पाकिस्तानचा धुव्वा, बांगलादेशची फायनलमध्ये धडक

दुबई: बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळं शुक्रवारी (उद्या) फायनलमध्ये आता भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पाहायला मिळेल. या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला 240 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण इमाम उल हकच्या 83 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली

आणखी >>

काश्मीर सांभाळण्याची पाकची कुवत नाही : शाहिद आफ्रिदी

लंडन : काश्मीर सांभाळण्याची पाकिस्तानची कुवत नाही. काश्मीरची मागणी करण्याऐवजी पाकिस्तानमधील परिस्थितीकडे लक्ष दिले जावे, असं खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत आफ्रिदी बोलत होता.

आणखी >>

दहा जणांशी लग्न करुन फसवणूक, 'मिसेस लखोबा लोखंडे'ला बेड्या

मनमाड : अनेक महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेंची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. मात्र एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा जणांशी लग्न करुन त्यांना गंडवणाऱ्या महिलेचा प्रताप नाशकात समोर आला आहे. नाशकात नांदगाव तालुक्यातील जातेगावमध्ये राहणारा राजेंद्र चव्हाण. राजेंद्रने नातेवाईकांच्या माध्यमातून सोलापुरातील 'ओम हवा मल्लिकानाथ वधू-वर सूचक केंद्रा'त नाव

आणखी >>

काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?

नवी दिल्ली | राफेल डीलवरुन सुरु असलेला वाद आता मोदी सरकारच्याच अंगाशी आला आहे. काल शुक्रवारी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्सच्या नावाची शिफारस केल्याचं उघड केलं होतं. तसंच डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडे दुसरा पर्याय नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. ओलांद यांच्या खुलाशानंतर गेल्या 24 तासांत काँग्रेस

आणखी >>

सोलापूर जिल्ह्यातील कृत्रिम पावसाचा नियोजित प्रयोग रद्द!

सोलापूर : लाकूड, टायर आणि मीठ जाळून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग रद्द करण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आलाय. सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 1024 गावांमध्ये हा प्रयोग होणार होता. लाकूड, टायर आणि मीठ जाळून दुपारी चार वाजता प्रयोग करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.

आणखी >>

Asia Cup सुपर फोर : भारताकडून बांगलादेशचा 7 विकेट्सनी धुव्वा

अबुधाबी : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या टीम इंडियाने बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी दिलेलं 174 धावांचं लक्ष्य 37 व्या षटकांत पार केलं. भारताच्या विजयात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी उभारली. त्याने पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 83 धावांची खेळी केली. रोहितने

आणखी >>

एकट्या मुलींना हेरुन बलात्कार, वसईत सीरियल रेपिस्टची दहशत

वसई : वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात एका सीरियल रेपिस्टची दहशत पसरली आहे. हा नराधम एकट्या अल्पवयीन मुलींना हेरुन घरात घुसतो आणि त्यांच्यावर बलात्कार करतो. त्यामुळे तुमच्या आसपास तो फिरताना दिसला, तर ताबडतोब पोलिसांना कळवा. आधी नवी मुंबई, मग ठाणे आणि नंतर पालघरमध्ये धुमाकूळ घालून हा नराधम आता वसई विरारमध्ये आला

आणखी >>

पोलिस पतीवर कॉन्स्टेबल पत्नीकडून बलात्काराचा आरोप

नालासोपारा : नालासोपाऱ्यात पतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. कॉन्स्टेबल पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिस अधिकारी असलेल्या पतीविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार पतीचा पोलिस शोध घेत आहेत. संबंधित पोलिस दाम्पत्याचा आंतरधर्मीय विवाह झाला होता. तक्रारदार पत्नी हिंदू असून आरोपी पती मुस्लिम धर्मीय आहे. त्यांना

आणखी >>

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 'लालबागचा राजा'च्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार

मुंबई | ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळातील पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. रविवारी गणेश विसर्जनानंतर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत. पोलिसांनी मंगळवारी 18 सप्टेंबरला झालेल्या बाचाबाचीचं सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतलं आहे. त्याची नीट पडताळणी करुन गणेश विसर्जनानंतर संबंधित मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार आहे.

आणखी >>

लातुरात बंगला, पुण्यात हॉटेल... श्रीमंत सोनसाखळी चोराला पुण्यात बेड्या

लातूर : पुण्यातल्या 'नंदिनी हॉटेल'मध्ये एक थाळी दोघांमध्ये संपवण्याचं चॅलेंज देणारा पठ्ठ्या सोनसाखळी चोर निघाला. पुण्यातल्या वडगाव शेरीत असलेल्या नंदिनी हॉटेलचा मालक राजाभाऊ राठोड पोलिसांच्या तपासामध्ये अट्टल चोर असल्याचं समोर आलं आहे. हॉटेलमालकाच्या बुरख्याखाली असलेल्या या महाभागाला पोलिसांनी अटक कशी केली, ही मोठी रंजक गोष्ट आहे. या चोरट्याचं आणि त्याच्या

आणखी >>

भाजपला मदत करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये: पवार

मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ते धर्मनिरपेक्ष आहेत असं तेव्हा वाटत होतं, आता वाटत नाहीत”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला.

आणखी >>

'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं. ते नाशिकमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली. गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत. पंचागाच्या आधारे ते

आणखी >>

काश्मीरमध्ये तीन पोलिसांचं अपहरण करुन हत्या

जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफ जवानाची निर्घृण हत्या केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केलं आहे. भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या कारवाईमुळे चवताळलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे शोपियां जिल्ह्यातून तीन पोलिसांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली. शोध मोहीमेदरम्यान कापरन गावात गोळ्यांनी चाळण झालेले पोलिसांचे मृतदेह सापडले. सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक दहशतवाद्यांनी या पोलिसांचं

आणखी >>

मोदींचं कौशल्य छत्रपती शिवरायांप्रमाणे: योगी आदित्यनाथ

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगींनी सर्जिकल स्ट्राईकची तुलना शिवाजी महाराजांचं युद्धकौशल्य, गनिमीकाव्याशी केली. लखनऊमधील कुर्मी पटेल संमेलनात ते बोलत होते. योगी म्हणाले, “औरंगजेबने उन्माद माजवला होता, त्यावेळी त्याला भारत मातेचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होण्यास भाग

आणखी >>

पुणे हिट अँड रन : आजी-नातवाच्या मृत्यूप्रकरणी तरुणाला अटक

पुणे : पुण्यातील खराडी भागात झालेल्या 'हिट अँड रन' प्रकरणी 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. होंडा सिटी कारने काल दिलेल्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू झाला होता. आरोपी सौरभ जासूद हा महापालिका अधिकारी शशिकांत जासुद यांचा मुलगा आहे. सौरभ चालवत असलेल्या भरधाव होंडा सिटीने काल रात्री आठ वाजताच्या सुमारास तिघा

आणखी >>

युजवेंद्र चहलच्या खिलाडूवृत्तीने भारत-पाक चाहते भारावले

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेटचा सामना म्हटला की तमाम चाहत्यांना क्रीडाज्वर चढतो. मैदानावर खेळताना एकमेकांना टशन देणारे दोन संघांमधले खेळाडू मैदानावरच खिलाडूवृत्तीने वागतानाही दिसतात. भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांची वाहवा मिळवत आहे.

आणखी >>

गुंडाने गायलेल्या 'तेरे जैसा यार कहाँ?' गाण्यावर पोलिसाचा डान्स

नागपूर : नागपूर पोलिस आमच्या रक्षणासाठी आहेत, की गुन्हेगारांसोबत हितसंबंध जपण्यासाठी? असा प्रश्न सामान्य नागपूरकर विचारत आहेत. पोलिस आणि गुन्हेगारांच्या यारी दोस्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फक्त पोलिस दलातच नव्हे तर नागपूरकरांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. गुंड गात असलेल्या 'तेरे जैसा यार कहा...' या गाण्यावर पोलिस कर्मचारी थिरकताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यातील

