शिरूर - जिल्हा बॅंकेच्या उमेदवारीसाठी तालुक्यात हालचाली सुरू!

पुणे जिल्हयाच्या आर्थिक विकासाची नाडी समजल्या जाणारया पुणे जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या २ सप्टेंबर रोजी संपत असून, सध्या दुष्काळस्दृश स्थितीमुळे बॅंकेच्या निवडणुक प्रक्रियेला राज्य सरकारने तुर्तास स्थगिती जरी दिली असली तरी या निवडणुकीच्या निमीत्ताने तालुक्यातील  राजकीय वातावरण पुन्हा तापायला लवकरच सुरूवात होणार आहे.

येत्या २ सप्टेंबर रोजी जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपणारया या बॅंकेसाठी ३३ संचालक असून, त्यापैकी २४ जागांच्या निवडीसाठी मतदान होत असते. तर ९ जागा या स्विकृत असतात, त्यापैकी अ वर्ग मतदारसंघातून १३ संचालक निवडले जात असून ब वर्ग पणनप्रक्रिया १, नागरी बॅंका व पतसंस्था, मागासवर्गीय जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, मजुर हौसींग सोसायटया व दुर्बल घटक या मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक निवडला जातो तर तीन या महिला वर्गासाठी राखीव असतात. या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून जिल्हयातील गावोगावी असणारया विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांमधून एक प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे समजते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही जिल्हयाच्या ग्रामीण भागातील शेतकरयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बॅंक असून, या बॅंकेच्या भोवतीच सातत्याने राजकारण फिरत असते. ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाची नाडी असणारया आणि जिल्हयाच्या राजकारणात अतिशय महत्वपुर्ण भूमिका बजावणारया या बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या २ सप्टेंबर रोजी संपणार असल्याने यासाठीची निवडणूक ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता होती. त्यामुळेच त्यादृष्टीने इच्छुकांनी आपली तयारी देखील चालु केली होती. माञ, सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीमळेच राज्य सरकारने या निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली असली तरी त्यासाठीच्या हालचालींना येत्या काही दिवसांत वेग येणार आहे.

दरम्यान, या बॅंकेवर गेल्या अनेक वर्षांपासुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकतर्फी वर्चस्व  असून शिरूर तालुक्यातून बॅंकेवर सध्या बॅंकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती गवारी  व माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे प्रतिनिधीत्व करित आहे. बॅंकेच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, संचालक राजेंद्र जासुद व उद्योजक सदाशिव पवार हे प्रबळ इच्छुक असून यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी तशी हालचाल देखील सुरू केली असल्याचे समजते. याबाबत नेमके काय ते येत्या काही दिवसात समजू शकेल.

- पोपट पाचंगे

संबंधित लेख