रांजणगाव गणपती - 'एमआयडीसी'तील बेकायदा धंदे पुन्हा सूरू

रांजणगाव औदयोगिक वसाहतीतील (एमआयडीसी) चोर पोलिसांचा लपाछपीचा खेळ संपतो न संपतो तोच सुनसान पडलेले रस्ते पुन्हा अलिशान गाडयांनी भरून वाहू लागले आहेत. औदयोगिक वसाहतीतील वदर्ळीची ठिकाणे पुन्हा गर्दीने गजबजुन गेली आहेत. एवढेच नव्हे तर पोलिसांनी पाठ फिरवताच बेकायदा धंदे पुन्हा आहे त्या स्थितीत सुरळीतपणे चालू झाले आहेत. विधानसभेतील लक्षवेधीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारून ठेकेदांरावर व त्यांच्या पंटर लोकांवर कारवाई केली व पुन्हा सोडून देण्यात आले. माञ, ही कारवाई केवळ फार्स होती असेच म्हणावे लागेल.

कंपन्यामध्ये ठेके मिळवण्यासाठी अधिकारी वर्गाला धमक्या देणे. कंपन्याच्या बाधकामासाठी आवश्यक साहित्य व इतर ठेके आपल्यालाच मिळावे. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आपल्यालाच मिळावा, भंगार उचलण्याचा ठेका आपल्यालाच मिळावा यासाठी बडया उदयोजकांनी अधिकारी वर्गाला धमकावणे असे अनेक प्रकार रांजणगाव औदयोगिक वसाहतीत घडले आहेत.  गुन्हे करणारे दिग्गज खुलेआम फिरत असून, त्यांना राजकीय पाठबळ देणारे राजकिय नेतेच मास्टर माईंड आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या वसाहती मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने वसाहतीतील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्यात येत असून, या ठिकाणी एक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी, वीस पोलिस कर्मचारी व औदयोगिक वसाहतीलगतच्या १८ गावांचा या पोलिस ठाण्यातंर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या पोलिस ठाण्याच्या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेकडून स्वागत केले जात आहे, माञ या पोलिस ठाण्यामुळे गुंडावर खरोखरच जरब बसेल का नाही हे येणारा काळच सांगू शकेल.

- संभाजी गोरडे

संबंधित लेख

  • 1