सविंदणे - उज्वला लंघे यांनी ठेवलाय गृहीणींपुढे आदर्श!

सर्व सामान्य कुटूंबात जन्म. त्यानंतर जेमतेम १० वी पर्यंतचे शिक्षण सोबतीला. सुमारे १७ वर्षांपुर्वी लग्न होऊन सासरी आलेली तरुणी. सासर कडील हालाखीची परस्थीती. मात्र, हताश न होता, न डगमता मनाशी निश्चय करून परिस्थितीशी लढा द्यायचा ठरवला. मनात दृढ संकल्प करतेय की, या परस्थीतीतून आपल्या कुटूंबाला सावरायचे. मानाने जगता येईल असे काम करायचे. सोबतीला फक्त कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या व पिठाच्या गिरणीच्या व्यवसायात डबघाईला आलेल्या पतीचा आधार आणि मनात असणारी प्रतिकुल परस्थीतीशी लढण्याची ताकत व जिद्द. केवळ प्रामाणिक कष्ट व परीश्रमाच्या जोरावर आपल्या प्रापंचीक जिवणाचा पुर्णतः कायापालट केलाय तो येथील उज्वला निवृत्ती लंघे या गृहीणीने. त्यांचा हा आदर्श समाजातील अनेक धडपडणा-या तरुणी व गृहीनींना आदर्शवत ठरेल यात शंका नाही.

१९९६ साली विवाह होऊन सासरी आलेल्या उज्वला यांनी सर्वच बाजुंनी खालावलेली घरची परस्थीती सुधरवण्याचा संकल्प केला. पतीच्या मार्गदर्शनातुन मोडकळीस आलेल्या पिठाच्या गिरणीच्या व्यवसाय पुनःश्च सुरु झाला. पाहता-पाहता या व्यवसायात त्या तरबेज झाल्या. शिवाय, उजाड पडलेल्या शेतीतही त्यांनी स्वतः राबत शेतीचे ही नंदनवन केले.

१७ वर्षे अविश्रांत पिठ गिरणीचा व्यवसाय चालविणा-या उज्वला यांनी प्रथमतः पतीच्या डोक्यावरील कर्ज फेडले. आपला प्रपंच उमेदीने, कष्टाने प्रगतीपथावर आणला. लोणी-शिरुर रस्त्यालगत सविंदण्याच्या शाळेजवळ प्रशस्त एक गुंठा जागेत पत्र्याचे शेड उभारत पिठ गिरणी सुरु केली. कामाचे उत्कृष्ठ नियोजन व ग्राहकांना नम्र, जलद सेवा देण्याचा त्यांचा स्वभाव या मुळे परीसरात या व्यवसायातुन नावलौकीक मिळवला. आज त्यांना या व्यवसायातील संपुर्ण खाणाखुणा माहीती झाल्यात गिरणी पुर्ण खोलुन जोडण्याचे ही त्या काम लिलया पार पाडतात. जिद्दी पत्नीचा हा जोश पाहून स्वारस्य हरपलेल्या पती निवृती यांनाही उमेद मिळाली. कष्टातुन उत्कर्ष साधताना पत्नीने केलेल्या जिवापाड मेहनतीचे ते आज ही कौतुक करतात. अजय व विजय ही दोन मुले असून, त्यांना उच्च शिक्षण देऊन, त्यांच्या पायावर उभे करण्याचा त्यांचा माणस आहे. उज्वला यांचा हा आदर्श इतरांना ही निश्चीतपणे प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

- सुभाष शेटे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य