आणखी >>

'घालीन लोटांगण'ची चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडातील

मुंबई : 'घालीन लोटांगण'' भजनाचा गणपतीशी संबंध नाही? 'घालीन लोटांगण' भजनाची पदं एका कवीची नाहीत? 'घालीन लोटांगण'च्या चार कडव्यांचे चार वेगवेगळे कवी आहेत? हे प्रश्न वाचून तुम्ही विचारात पडला असाल. याबाबत कदाचित कधी फारसा विचारही केला नसेल. मात्र घालीन लोटांगण हे भजन एकट्या गणपती बाप्पासाठी नाही! बाप्पाची आरती झाली, की

आणखी >>

हैदराबादेत नवदाम्पत्यावर कोयत्याने हल्ला, वडिलांवर संशय

हैदराबाद : वडिलांनीच आपली पोटची मुलगी आणि जावयावर कोयत्याने वार केल्याची घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. जातीपातीच्या भ्रामक संकल्पनांतून वडिलांनी आपल्या लेकीच्या संसारावर घाला घातल्याची दुसरी घटना तेलंगणामध्ये पाहायला मिळत आहे. हैदराबादमध्ये गजबजलेल्या एरगाडा रस्त्यावर 20 वर्षांची माधवी 21 वर्षांचा पती संदीप दिडलासोबत बाईकवर बसली होती. तितक्यात एक हेल्मेटधारी बाईकस्वाराने त्यांच्या शेजारी पार्किंग केलं. बाईकवरुन उतरुन त्याने हेल्मेट काढलं. बॅगमधून कोयता काढून त्याने संदीपवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. आपल्या नवऱ्यावर झालेला हल्ला पाहून माधवी बिथरली आणि तिने हल्लेखोराला जमिनीवर ढकललं. मात्र हल्लेखोराने तिच्यावरही कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. सुदैवाने एका पादचाऱ्याने हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोयता दाखवून धमकवण्यात आलं. बुधवारी दुपारी 3.30 वाजता घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संदीपच्या जीवाचा धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. माधवीच्या मानेवर गंभीर जखम झाल्यामुळे उपचार सुरु आहेत.

आणखी >>

चैन आणि गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी दुचाकीची चोरी, दोघे अटकेत

सांगली : चैन करण्यासाठी आणि गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तब्बल सहा लाख रुपये किंमतीच्या 12 मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. साहिल मौला पटेल (वय 21 वर्ष) आणि दगडू रामा कुकडे (वय 19 वर्ष) अशी आरोपींची नावं असून दोघेही महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत आहेत. गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी आणि चैन करण्यासाठी साहिल पटेलकडे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने बाईक चोरीचा मार्ग अवलंबून दुचाकी चोरीची मालिका रचल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. दोघांकडून सांगलीतील सात, तर अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच असे 12 दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सांगली पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ढालगावमध्ये छापा टाकून ही कारवाई केली. सांगली शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा आणि अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुन्ह्यांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. चोरलेल्या दुचाकी त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकल्या होत्या. कागदपत्रे पुन्हा देतो, असं सांगून त्यांनी या दुचाकींची विक्री केली होती. साहिल हॅण्डल लॉक न केलेल्याच दुचाकी चोरीत असे. त्यानंतर दगडू कुकडे याच्या मदतीने तो दुचाकी विकत असे. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणखी >>

पाककडून जवानाची निर्घृण हत्या, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

जम्मू : जम्मू काश्मीरमधील जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफ जवान नरेंद्र सिंह यांची निर्घृण हत्या केल्यानंतर देशात तणावाचं वातावरण आहे. दुसरीकडे विरोधकांनी जवानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार सैन्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने जवानांवरील हल्ल्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहेत.

