शिरूर - शिरूर तालुक्याला पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा!

शिरूर तालुक्याला मोठा पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तालुक्यात अशी काही पुरातन व वैशिष्टय पुर्ण शिव मंदिंरे आहेत की, ज्याचा इतिहास स्थानिक नागरिकांना ही सांगता येत नाही. रांजणगाव परिसरातील अनेक पुरातन शिव मंदिरे विकासाच्या व जिर्णोदधाराच्या प्रतिक्षेत आहेत.

तालुक्यातील पुर्व-पश्चिम ते दक्षिण-उत्तर पट्‌टयात विविध ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक स्थळे डौलात उभी आहेत. यामध्ये श्री क्षेञ रांजणगावचा महागणपती, श्री क्षेञ वढु येथील धर्मवीर संभाजी महाराजांचे समाधीस्थान, पाबळ येथी जैन मंदिर, तळेगाव ढमढेरे येथील विष्णु गणेश पिंगळयाचे स्मारक, करडे येथील झुलता मनोरा, इनामगावची ताम्रपाशान संस्कृती, टाकळी हाजी येथील रांजणखळगे, शिरूरचे रामलिंग मदिर व चिंचोली मोराची सह इतरही ठिकाणी असलेले मोरांचे वास्तव्य तसेच तालुक्याचा पश्चिम दिशा वगळता तीन ही दिशांनी लाभलेली नदयांची किनारपट्‌टी.

रांजणगाव परिसरातील बरीचशी महादेवाची मंदिरे ही पांडवकालीन, हेमांडपंथी मंदिरे, वैशिष्टयपुर्ण रचनेची व वेगळेपणा असलेली आहेत. या मंदिरांचा जिर्णोद्‌धार व विकास केल्यास रांजणगाव औदयोगिक वसाहतीच्या पट्‌टयातील या मंदिरांचा पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

या मंदिरांमध्ये वाघाळे येथील वाघेश्वर मंदिर, गणेगाव खालसा येथील महादेव मंदिर, कोंढापुरी येथील भगिरथेश्वर, पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिर, कारेगाव येथील कारेश्वर मंदिर व शिरूर ग्रामीण येथील देव्हडेश्वर मंदिर या मंदिरांना तीर्थक्षेञाचा "क' दर्जा मिळावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. या मध्ये कोढांपुरी येथील भगिरथेश्वर मंदिर हे पुणे-नगर महामार्गालगतच असून या मंदिराच्या समोरच पांडव कालीन बारव आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात पावसाळयात ओढया नाल्यांच्या नैसगिक व शुद्‌ध पाण्याने या मंदिरांतील पिंडींचा अभिषेक होतो असेच म्हणावे लागेल. कारण या पाण्याने संपुर्ण मंदिरच भरले जाते. त्याच प्रमाणे पिंपरी दुमाला येथील सोमेश्वराचे मंदिर हे हेमांडपंथी मंदिर असून नुकताच या मंदिरावरील कोरीव शिल्पांचा व नानक शास्ञाचा भारतीय इतिहास संशोधन मंडळाने सर्व्हे केला आहे.
 
 शिरूर येथील रामलिंग मंदिरापासून हाकेच्या अतंरावर असलेले दोन लिंग असलेले देव्हडेश्वर मंदिर ही पुरातन काळातील आहेत. या ठिकाणी विष्णु व शंकराची भेट झाली असल्याचे जाणकार सांगतात. त्याचप्रमाणे वाघाळे, कारेगाव, गणेगाव येथील देवस्थाने जागृत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
 
स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व सबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाने या तीर्थस्थळांच्या गांभिर्याने विकास केल्यास तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकातात. त्यासाठी हवी ती फक्त राजकिय इच्छाशक्ति.

- संभाजी गोरडे, 9552128117, वाघाळे.

संबंधित लेख


वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य