शिरूर - मते मागणारे लोकप्रतिनिधी गेले कुठे?

शिरूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. माञ, तालुक्यातील लोकप्रतिनिधी व राजकारणी नेतेमंडळी, प्रशासकिय अधिकारी या गोष्टींवर चर्चा किवा प्रत्यक्ष कृती करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये लोक प्रतिनिधींबाबत असंतोष निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या वेळी दारोदार फिरून मते मागणा-या आता कुठे गेले आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लोक प्रतिनिधींनी आता दारोदारी नाहीतर गावो-गावी फिरून जनतेच्या समस्या जाणून टॅकर व चाराडेपो सुरू करावेत अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

शिरूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने खरिप हंगामातील पिके हातची गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चासकमान कालव्याचे पाणी वेळी-अवेळी सोडल्याने आधीच अडचणीत आलेला शेतकरी पाऊस लांबणीवर गेल्याने पुरता अडचणीत सापडला आहे. तालुक्यात इतर नगदी पिका बरोबरच
हजारो एकर क्षेञावरील ऊस पाण्या अभावी जळून गेला आहे.

तालुक्यात दुध व्यवसाय करत असलेल्या अनेक खाजगी व सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्याच प्रमाणात गायी व म्हशींची संख्या, मेंढया यांचे प्रमाण आहे. त्याच बरोबर शेतीची मशागत करणारे बैल, बैलगाडा शर्यतीचे बैल यांची संख्या नगण्य असल्याने शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न निर्माण झाला आहे.

शिरूर पंचायत समिती मार्फत तालुक्यातील गावा गावातींल, वाडया वस्त्यांचा सर्व्हे करून कुपनलिंकासाठी जागा ही निश्चित करण्यात आल्या होत्या, माञ अदयाप पर्यत शिरूर पंचायत समिती मार्फत एक ही कुपनलिका खोदली गेली नाही. या कुपनलिकांचे काय झाले याची साधी चौकशी ही कोणत्या लोकप्रतिनिधीने केली नाही. गावागावातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना स्थानिक नेते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तालुक्यात महिलांबरोबरच पुरूषांना ही पाणी वाहण्याची वेळ आली असून, पाण्यासाठी राञंदिवस एक करावा लागत आहे.

- संभाजी गोरडे

संबंधित लेख

  • 1