आणखी >>

पिंपरीत दोन मुलींवर बलात्कार, एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी (पुणे) : मंदिरात दर्शनाला निघालेल्या दोन मुलींवर रविवारी चॉकलेटचं आमिष दाखवून रविवारी बलात्कार करण्यात आला. या दोघींपैकी एकीचं पोट खूप दुखू लागलं आणि ती जागेवरच बेशुद्ध झाली. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेल्यावर संपूर्ण घटना डॉक्टरांच्या तपासातून उजेडात आली. याच मुलीचा काल रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला आणि आरोपी गणेश निकमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तर एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलं. काय आहे घटना? बारा वर्षीय दोन मैत्रिणी रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला निघाल्या होत्या. तेव्हा नराधम गणेश निकम आणि त्याच्या अल्पवयीन मित्राने दोघींना चॉकलेटचं आमिष दाखवून जवळच्या शेतात नेले. तिथे या नराधमांनी त्या दोघींवर बलात्कार केला. पीडित दोघांच्याही त्या दिवसापासून पोटात दुखत होतं. त्यापैकी एका मुलीला मात्र घडलेल्या कृत्यामुळे सावरणं कठीण झालं आणि ती बेशुद्ध पडली. तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या तपासातून हा प्रकार समोर आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी दुसऱ्या पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारलं असता, तिने घटनाक्रम सांगितला. हिंजवडी पोलिसांनी नराधम गणेश निकम याला अटक केलीय, तर अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलंय.

आणखी >>

आरक्षणाला संघाचं पूर्ण समर्थन : मोहन भागवत

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलंय. राज्यघटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे, त्यास संघाचं पूर्ण समर्थन आहे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच, एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये, असंही भागवत म्हणाले. दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या संघाच्या तीन दिवसीय ‘भविष्य का भारत’ या चर्चासत्राचा समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत नेमकं काय म्हणाले आरक्षणावर? “सामाजिक विषमता नाहीशी करुन, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना बनवली गेलीय. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केलीय, तिला संघाचं पूर्ण समर्थन आहे. आता हे आरक्षण कधीपर्यंत ठेवायचं हे त्यांनीच ठरवायचंय, ज्यांना लाभ मिळतोय. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते क्रिमीलेयरचं काय करायचं ते ठरवतील. आरक्षण समस्या नसून, आरक्षणावरील राजकारण ही समस्या आहे. जे खड्ड्यात पडले आहेत, त्यांच्या हातात हात देऊन आपण वर आणलं पाहिजे. एक हजार वर्षांपासूनचा अन्याय दूर करण्यासाठी 100-150 वर्षे झुकून राहावं लागलं, तर ती मोठी गोष्ट नाही. सर्वच आपले आहेत.”, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. एससी-एसटी अॅक्टवर काय म्हणाले भागवत? “जी परिस्थिती आहे, ती दूर करण्यासाठी कायदा बनवला गेलाय. त्या कायद्याला नीट लागू केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग व्हायला नको. सद्भावना निर्माण करण्याची मोठी गरज आहे. संघाची इच्छा अशीय की, सामाजिक सद्भावाने या गोष्टी सोडवल्या पाहिजेत.”, असे एससी-एसटी अॅक्टवर बोलताना मोहन भागवत म्हणाले. परवाच्या भाषणात काय म्हणाले होते भागवत? परवा म्हणजे 18 सप्टेंबर रोजी मोहन भागवत यांनी याच कार्यक्रमात भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजपसंबंधित महत्त्वाच्या विषयांवर आपलं मत व्यक्त केले होते. नागपुरातून सरकार चालवलं जातं, या

आणखी >>

INDvsPAK : भारताचा पाकिस्तानवर आठ विकेट्स राखून एकतर्फी विजय

दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीत सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थान राखलं. दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 163 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 29 षटकांत ते लक्ष्य गाठून पाकिस्तानची खाशी जिरवली. रोहित शर्मा आणि शिखर धवनने 86 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा पाया रचला. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहित शर्माने 39 चेंडूंमध्ये 52, तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी केली. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमराने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली. भुवनेश्वरने गोलंदाजीची आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फखर जमानला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं. डळमळीत झालेल्या पाकिस्तानला शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अगोदर कुलदीप यादव आणि नंतर केदार जाधवने हाणून पाडला. आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. मात्र एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं.

