रांजणगाव गणपती - पाणपोई नामशेष होण्याच्या मार्गावर!

पुर्वी उन्हाळयाची चाहुल लागताच ठिकठिकाणी मोठया प्रमाणात दिसणारया पाणपोई आता नामशेष झाल्याचे चिञ सध्या सर्वञ दिसून येत आहे.

गावोगावी विविध सामाजिक संस्था व संघटनाच्या माध्यमातून यापुर्वी वाटसरूंची तहान भागविण्यासाठी उन्हाळयात पाणपोई उभारल्या जायच्या. माञ सध्याच्या आधुनिक युगात पाणपोई उभारण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पाणी पिण्यासाठी  मिनरल वॉटरचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. सध्या ग्रामीण  भागात विविध कार्यक्रमाप्रसंगी विशेषतः लग्नसराइमध्ये शुध्द व निर्जंतुक केलेले मिनरल वॉटर मोठया प्रमाणात वापरले जाऊ लागले आहे. त्यामुळे पाणपोईकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालेले दिसुन येत आहे. अनेकदा प्रवास करताना पाणी पिण्यासाठी मिनरल वॉटर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे.  सर्वसामान्यांकडून देखील याचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

यापुर्वीच्या काळात शहरी विशेषतः ग्रामीण भागात विविध सामाजिक संस्था, संघटना, दानशुर व्यक्ती व विविध प्रकारची मंडळे या सर्वांकडून गावातील मुख्य  चौकात महत्वाच्या तसेच वर्दळीच्या ठिकाणी उन्हाळयाची चाहुल लागताच पाणपोई मोठया प्रमाणात सुरू केल्या जायच्या. या पाणपोईमध्ये मातीच्या मोठया रांजणात पिण्याचे पाणी भरून ते सावलीच्या ठिकाणी किंवा एखादया झाडाखाली झाकुन ठेवले जात होते. पाणी पिण्यासाठी एखादा पेलाही येथे असायचा. उन्हा-तान्हात दमून आलेल्या व्यक्तींसाठी या पाणपोई म्हणजे आपली मोठी तहान भागविण्याचा एक मोठा आधारच होता. माञ, सध्या या पाणपोई कोठेही दिसेनाश्याच झाल्या आहेत. गोरगरिब जनतेलाही आता तर पाणी पिण्यासाठी महागडया मिनरल वॉटरचाच आधार घ्यावा लागत आहे. यामुळे मिनरल वॉटरला सुध्दा मोठी मागणी वाढली असल्याने तिचे दरही सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत.

राज्यातील विविध महामार्गांवरींल ढाब्यांवर तसेच येथील पंचतारांकित औदयोगिक वसाहतीतील हॉटेलवर काही हॉटेल व्यावसायिकांमुळे या मिनरल वॉटर अतिशय  महागडया किंमतीत ग्राहकांना व सर्वसामान्य नागरिक तसेच वाटसरूंना खरेदी  कराव्या  लागत असल्याने, नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करीत आहे. असे असले तरी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेञ रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासुन दरवर्षी उन्हाळयाची चाहुल लागताच सुरू करण्यात येत असलेली पाणपोई हीच तालुक्यात सध्या तरी  जवळपास एकमेव समजली जाते.

भारतीय संस्कृतीत अतिथी देवोः भव याप्रमाणे अतिशय महत्वाचे स्थान असणारया पाणपोईतील पाणी पिऊन तृप्त झालेली सर्वसामान्य व्यक्ती पाणपोइ सुरू करणारया व्यक्तीला मनोमन धन्यवाद देवुन कृतज्ञता व्यक्त करत असे. माञ सध्याच्या मिनरल वॉटरच्या वाढत्या प्रमाणामुळे पाणपोईच सध्या कोठेही पाहवयास मिळत नसल्यानेच पाणपोइ नामशेष होण्याची भीती आता सर्वसामान्य नागरिकांना वाटु लागली आहे.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य