रांजणगाव गणपती - असंख्य कामगारांच्या पदरी आजही निराशाच...!

एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून दरवर्षी देशात मोठया उत्साहात साजरा केला जातो. मात्र, असंख्य  कामगारांच्या पदरी आजही निराशाच कायम दिसुन येत आहे. कामगार हा औदयोगिक प्रकियेचा एक महत्वपुर्ण कणा समजला जातो. औदयोगिक क्षेञात आज कितीही अत्याधुनिक तंञज्ञान आले, तरी देखील कामगारांची मोठी गरज आज या क्षेञाला आहे. फार वर्षांपुर्वी कामगाराला कंपनीचे मालक व व्यवस्थापक देव मानत. कंपनीचा मालक व अधिकारी वर्ग त्या कामगाराच्या सुख दुःखात हिरारीने सहभागी होत.

अलिकडच्या काळातील शासकिय ध्येय धोरणानुसार कामगारांचे आज कुणाला ही काहीच सोयरे सुतक राहिलेले दिसुन येत नाही. एमआयडीसीत विविध प्रकाराची कामे करणारया कामगारांची सर्वात जास्त पिळवणुक केली जाते. कंपन्यांमध्ये अनेक वर्ष कंञाटी स्वरूपात कामे करणारया कामगारांना कायम करण्याचे साधे नावही कंपनी प्रशासन व ठेकेदार यांच्याकडून काढले जात नाही. अनेक वर्ष कष्ट व मेहनत करूनही सर्वच विशेषतः कंञाटी कामगारांना भवितव्यच उरलेले दिसत नाही. एखादया कंञाटी कामगारांने त्या कंपनीत साधरणपणे ३ ते ४ वर्ष काम करूनही त्या कामगाराला कायमस्वरूपी करते वेळी त्या कामगाराच्या कोणत्याही भावनांचा कंपनी प्रशासनकडून विचारच केला जात नसल्याने, त्या कामगाराच्या पदरी निराशाच पडते. परिणामी याचा सर्वाधीक फायदा हा ठेकेदारालाच होतो. औदयोगिक क्षेञातील या कंञाटी कामगारांचा ठेकेदारांनी जणू कणाच मोडल्या सारखे यातून दिसत आहे.

ठेकेदारांकडुन अतिशय तुटपुंज्या पगारावर महिनाभर काम करणारया कंञाटी कामगारांची कायमच मोठी पिळवणुक होत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. महिनाभर काम करूनही कामगारांना वेळेवर पगार न देणे. त्या पगारामधुन विविध प्रकारच्या कंपनी सुविधांची नावे पुढे करून पगार कापणे या व इतर कारणांसाठी ठेकेदारांकडून कंञाटी कामगारांची आजही मोठी आर्थिक पिळवणुक होत आहे.

या कंञाटी कामगारांना कायम करणेसाठी स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता शासनाने आम्हाला कंञाटी कामगारच भरण्याचा सरकारनामाच  लिहून दिला असल्याचे सांगुन एकप्रकारे कंञाटी कामगारांची मोठी पिळवणुक केली जाते. एखादी कंपनी सुरू करते वेळी ग्रामपंचायतींना ३० टक्के स्थानिक कामगार कायम करून घेऊ,  असे सांगूनच कंपनीसाठीची आवश्यक ती परवानगी घेतली जाते. परंतु, त्यानंतर ती कंपनी किती स्थानिक कामगारांना कामावर घेते हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. बरयाचदा अनेक जण आपल्या स्वार्थापोटीच कंञाटी कामगारांची मोठी पिळवणुक करत कंपन्यांना आपल्या स्वतःचा काही तरी विचार करण्यास भाग पाडतात. यामधूनच शेकडो कंञाटी कामगारांची काहीही अडचण नको म्हणून कंपन्या ठेकेदार म्हणून जवळच करतात.

दरम्यान, या असंघटीत व कंञाटी कामगारांची पिळवणुक करणारी ठेकेदारी पध्दतच शासनाने रद्द करून, या कामगारांना नोकरीत कायम करून कामगारांची भांडवलदारांच्या विळख्यातुन मुक्कता केल्यावरच या कामगारांना खरा न्याय मिळू शकेल हीच कामगार दिनाच्या निमित्ताने अपेक्षा. अन्यथा येरे माझ्या मागल्या प्रमाणे कामगारांच्या भवितव्यावर यापुढेही कुरहाडच.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1