रांजणगाव गणपती - 'काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच...'

रांजणगाव औदयोगिक वसाहती मधील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या, माञ गुंडगिरीला आळा बसण्याऐवजी गुन्हेगारी वाढतच चालली आहे. अनेक कंपन्यामध्ये नामांकित गुंडांबरोबरच राजकिय नेते मंडळी ही आपल्याला किंवा आपल्या पंटरला काम मिळण्यासाठी साम दंड भेदाचा वापर करताना दिसत आहेत. काम दे नाहीतर तुझ्याकडे बघतोच नाहीतर तुझ्या घरच्याना उचलतोच अशा धमक्या दिल्या जात असल्याने अनेक अधिकारी कंपन्या सोडून जाऊ लागले आहेत. काही कंपनी अधिका-यांनी या औदयोगिक वसाहतीमधील पोलिस ठाण्यात नकुल न्यामने सारख्या कर्तव्यदक्ष अधिका-यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.

पंचतारांकित अशा रांजणगाव औदयोगिक वसाहती मध्ये २२० हुन अधिक कंपन्या कार्यरत आहेत माञ यातील बहुतांश कंपन्यामध्ये ठेके मिळवण्यासाठी राजकारणी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बळाचाच वापर केला जात आहे. परिणामी कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम होत असतो. ज्या कामाचा संबंधितांना ठेका घ्यायचा असतो. त्या कामाचा त्यांना काही ही कार्यानुभव नसतो. तसेच जी कामे कंपनीकडून दमदाटी करून मिळवली जातात. त्या कामांविषयी या संबंधितांना जाणीव नसल्याने कामात कुचराईपणा केला जाते. परिणामी या कुचराईपणा मुळे व्यवस्थापनाला नाहक ञास सहन करावा लागतो. माञ, दर महिन्याला कामाचे बील नेण्यासाठी हा टग्या कंपनीच्या गेटवर हजर राहुन, कंपनी व्यवस्थापनालाच सतावत असतो. बील निघण्यास विलंब होणार असल्यास साहेबांना सांगू का? साहेब मुबंईहुन येऊ दया कंपनीतच आणतो अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जातात.

एवढेच नव्हे तर पुण्या-मुंबईचे अनेक नामवंत गुंड या औदयोगिक वसाहती मध्ये येऊन आपल्या पंटर लोकांना ठेके दयावेत या मागणी साठी फे-या मारू लागले आहेत. परिणामी अनेक कंपन्याचे अधिकारी या जाचाला कंटाळुन कंपन्या सोडून जाऊ लागले आहेत.

मी, या गावचा सरपंच. या गावचा चेअरमन आहे मला काम मिळाले पाहिजे नाहीतर आपल्याशी गाठ आहे. पंचायतीचा एक बी कागद आपल्या सही नुसार इकडे-तिकडे हालत नाही. काही करा पण काम आपल्यालाच मिळाल पाहिजे सांगून ठेवतो, अशा पोकळ धमक्याही अधिका-यांना दिल्या जात आहेत.

माञ, या उलट औदयोगिक वसाहती मधील काही कंपंन्याचे अधिकारी हे दोन ठेकेदांरामध्ये भांडणे लावून देण्याची कामे करत आहेत. तुला काम देतो तु त्याचा बंदोबस्त कर असे सांगुन फुस लावून भांडणे लावून दिली जात आहेत. एवढेच नव्हे तर तुला काम देतो मला किती टक्के देणार. मला काय गिप्ट देणार अशा स्वरूपाच्या मागण्या कंपन्याच्या अधिकारी वर्गाकडून केल्या जात असल्याने ही अधिका-यांची मर्जी राखण्यासाठी मारहाण केली जाते.

अनेक कंपन्यांमध्ये कामगार आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जेव्हा कामगार संघटना स्थापन करण्याच्या प्रयत्नात असतात. तेव्हा संबधित कंपनी प्रशासन पोलिस बळाचा वापर करून कामगारांना आपल्या हक्का पासून वंचित ठेवत आहेत. कंपन्या व पोलिस प्रशासन कामगारांवर जुलमी अन्याय करत आहेत. कंपन्यांनी तक्रार करताच पोलिस तात्काळ हजर होऊन कारवाई करतात. माञ, एखादया कामगाराने कंपनी कडून अन्याय झाल्यास तक्रार केली असता किंवा जखमी झाल्यास कंपनी कडून मदत मिळण्यासाठी तक्रार केली असता योग्य ती दखल घेतली जात नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करता रांजणगाव औदयोगिक वसाहतीमध्ये नकूल न्यामने सारख्या कर्तव्य दक्ष अधिका-याची नेमणुक होणे गरजेचे असल्याचे औदयोगिक वसाहती मधीलच विविध कंपन्याच्या अधिकारी व कामगार प्रतिनिधींनी 'शिरूर तालुका डॉट कॉम'ने केलेल्या एका सर्व्हे प्रसंगी सांगितले.

- संभाजी गोरडे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य