आणखी >>

हार्दिक पंड्या गोलंदाजी करताना कोसळला, स्ट्रेचरवर नेण्याची वेळ

दुबई : आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. मात्र एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं. पंड्याच्या या दुखापतीविषयी अधिक माहिती समजू शकलेली नाही.  

आणखी >>

पंतप्रधान पीक विमा मुदतीत न दिल्यास 12 टक्के व्याज

उस्मानाबाद : केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहेत. मुदतीच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 12 टक्के व्याजासह रक्कम द्यायची आहे. मुदतीच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर शेतकऱ्यांना विम्याच्या रक्कमेवर 12 टक्के व्याज देणं विमा कंपन्यांसाठी बंधनकारक असेल. नवीन नियम एक ऑक्टोबरपासून लागू होतील. सध्या विम्याचे पैसे मिळण्यास दोन-दोन वर्ष लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. विम्याच्या रकमेत राज्य सरकारलाही वाटा द्यावा लागतो. राज्य सरकारही आपली रक्कम देण्यास उशीर करत होतं. त्यामुळे तीन महिन्याच्या मुदतीत रक्कम न देणाऱ्या राज्य सरकारनेही 12 टक्के व्याज देणं बंधनकारक असेल. नव्या बदलात हंगामी फळबाग योजनेचाही प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला आहे. रानडुकरांसारख्या जंगली प्राण्यांनी पिकांचं नुकसान केलं, तर त्याची नुकसान भरपाईही विमा योजनेत लागू झाली आहे.

आणखी >>

आशिया चषक : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला

दुबई : आशिया चषकाच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान संघ तब्बल सव्वा वर्षांनी पुन्हा आमनेसामने येत आहेत. आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीतला भारत-पाकिस्तान सामना आज दुबईत खेळवण्यात येईल. या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही संघ नऊ दिवसांत तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियात आशिया चषक जिंकण्याची नक्कीच क्षमता आहे. पण यंदा आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून माझी पसंती सरफराझ अहमदच्या पाकिस्तानला आहे, असं भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकर यांना वाटतं. टीम इंडिया आणि पाकिस्तान संघामधला आशिया चषकातला साखळी सामना काही तासांवर आलेला असताना संजय मांजरेकर यांनी हे मत व्यक्त केलंय. भारतीय क्रिकेटरसिकांना नक्कीच हिरमुसलं करणार आहे. पाकिस्तानची सध्याची कामगिरी ही चढत्या भाजणीची आहे. त्यात पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे अलिकडच्या काळात संयुक्त अरब अमिरातीतच खेळलं जातं. त्यामुळे दुबई आणि अबुधाबी ही शहरं पाकिस्तान क्रिकेटचं माहेरघर बनली आहेत. योगायोगानं यंदाचा आशिया चषक हा दुबई आणि अबुधाबीतच खेळवण्यात येत आहे. त्यामुळेच आशिया चषकाचा संभाव्य विजेता म्हणून टीम इंडियाच्या तुलनेत आपली पसंती ही पाकिस्तानला असल्याचं संजय मांजरेकर सांगतात. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजीची ताकदही कमी झाली आहे, याकडे संजय मांजरेकर आपलं लक्ष वेधतात. त्यामुळेच आशिया चषक जिंकायचा, तर प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा हरवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमधला आशिया चषकातला पहिला सामना हा दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा धुव्वा उडवला तो दिवस होता दिनांक १८ जून २०१७. त्यानंतर तब्बल सव्वा वर्षांनी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधल्या विजयानं पाकिस्तानला एक नवा आत्मविश्वास दिला आहे. आशिया चषकातही मोहम्मद आमिर, जुनैद खान, उस्मान खान आणि शाहिन आफ्रिदी यांच्यापैकी तीन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांच्या आक्रमणाची रणनीती घेऊन पाकिस्तानी फौज नव्या लढाईसाठी सज्ज झालीय. त्यांच्या जोडीला फहिम अश्रफ, हसन अली, शादाब खान, शोएब मलिक आणि फखर झमान असे एक ना अनेक पर्याय कर्णधार सरफराझ अहमदच्या हाताशी आहेत. पाकिस्तानच्या या आक्रमणाला पुरुन उरायचं. त्यांच्या नाकावर टिच्चून विजय मिळवायचा तर टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांना एकमेकांना पुरक अशी कामगिरी बजावावी लागणार आहे. विराट कोहलीची अनुपस्थितीत जाणवू द्यायची नाही, याचा अर्थ फलंदाजांवरच्या जबाबदारीचं ओझं हे दुपटीनं वाढलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाला महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाची कशी साथ मिळते, यावरही खूप काही अवलंबून राहिल.

