वाघाळे - डिंभा उजव्या कालव्याचे पाणी नेमके कशासाठी?

शिरूर तालुक्यासाठी वरदान ठरत असलेल्या डिंभा उजव्या कालव्याचे काम अतिंम टप्यात आले आहे. या कालव्याद्‌वारे येणारे पाणी घोड धरणात सोडून हे पाणी शेतक-यांच्या शेती बरोबरच रांजणगाव औदयोगिक वसाहती साठी ही वापरण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाल्याने तालुक्यातच भविष्यात पाण्यावरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माञ, हे पाणी नक्की कशासाठी वापरले जाणार आहे, या बाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी पुर्णतः अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे.

शिरूर तालुक्याच्या शेतीसाठी वरदान ठरलेले चासकमान व डिंभा कालव्याचे पाणी रांजणगाव औदयोगिक वसाहती साठीही वापरण्यात येणार असल्याची बाब निदर्शनास आली असून, भविष्यात शेतीला पाणी मिळवण्यासाठी शेतक-यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

सध्या ढोकसांगवी शिवारात डिभा धरणाच्या उजव्या कालव्याचे काम युद्‌ध पातळीवर चालु आहे. हा डिंभा उजवा कालवा शिरूर तालुक्यात सविंदणे, कवठे, शिंदेवाडी, रावडेवाडी, मलठण, सोनेसांगवी, ढोकसांगवी, निमगाव भोगी, आण्णापुर, कर्डेलवाडी, सरदवाडी, गोलेगाव या गावांमधून वाहत आहे. या कालव्याचे काम पुर्ण झाल्यावर आपल्या शेतीला चांगले पाणी मिळेल या भाबडया आशेवर शेतकरी शेतीचे नियोजन करत आहे. माञ, या कालव्याद्‌वारे येणारे पाणी घोड धरणात सोडून औदयोगिक वसाहतीसाठी वापरले जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात रांजणगाव औदयोगिक वसाहतीच्या अधिका-यांनी दुजोरा दिला, माञ पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाला समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत.

- संभाजी गोरडे

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही