घरात नक्कीच गेला असावा. वाकड पोलिसांनी महापालिका आणि जाहिरातदारांकडे चौकशी केल्यानंतर हा प्रताप समोर आला असून शहराचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी उद्या गुन्हा दाखल केला जाणार आहे.

आणखी >>

केरळ पूर : आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक लोक बेघर

तिरुअनंतपुरम : महापुरामुळे केरळमध्ये हाह:कार माजला असून, त्यात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हवामान विभागाने केरळमधील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. भीषण पुरात आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

आणखी >>

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलगी नमिताकडून मुखाग्नी

नवी दिल्ली: देशाच्या राजकाराणातील महाऋषी, भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले. संध्याकाळी पाचच्या सुमारास  दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळी वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजातशत्रू, हळव्या मनाचा कवी, अभ्यासू पत्रकार, दिलदार आणि जिंदादिल राजकारणी असलेल्या वाजपेयींना निरोप देण्यासाठी देशा-विदेशातील मान्यवरांची पावलं, स्मृतीस्थळाकडे वळली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते. दुसरीकडे भूतानचे राजा वांगचूक, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनीदेखील वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींना अखेरचा निरोप देताना मोदी, अडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले. सुरुवातीला तिनही दलाच्या प्रमुखांनी वाजपेयींना मानवंदना दिली. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा आणि हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंदर सिंह धानोआ यांनी वाजपेयींनी सलामी दिली. यानंतर विविध मान्यवरांनी वाजपेयींना श्रद्धा सुमनं वाहिली. जवानांनी वाजपेयींच्या पार्थिवावरील तिरंगा  कुटुंबीयांना सुपुर्द केला. वाजपेयींची नात निहारिका यांनी तिरंगा मानाने स्वीकारला. अंत्यसंस्कारापूर्वी वाजपेयींना तीनशे जवानांकडून मानवंदना अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय स्मृतीस्थळ मंत्रोचारांच्या स्वराने धीरगंभीर झाला होता. तर वाजपेयींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. मोदी, फडणवीस, अमित शाह अंत्ययात्रेत सहभागी भाजप मुख्यालयातून अलोट गर्दीत वाजपेयींचा अखेरचा प्रवास सुरु  झाला. दुपारी दोनच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी भाजपचे सर्व दिग्गज नेते अंत्ययात्रेत उपस्थित होते. दिल्लीतील रस्त्यावर एकच गर्दी उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप मुख्यालय ते राष्ट्रीय स्मृती स्थळ 11 किमीचं अंतर चालत पूर्ण करत, अंत्ययात्रेत सहभागी झाले. निवासस्थानी दिग्गजांची श्रद्धांजली अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव काल रात्री आठच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानीही मोठी गर्दी झाली होती. नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी वाजपेयींचं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास वाजपेयींचं पार्थिव भाजप मुख्यालयात नेण्यात आलं. राष्ट्रीय स्मृतीस्थळ नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती या ठिकाणी अटलजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय स्मृतीस्थळावर ज्या ठिकाणी वाजपेयींचं स्मारक असेल ते ठिकाण हे पंडित नेहरु यांचं समाधीस्थळ शांतीवन आणि लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक विजय घाट यांच्या मध्ये आहे. स्मारकासाठी स्वतंत्र जागा कमी पडू लागल्यानंतर एकाच ठिकाणी राष्ट्रीय स्मृती नावाने पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची स्मारकं बनवली गेली आहेत. राष्ट्रीय स्मृतीस्थळावर ग्यानी झेलसिंग- एकता स्थळ, के आर नारायणन- उदय भूमि, शंकर दयाळ शर्मा -कर्मभूमी, चंद्रशेखर -जननायक स्थळ, इंदिरा गांधी यांचं शक्ती स्थळ, राजीव गांधी यांची वीरभूमी अशी  समाधी स्थळांची नावं आहेत. राजकारणातला महाऋषी हरपला

आणखी >>

वाजपेयींच्या आयुष्यातील 'राजकुमारी कौल' कोण होती?

मुंबई : 'नात्यास नाव अपुल्या, देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' या ओळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांना तंतोतंत लागू होतात. वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांची आई अशी राजकुमारी कौल यांची ओळख असली, तरी दोघांमध्ये अव्यक्त नात्याची वीण होती. 2014 साली 86 व्या वर्षी 'एम्स'मध्ये कार्डिअॅक अरेस्टने राजकुमारी कौल यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी प्रसिद्धीपत्रकामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या घरातील सदस्य निर्वतल्याचा उल्लेख होता. मिसेस कौल यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत लाघवी असल्याचं भाजपमधील अनेक नेते सांगतात. 'त्या खूप माया करायच्या' असं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज एकदा म्हणाल्या होत्या. वाजपेयींच्या निवासस्थानी आलेले बरेच फोन त्या उचलायच्या. 'मी मिसेस कौल बोलत आहे' असा त्यांचा मृदू आवाज ऐकायला मिळायचा. राजकुमारी कौल आहेत तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दिल्ली युनिवर्सिटीतील एका शिक्षकाची ती कन्या. वाजपेयी यांची ती महाविद्यालयीन मैत्रीण. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी झाले, त्यानंतर मिसेस कौल यांची कन्या नमिता भट्टाचार्य आणि तिचं कुटुंब वाजपेयींसोबत 'सात रेसकोर्स रोड'वर राहायला आलं. नमिता आपली मुलगी असल्याचं वाजपेयी सांगायचे. अटलजी आणि मिसेस कौल यांनी आपल्या नात्याला कधीच कुठलं नाव दिलं नाही, ही खासियत आहे. [caption id=

आणखी >>

वाजपेयी म्हणाले होते 'राजीव गांधींमुळे मी जिवंत!'

मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी संसदेत भाजपच्या नेत्यांना अक्षरशः धारेवर धरायचे, मात्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्याला अपवाद होता. राजीव गांधींच्या मनात वाजपेयींविषयी नितांत आदर होता. त्यामुळेच सत्तेत असतानाही राजीव गांधींनी विरोधीपक्षात असलेल्या वाजपेयींवर उपचार करण्यासाठी हालचाली केल्या. राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे ऋणानुबंध राजकीय मतभेदापलिकडचे होते. भारताच्या राजकीय इतिहासात असे संबंध कधीच पाहिले नसल्याचं अनेक जण सांगायचे. त्यामुळेच वाजपेयींच्या कठीण काळात राजीव गांधींनी त्यांना मदत केली. 'राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत आहे' असं अटलजी म्हणाले होते. किडनीवरील उपचारासाठी अमेरिकेत जायला राजीव गांधी यांनी मदत केल्याची आठवण वाजपेयींनी 1991 मध्ये राजीव गांधींच्या हत्येनंतर सांगितली होती. 'द अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशियन अँड पॅरेडॉक्स' या उल्लेख एनपी लिखित पुस्तकात हा किस्सा आहे. 1984 ते 1989 या काळात राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते, तर अटल बिहारी वाजपेयी विरोधीपक्ष नेते. वाजपेयींच्या आजाराविषयी समजल्यावर राजीव गांधींनी फोन केला होता. 'राजीव गांधी त्यावेळी पंतप्रधान होते. मला किडनीचा त्रास होत आहे आणि तातडीने परदेशात उपचाराची गरज आहे, हे त्यांना कुठूनतरी समजलं. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवून घेतलं. संयुक्त राष्ट्रसंघात भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळात माझा समावेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परदेशात उपचार घेण्यासाठी या संधीचा तुम्ही वापर कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. मी न्यूयॉर्कला गेलो. मी आज जिवंत असल्याचं एक कारण तेच आहे' असं अटलबिहारी वाजपेयींनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं. वाजपेयींवरील उपचार झाल्याशिवाय त्यांना परत येऊ देऊ नका, असंही राजीव गांधींनी पदाधिकाऱ्यांना बजावलं होतं.

संबंधित बातम्या 

आणखी >>

पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी गांगुलीला 'हे' गाणं ऐकवलं