आणखी >>

गोव्यात सत्तास्थापनेची संधी द्या, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

पणजी : सध्या सरकार अस्तित्वात असून नसल्यासारखे आहे. सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्या. त्यासाठी एका दिवसाचे अधिवेशन बोलवा, आम्ही त्यात बहुमत सिद्ध करून दाखवू, अशी भूमिका काँग्रेसच्या 15 आमदारांनी आज सायंकाळी राज्यापालांची भेट घेऊन केली. सरकार अस्थिर असून प्रशासन ठप्प झाले असल्याने भाजपने विधानसभा विसर्जित करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तो मान्य करू नये. भाजपला सरकार चालवता येत नसेल, तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थानपनेची संधी द्या. आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवू, असे काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आले. राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते कवळेकर म्हणाले, “भाजप आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. जो तो नेता बनण्याची स्वप्न बघू लागला आहे. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. भाजप अशावेळी विधासभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांनी आम्हाला 5 वर्षांसाठी निवडून दिले आहे. भाजपला सरकार चालवायला जमत नसेल, तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी.” अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्याला कळवले जाईल, असे राज्यपालांनी आम्हाला सांगितले आहे. भाजपने निरीक्षक पाठवून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसे चालवता येईल, याची पडताळणी करत असताना काल काँग्रेसने विधीमंडळाची बैठक घेऊन विधानसभा बरखास्त करणे किंवा राष्ट्रपती राजवटीसारखे पर्याय भाजपने वापरू नये यासाठी काही घडण्यापूर्वीच राज्यपालांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. मात्र काल राज्यपाल गोव्याबाहेर असल्याने काँग्रेसने आज त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. राज्यपालांनी काँग्रेसला भेटण्यासाठी आज सायंकाळचा वेळ दिला होता. आज आलेक्स रेजीनाल्ड वगळता काँग्रेसचे 15 आमदार आज उपस्थित होते. काँग्रेसचे सगळे आमदार एकसंध असून बहुमत सिद्ध करताना काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे उघड़ केले जाईल असे सांगून कवळेकर म्हणाले, सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या सोबत कोण कोण आहेत याचे उत्तर देखील योग्य वेळी मिळेल असा दावा कवळेकर यांनी करत पुन्हा एकदा  काँग्रेसचे आव्हान जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसने 21 आमदारांची नावे जाहीर करावीत : भाजप दरम्यान, काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी किती आमदार आहेत त्यांची नावे जाहीर करावीत. केवळ पोकळ दावे करून जनतेची दिशाभूल करु नये, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केली आहे. भाजप आघाडी अभेद्य असून काँग्रेसने आघाडीमधून फुटून कोणी काँग्रेसला सरकार बनवण्यास मदत करतील याची स्वप्ने सुद्धा बघू नये असा सल्ला नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिला आहे.

आणखी >>

शिवसेनेशी काहीही संबंध नाही, नवा पक्ष काढणार : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातून आक्रमक झालेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिला नसल्याचे स्पष्ट केलं आहे. हर्षवर्धन जाधव यांनी नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केलीय. येत्या दीड महिन्यात या नव्या पक्षाची स्थापना होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्ष म्हणून शिवसेना काय करेल, ते ठरवतील पण आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी मला मराठा आरक्षणावर बोलू नका असे सांगितल्याची धक्कादायक माहितीही हर्षवर्धन जाधव यांनी दिली. या माहितीमुळे राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये आज (मंगळवार) मराठा समाजासह आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व धर्माची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवा पक्ष काढण्यात येणार असून सामाजिक समरसतेसाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी हा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितले. कोण आहेत हर्षवर्धन जाधव? हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. विविध वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही हर्षवर्धन जाधव यांना मारहाण केली होती. हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात मनसेतून केली. ते मनसेचे आमदार होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि कन्नडमधून निवडणूक लढवत विजय मिळवला.

