वाघाळे - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'

वाघाळे येथील अशोक सखाराम शेळके यांची बहिण लता केरबा मोरे व मेव्हणे केरबा गुलाब मोरे या दांम्पत्याचे दीर्घ आजाराने काही दिवसांच्या अंतरानंतर निधन झाले. त्यांच्या पाठीमागे तीन मुले असून, ती आज अनाथ झाली आहे. घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. सागर, तुषार व राजेद्र या मुलांच्या मागे (वडिलांकडील नातेवाईक) केवळ वृद्ध आजी चद्रभागा आहे. आजी वृद्ध असल्यामुळे त्या मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत. त्यामुळे खरोखरच ही तिन्ही मुले अनाथ झाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी मुलांच्या वडिलांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात आईचे निधन झाले. त्यामुळे या मुलांवर आकाशच कोसळले. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या उक्तीप्रमाणे या मुलांना आईची माया या पुढे मिळणार नाही.

मोरे दांपत्य खेड तालुक्यातील सिद्धेगव्हाण येथील. तेथे आपल्या अल्पशा शेतीवर ते गुजराण करीत होते. माञ, काळाने झडप घातल्याने दांपत्याचे निधन झाले. लताचा वाघाळे येथील भाऊ अशोक काही दिवंसापासुन आपली स्वत: ची हालाखीची परिस्थिती असतानाही स्वत: च्या संसाराबरोबरच या मुलांचाही सांभाळ करत आहे. सागर, तुषार व राजेद्र हे तिघे अनुक्रमे इयत्ता ९वी, ८ वी व ६ वी मध्ये शिक्षण घेत आहेत. या मुलांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी दानशुर व्यक्तिंनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे, आवाहन या मुलांचे मामा अशोक शेळके (मो.नं.७५८८३२८५२९) यांनी केले आहे.

"शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वतीने सामाजीक कामे केली जाणार आहेत. संकेतस्थळाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या मुलांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. आपणही या मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी हातभार लावून सामाजिक कार्य करू शकता. मदत करणाऱयांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

संपर्क-
संभाजी गोरडे - 9552128117
गणेश पवार - 9766732729

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही