वडगाव रासाई - शिक्षकाने साकारले 'रद्दीतून ग्रंथालय' !

'व्यक्ती आणि वल्ली' हा पु. ल. देशपांडे यांचा कथासंग्रह लोकप्रिय आहे. या जगात अशा कितीतरी व्यक्ती आहेत की, ज्या मळलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वःतची वेगळी वाट निर्माण करण्याची जिद्द बाळगतात. हि जिद्दच त्यांना आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळे साकार करण्याची प्रेरणा देत असते.

पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षाही आत्मिक आंनदासाठी त्या प्रयत्नशील असतात. वडगाव रासाई येथील छञपती शिवाजी माध्यमिक विदयालयातील शिक्षक कृष्णांत जाधव यांनी अशाच ध्यासातून वर्तमान पञाच्या रद्दीतून ग्रंथालय साकारले आहे.

सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यात असणारे राजाचे कुर्ले हे जाधव यांचे छोटेसे गाव. आजचे वर्तमानपञ ही उदयाची रद्दी असते, परंतु त्याच रद्दीतून विविध बातम्यांच्या काञनाचे ग्रंथालय त्यांनी तयार केल आहे. त्यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, मनोरंजन, क्रीडा, कला इत्यादी विषयावरील प्रकाशीत झालेल्या विविध प्रकारच्या सदरांमधील उपयुक्त लेखांच्या काञणामधून एक-एक करीत आज विविध विषयांवरील सुमारे १००० फाइलींचे छोटस ग्रंथालय तयार झाले आहे.

जुनी वृत्तपञे गोळा करून त्यातून विविध विषयावरील आवश्यक ती काञणे जमा करणे आणि योग्य त्या विषयानुरूप चिटकविणे असा त्यांचा छंद. २००५ सालापासुन हा छंद सुरू आहे. या अभिनव उपकमाची प्रेरणा त्यांना २६ जुलै २००५ साली मुंबईत आलेल्या महापुरातून मिळाली. यावेळी पावसाविषयीच्या बातम्यांची त्यांनी ५००० काञणे एकञ करून त्याचे औंध येथे प्रदर्शन भरविले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहीलेच नाही. आजपर्यत त्यांनी या प्रकल्पाची विविध ठिकाणी १४ प्रदर्शने भरविली.  दुरदर्शनच्या सहयाद्री वाहीनी वरील "युवा चेतना' या कार्यकमातही त्यांची मुलाखत झाली आहे. सध्याच्या माहीती तंञज्ञानाच्या युगात इंटरनेट मुळे आता माहितीचा खजिनाच सहज उपलब्ध होतो. परंतु, ग्रामीण भागात ज्या ठिकाणी दहा-पंधरा तास वीज नसते अश्या ठिकाणी या रद्दीतून तयार झालेल्या ग्रंथालयाचा ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

या सर्व १००० प्रकल्पाचं एक मोठ पुस्तक तयार करून, या "रद्दीतून ग्रंथालय' या उपक्रमाची "लिम्का बुक ऑफ रेकार्ड' मध्ये नोंद व्हावी अशी कृष्णांत जाधव यांची इच्छा आहे.

- तेजस फडके

संबंधित लेख

  • 1