आणखी >>

महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात पेट्रोल 17 रुपयांपर्यंत स्वस्त

मुंबई : देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पण राज्यातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल चार ते 17 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे ग्राहक सीमेच्या पलीकडे जाऊन पेट्रोल भरत आहेत. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड जिल्ह्यातील सीमेवर मिळतं. धर्माबाद हा नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तालुका आहे. इथून अगदी पाच किमीवर तेलंगणा राज्यातील पेट्रोल पंप आहे. एबीपी माझाने दोन राज्यातील इंधन दरांचा आढावा घेतला. धर्माबाद या शहरात पेट्रोलचा आजचा दर हा प्रति लिटर 92 रुपये 29 पैसे एवढा आहे. सीमावर्ती धर्माबाद येथील इंधन दराचा आढावा घेऊन आम्ही तेलंगणात पोहोचलो. तेलंगणातील बासर इथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर 88 रुपये 48 पैसे होता. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा सुमारे चार रुपये प्रति लिटरने इथे पेट्रोल स्वस्त आहे. विशेष म्हणजे इथल्या पंपावर आम्हाला महाराष्ट्रातील गाड्यांची गर्दी जास्त दिसली. लिटरमागे चार रुपयांची बचत होत असल्याने सीमा भागातील लोक तेलंगणात येऊन पेट्रोल भारतात. गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा 9 ते 10 रुपयांनी स्वस्त राज्यात जरी पेट्रोल 92 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त दराने मिळत असलं, तरी शेजारील राज्य गुजरातमध्ये पेट्रोल 82 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यापासून अवघ्या 22 किमी अंतरावर तब्बल दहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळत असल्याने ग्राहक गुजरातच्या सीमेत जाऊन पेट्रोल भरणं पसंत करतात. महाराष्ट्रातील नंदुरबारचा भाव आहे 91 रुपये 40 पैसे. गुजरात राज्यात भाव आहे 82 रुपये 72 पैसे. म्हणजेच महाराष्ट्र तब्बल नऊ रुपये जास्त कर आकाराला जातोय. यामध्ये दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय. गोव्यात पेट्रोल 75 रुपये प्रति लिटर शेजारचं राज्य गोव्यात 75 रुपये प्रति लिटरने मिळणारं पेट्रोल महाराष्ट्रात 91 रुपयांपेक्षा जास्त दराने मिळत आहे. सर्वात स्वस्त पेट्रोल असणारं गोवा देशातलं दुसरं राज्य आहे. पहिल्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबारचा क्रमांक लागतो. गोव्यात सध्या पेट्रोलचे दर 75.79 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 75.27 रुपये प्रति लिटर आहे. गोव्यापासून केवळ 60 किमी अंतरावर असलेल्या सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल 91.89 रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

आणखी >>

10 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खडसेंचं कमबॅक गुलदस्त्यात

मुंबई : महामंडळ वाटपानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्थापनेच्या दिवशी फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. येत्या 10 ऑक्टोबरला हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या एकूण चार मंत्रिपदाच्या जागा रिक्त आहेत. तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसे यांचं कमबॅक अजूनही गुलदस्त्यात आहे. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे-पाटील यांचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर कृषीमंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुढील आठवड्यात प्रत्येक खात्याचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. आढावा घेतल्यावर मंत्रिपद बदलाबद्दल संबंधितांना सांगितलं जाणार आहे.

आणखी >>

दुकानदाराने चिमुकलीला चॉकलेट नाकारणे योग्य आहे का? दुकानदारावर कारवाई व्हावी काय?
 होय
 नाही
 माहित नाही