गुनाट - शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे घोडधरण!

शिरूर तालुक्यातील सर्वात मोठे व महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक धरण म्हणजे घोडधरण होय. चिंचणी गावाजवळ शिरूरच्या पूर्वेला हे धरण आहे. या  धरणाचा पाणीसाठा शिरूर शहरापर्यंत आहे. शिरूर तालुक्याच्या बाजूने चिंचणी गावाजवळ व श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यातील बाजूने वडगाव गावाजवळ हे धरण  येते. 10,400 फुट लांबी असणारे हे मातीचे धरण आहे. धरणाची उंची 97 फुट असून,  या उंचीमुळे 1401 चौरस मैल क्षेत्र पाणलोट क्षेत्रात मोडते. धरणाचा पाणीसाठा 7639 दशलक्ष घनफूट आहे. या पाणीसाठ्यापैकी वापरासाठी उपलब्ध पाणीसाठा हा 6060 घनफूट आहे. घोडधरण पाण्यखाली 7 गावे बुडाली आहेत. त्यांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे. घोड धरणाला लोखंडी दरवाजा सांडवा आहे. या सांडव्याला 29 दरवाजे आहेत. एप्रिल 1954 साली घोड धरणाचे काम चालू झाले व जून 1965 मध्ये पूर्ण झाले. याला दोन कालवे आहेत. त्यापैकी उजवा कालवा 30 किमी आहे तर डावा कालवा 80 किमी आहे. शिरूर तालुक्याच्या विकासासाठी वरदान ठरलेल्या या धरणातून चिंचणी, पिंपळसुटी, मांडवगण, शिरसगाव या गावातील शेती सुपीक झाली आहे. या धरणाचे नियंत्रण कृष्णा खोरे विकास महामंडळ घोड पाटबंधारे उपविभाग शिरूर यांच्याकडे आहे.   

- गणेश करपे

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही