कवठे यमाई - ...तरी माझा भारत महान !!

सःस्थितीवर आधारित शिघ्रकवी व शाहीर बी. के. मोमीन कवठेकर यांनी लिहिलेले गीत

     झाडे बोलती पाने ऐकती ! भिंतीला असतात कान !
     देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!

     घ्या सोसायटीचा आदर्श !
     तिचा न्याराच झाला फार्स !!
     मोठे मोठे मासे गळाला लागले !
     नाही कुणीच लहान !!१!!
  देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!

     राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा !
     ह्याला कधी बसल हो आळा !!
     बुद्धिवादी ही असून माणसं -
     का अल ठेवी गहाण !!२!!
  देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!

     पाण्यासाठी आंदोलन केले !
     त्यात नेमकेच गरीब मेले !!
     श्रीमंतांची भिजली शेती -
     कुणाची भागल तहान !!३!!
  देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!

     डिझेल, पेट्रोलचा झाला भडका !
     त्यात होरपळला गडी कडका !!
     मोमीन कवठेकर म्हणे रमेशा -
     गात रहा गुणगान !!४!!
     देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!

     देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!
  देशात चाललंय काय काय काय ?
     तरी माझा भारत महान !! धृ !!

(संकलन- सुभाष शेटे)

संबंधित लेख

  • 1