शिंदोडी - ...तर मी तुला बुटान हाणीन!

राम राम मंडळी -

शिरूर तालुक्यात एका गावात एक राजकिय पुढारी स्वताच्या बढाया मारण्यात पटाईत आहे. त्याचे नाव नामदेव असल्याने लोक त्याला नामदेवराव म्हणतात. राजकिय पुढारी असल्याने गावात त्याच्या शब्दाला मान आहे. त्यामुळे गावातील लहान मोठया समस्या सोडविण्यासाठी बरेचसे लोक त्याच्याकडे येतात.

शिरूर तालुक्यात नुकत्याच जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात हवसे नवसे गवसे या सर्वानी आपली खाण्या पिण्याची पुरेपुर हौस भागविली. दारूडयांसाठी निवडणुका म्हणजे एक पर्वनीच... असच एक दिवस गावच्या पारावर नामदेवराव निवडणुकीच्या गप्पा मारत बसले होते. त्याचवेळेस गावातील काही कार्यकर्ते दारू पिऊन मोठया मोठयाने बडबड करत चालले होते. नामदेवरावांनी दारूडयांकडे एक कटाक्ष टाकला आणि पारावर बसलेल्या लोकांना म्हणाले. "या दारूडयांना चांगलं चपलेन हाणलं पाहीजे तेव्हाचं ते सुधारतील.हे वाक्य नेमकच एका दारूडयाच्या कानावर पडल मग तो दारूडा नामदेवरावांच्या जवळ आला आणि जोरात ओरडला. नाम्या जर तु मला चपलेने हाणशील तर मी तुला बुटान हाणीन. दारूडयाचा हा रूद्रावतार पाहून नामदेवरावांची मात्र पाचावर धारण बसली व उपस्थितांमध्ये हशा पिकला.'

प्रसंगाच गाभींर्य ओळखून नामदेवराव तेथून सटकले ते थेट घरी पोहचले. आता मात्र दारूडे लोक समोरून आल्यास नामदेवराव वाकडी वाट करून जातात. पण त्यांना उपदेश करायच्या भानगडीत पडत नाहीत...

- तेजस फडके, 9766117755 / 9423020103

- हे सदर वाचकांसाठी मुक्त व्यासपीठ आहे. आपण केलेल्या कविता, किस्से, गाव, शाळेविषयी माहिती या सदरातून प्रसिद्ध केले जातील. आपण फक्त आमच्याकडे आपली माहिती ई-मेल वर पाठवावी.
संपर्क- shirurtaluka@gmail.com, अथवा गणेश पवार- ९७६६७३२७२९

संबंधित लेख

  • 1