सौजन्य - www.shirurtaluka.com
पत्ता - साप्ताहिक राशिभविष्य
तारीख - 21-11-2016 ते 27-11-2016

मेष

कामाची जिद्द दांडगी राहील. व्यवसायात अडथळे. पैशाची चिंता मिटेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडतील.

वृषभ

व्यवसायात तणाव जाणवेल. पण हितचिंतकांची मदत.नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावी लागतील. घरात वैचारिक मतभेद.

मिथुन

व्यवसायात उलाढाल. बॅंक व कर्जे घेऊन कामे कराल. घरात अनेक बेत ठरतील. तरुणांचा हट्टी, हेकेखोर स्वभाव उफाळून येईल.

कर्क

भावनाप्रधान स्वभाव, यामुळे मानसिकता जपा. पैशाचे व्यवहारात चोख राहावे. वैचारिक मतभेद होतील. प्रवासाचे योग येतील.

सिंह

व्यवसायात केलेल्या प्रयत्नांचे चीज होईल. सुखशांती लाभेल. घरात लांबवलेला शुभ समारंभ निश्‍चित करता येईल. नवीन खरेदीचे बेत सफल होतील. महिलांना आत्मिक बळ मिळेल.

कन्या

व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक स्थिती सुधारले. नोकरीत परदेशगमन व परदेश व्यवहारातील कामांना चालना मिळेल. प्रिय जनांच्या भेटीचे योग येतील. महिलांना योग्य दिशा लाभेल.

तूळ

व्यवहारात निराशेचे झटके येतील.परंतु तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका. घरात क्षुल्लक कारणावरून वादाचे प्रसंग येतील.

वृश्चिक

व्यवसायात हातात पैसे आल्याने कामाचा उत्साह वाढेल. घरात आदर करतील. खेळाडू, राजकारणी व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल.

धनु

प्रगतीचा आलेख चढता राहील. पैशाची चिंता मिटेल. घरात व्यक्तींच्या सूचनांचे पालन करा. महिलांनी स्वतःच्या कामांकडे लक्ष द्यावे.

मकर

पैसे मिळाल्याने कामाचा आनंद मिळेल. नोकरीत बदल पाहिजे असल्यास वरिष्ठाकडे शब्द टाका. आनंदवार्ता मन प्रसन्न करेल. यश मिळेल.

कुंभ

उलाढाल व विक्री वाढली तरी त्यातील फायदा कमी असेल. पैशाचे गणित बसवणे अवघड जाईल. प्रगतीसाठी थोडा वेळ द्या.

मीन

व्यवसायात भरपूर काम करून भरपूर पैसे मिळवता येतील. नोकरीत अहोरात्र मेहनत केल्यान श्रमाचे चीज. तरुणांनी संयम राखून वागावे.

  • 1

अखेरची मत चाचणी... शेवटच्या टप्प्यात कोणाची हवा?
 शिवाजीराव आढळराव पाटील
 डॉ. अमोल कोल्हे
 अन्य