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी वाजपेयींनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर देश-परदेशातून अनेक जणांनी आठवणींना उजाळा दिला आहे. पाकिस्तानच्या भूमीवर टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोण विसरेल? तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच भारताचा हा ऐतिहासिक दौरा घडला. पाकिस्तान दौऱ्यापूर्वी वाजपेयींनी टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीला 'हम होंगे कामयाब' हे गाणं ऐकवलं होतं. टीम इंडियाचे तत्कालीन मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी एका मुलाखतीत वाजपेयी आणि भारतीय क्रिकेट संघाच्या भेटीचा किस्सा सांगितला होता. 'भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, अशी अटलजींची इच्छा होती. क्रिकेट हा त्यासाठी दुवा ठरला. अटलजींमुळेच हा दौरा शक्य झाला. सरकारच्या मंजुरीनंतर बीसीसीआयने आपला संघ पाकमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला' असं शेट्टींनी सांगितलं. 'फक्त सामना जिंकू नका, मनंही जिंका' असा कानमंत्र वाजपेयींनी सौरव गांगुलीला दिला होता. भारतीय क्रिकेट संघ तब्बल 19 वर्षांनी पाकिस्तानात गेला होता. संघात गांगुलीसोबत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग असे दिग्गज होते. 'पाकिस्तान दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातून आम्हाला मेसेज आला. पंतप्रधानांना आमच्या टीमला भेटायचं होतं. बागेत नेव्ही पथक देशभक्तिपर गाणी वाजवत होतं. अटलजींनी आमच्यासोबत जवळपास तासभर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे प्रत्येकाशी ते बोलले.' असं रत्नाकर शेट्टी सांगतात. 'आमच्या क्रिकेटपटूंचे ऑटोग्राफ असलेली एक बॅट आम्ही वाजपेयीजींना दिली. त्यांनीही आम्हाला एक बॅट भेट दिली. त्यावर लिहिलं होतं खेल ही नही, दिल भी जीतिये, शुभेच्छा' ही आठवण शेट्टींनी सांगितली. 'हा महत्त्वाचा दौरा आहे. सर्वांनी मनापासून खेळा, असं अटल बिहारीजींनी सांगितलं. आम्ही निघताना त्यांनी आम्हाला आणखी एक गाणं ऐकायला सांगितलं- हम होंगे कामयाब' हा किस्सा सांगतानाही शेट्टींना शहारे येतात. भारताने वनडे मालिका जिंकल्यानंतर वाजपेयींनी गांगुलीला फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या.  

आणखी >>

भाडेकरु न मिळाल्याने सचिन तेंडुलकरला करात सूट

मुंबई : आयकर अपीलेट लवादच्या (आयटीएटी) मुंबई खंडपीठाने कर वादातील एका प्रकरणात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या बाजूने निकाल दिला आहे. आयटीएटीने 2012-13 च्या आर्थिक वर्षादरम्यान, सचिन तेंडुलकरच्या पुण्यातील फ्लॅटवरील उत्पन्न शून्य असल्याचं नमूद केलं, यामुळे त्याला आता कोणताही कर भरावा लागणार नाही. आयटीएटीने सचिनच्या पुण्यातील एका फ्लॅटमधून अंदाजे 1.3 लाखांचा कर न घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या निर्णयामुळे सचिनचे 1.3 लाख रुपये वाचले आहेत. 2012-13 या आर्थिक वर्षांत पुण्यातील फ्लॅटसाठी भाडेकरु मिळाला नव्हता, त्यामुळे भाड्यातून येणाऱ्या मिळकतीवर कर देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद माजी राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरकडून करण्यात आला होता. सचिनने म्हटलं होतं की,

आणखी >>

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपत्ती...

नवी दिल्ली : आयुष्यभर जोडलेली माणसं, वाचलेली पुस्तकं, रचलेल्या कविता ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची खरी संपत्ती होती, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. राजकारणात जेमतेम पाच वर्ष घालवणारे लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांची माया जमवत असल्याची उदाहरणं एकीकडे आहेत, मात्र तब्बल पाच दशकं राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या महाऋषीने आपल्या पश्चात 59 लाख रुपयांचीच संपत्ती ठेवली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी 2004 मध्ये लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार वाजपेयींच्या नावावर 58 लाख 99 हजार 232 रुपयांची म्हणजे अंदाजे 59 लाखांची चल-अचल संपत्ती आहे. वाजपेयींची चल संपत्ती (रोख, बँकेतील ठेवी आणि सोनं-चांदी) 30 लाख 99 हजार 232 रुपये इतकी आहे. तर अचल संपत्ती (घर, जमीन इत्यादी) 28 लाख रुपये इतकी आहे. स्टेट बँकेच्या एका खात्यात 20 हजार रुपये, दुसऱ्यामध्ये 3 लाख 82 हजार 886 रुपये, तर तिसऱ्यामध्ये 25 लाख 75 हजार 562 रुपये होते. वाजपेयी अविवाहित होते. 1998 मध्ये वाजपेयी दिल्लीतील सात रेसकोर्स रोडवर राहायला गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण राजकुमारी कौल, त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य सोबत होते. वाजपेयींचं मृत्यूपत्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र 2005 च्या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनाच वाजपेयींचं उत्तराधिकारी मानलं जाणार असून वाजपेयींची संपत्ती त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. '1987 मध्ये मला किडनीच्या आजाराने ग्रासलं होतं. अमेरिकेला जाऊन उपचार घेण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माझी मदत केली.' असं वाजपेयींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

आणखी >>

हेमा मालिनीचा 'सीता और गीता' वाजपेयींनी 25 वेळा पाहिला!

नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांना हिंदी चित्रपट पाहण्याचीही आवड होती. भाजपच्या खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचे ते मोठे चाहते होते. ड्रीमगर्ल हेमा मालिनींची मुख्य भूमिका असलेला 'सीता और गीता' हा चित्रपट वाजपेयींनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 25 वेळा पाहिला होता. हेमा मालिनी यांनी हा किस्सा सांगितला होता.
रमेश सिप्पी दिग्दर्शित 'सीता और गीता' हा चित्रपट 1972 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात हेमा मालिनीचा डबल रोल होता. धर्मेंद्र आणि संजीव कुमारही या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. हेमा मालिनीला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'फिल्मफेअर' मिळाला होता.
'मी भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचा नेहमी उल्लेख करते, पण कधी त्यांची भेट झालेली नाही. कृपया माझी त्यांच्याशी भेट घडवा, असं मी एकदा भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. त्यानंतर माझी अटलजींशी भेट घालून देण्यात आली. मात्र अटलजी माझ्याशी बोलताना जरा अडखळत होते. मी एका महिलेला विचारलं, काय झालं? अटलजी नीट बोलत का नाहीत? त्यावर तिने सांगितलं की खरं तर अटल बिहारी वाजपेयी तुमचे खूप मोठे फॅन आहेत. तुमचा सीता और गीता हा सिनेमा त्यांनी 25 वेळा पाहिला आहे. अचानक तुम्हाला समोर पाहून ते बावरले आहेत.' असा किस्सा हेमा मालिनी यांनी सांगितला होता.
चित्रपटांसोबतच अटल बिहारी वाजपेयी यांना खाण्या-पिण्याचीही आवड होती. ग्वाल्हेरच्या बहादुरा भागातील बुंदीचे लाडू आणि दौलतगंजमध्ये मूगडाळीपासून तयार केले जाणारे मंगौडी असे पदार्थ त्यांना विशेष आवडायचे. शाकाहारापेक्षा ते जास्त मांसाहार करायचे, त्यातल त्यांना कोलंबी जास्त पसंत होती. पंतप्रधान झाल्यावर ते ग्वाल्हेरला जाऊन लाडू, जिलेबी, कचोरी खात असत.

आणखी >>

अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं.  जिंदादिल राजकारणी,  हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी : 1. अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वडिलांनी एकत्र कायदे विषयांच शिक्षण घेतलं 2. अटल बिहारी वाजपेयी वडिलांसोबत एकाच हॉस्टेलमध्ये राहत होते 3. रा. स्व. संघामध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी कम्युनिस्ट म्हणून सुरुवात केली. 4. 1942 मधील ऑगस्ट क्रांतीच्या वेळी वाजपेयी बालसुधारगृहात गेले होते. 5. संघाचं मुखपत्र चालवण्यासाठी त्यांनी कायद्याच्या शिक्षणाला रामराम 6. पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा विरोध करण्यासाठी वाजपेयी बैलगाडीने संसदेत गेले होते 7. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काश्मिरमध्ये आमरण उपोषणाला बसले होते 8. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीमध्ये भाषण करणारे वाजपेयी हे पहिलेच भारतीय होते 9. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होतील, असं भाकित जवाहरलाल नेहरु यांनी वर्तवलं होतं. 10. मनमोहन सिंह यांनी अटलजींचा 'भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह' या शब्दात गौरव केला 11. राजकीय कारकीर्दीत वाजपेयी केवळ एकदाच निवडणुकीत पराभूत झाले होते 12. पंतप्रधानपदाची 5 वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले काँग्रेसेतर पक्षाचे पंतप्रधान आहेत. 13. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत 10 वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत खासदार म्हणून निवडून गेले. 14. चार मतदारसंघांमधून लोकसभा खासदार झालेले ते एकमेव राजकीय नेते आहेत. बलरामपूर (उत्तर प्रदेश) दुसरी लोकसभा (1957-62) - भाजप चौथी लोकसभा (1967-71) - भाजप ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) पाचवी लोकसभा (1971-77) - भाजप नवी दिल्ली सहावी लोकसभा (1977-80) - जनता पक्ष सातवी लोकसभा (1980-84) - भाजप लखनौ (उत्तर प्रदेश) दहावी लोकसभा (1991-96) - भाजप अकरावी लोकसभा (1996-98) - भाजप बारावी लोकसभा (1998-99) - भाजप तेरावी लोकसभा (1999-2004) - भाजप चौदावी लोकसभा (2004-09) - भाजप 15. अटल बिहारी वाजपेयी यांचा 1992 मध्ये पद्म विभूषण, तर 2015 मध्ये भारतरत्नने सन्मानित

आणखी >>

जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश

मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘युगपुरुष अटल’ हा चित्रपट वर्षअखेरीस प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी अटलजींच्या जन्मदिवशीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.
मयांक पी श्रीवास्तव हे या सिनेमाचं दिग्दर्शन, तर स्पेक्ट्रम मूव्हीजचे रणजीत शर्मा हे निर्मिती करणार आहेत. 'हा सिनेमा अटलजींच्या आयुष्याच्या सर्व पैलूंना स्पर्श करेल. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा असेल.
अटलजींच्या बालपणापासून राजकीय जीवनात ते सक्रिय असतानाचा काळ दाखवण्यात येईल, असं दिग्दर्शक म्हणाले होते. या चित्रपटाचा कालावधी सव्वा दोन तासांचा असेल. याचं बजेट तब्बल 50 कोटी रुपयांचं आहे.
मी अटलजींसोबत काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा करण्याचं माझं स्वप्न होतं. ते आता सत्यात उतरताना दिसत आहे, असं निर्माता रणजीत शर्मा म्हणाले होते. दुर्दैवाने अटल बिहारी वाजपेयींच्या हयातीत हा सिनेमा रीलिज झाला नाही.
या सिनेमाला बप्पी लहरी संगीत देणार आहेत, तर गाण्यांमध्ये अटलजींनी लिहिलेल्या कवितांचा समावेश असेल. अटलजींचं व्यक्तित्व सिनेकहाणीत बांधणं अवघड आहे, असं सिनेलेखक बसंत कुमार यांनी सांगितलं.
या सिनेमात अटल बिहारी वाजपेयींची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा वाजपेयींच्या 94 व्या वाढदिवशी म्हणजेच 25 डिसेंबर 2018 रोजी रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस होता.
अटलजींसोबतच पं. जवाहरलाल नेहरु, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी यांच्याही व्यक्तिरेखा चित्रपटात असतील.
दुसरीकडे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात राम अवतार भारद्वाज हे अटल बिहारींची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

आणखी >>

अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?

नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांनी जनतेला अखेरचं संबोधित कधी केलं होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं कारण वाजपेयी गेल्या एक-दोन नाही, तर आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. तब्बल 13 वर्षांपूर्वी वाजपेयींनी अखेरची जाहीर सभा घेतली होती. विशेष म्हणजे ही सभा मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झाली होती.
एप्रिल 2005 मध्ये भाजपच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषण दिलं होतं. हे भाषणही फार अल्पकाळात त्यांनी आटोपतं घेतलं. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी असल्याचं अटलजी म्हणाले होते. यापुढे निवडणुका न लढवण्याची घोषणाही यावेळी वाजपेयींनी केली होती.
अटल बिहारी वाजपेयी 2005 मध्ये लखनौमधून लोकसभेचे खासदार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लोकसभेच्या कामकाजात नियमितपणे सहभागी होत नव्हते.
2007 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी वाजपेयी व्हिलचेअरवरुन गेले होते. त्याच वर्षी त्यांनी नागपुरात रेशीमबागेत संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 2009 मध्ये खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी निवडणूक लढवली नाही.
मार्च 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अटलजींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा एकही फोटो समोर आलेला नाही.

आणखी >>

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन

नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते. वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं.  जिंदादिल राजकारणी,  हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं. 66 दिवसांपासून रुग्णालयात 93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे 

आणखी >>

हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयातील डॉक्टर रणदीप गुलेरिया यांची टीम सध्या वाजपेयींवर उपचार करत आहे. दरम्यान, राजकारणी म्हणून

आणखी >>
  • 1