वाघाळे - रांजणगाव रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे

गेले दोन दिवसांपासून रांजणगाव परिसरात पाऊस सुरू झाला असल्याने या परिसरातील रांजणगाव-वाघाळे या रस्त्यावरून नागरिकांना विशेषतः कामगारांना प्रवास करणे जिकीरीचे ठरत आहे. या संदर्भात वाघाळे येथील काही कामगारांनी वाघाळे येथील एका कार्यक्रमात हा रस्ता दुरूस्त करावा अशी तोंडी मागणी कामगारांनी केली, मात्र, या विषयाकडे त्यांनी लक्ष दिले नाही.

वाघाळे गावातील काही बडया शेतक-यांनी कोढांपुरी येथील मल्हार तळयातून माती आणुन आपल्या शेतात टाकली आहे. ही माती वाहत असताना वाहनांमधुन बरीचशी माती रस्त्यातही पडत होती. परंतु ती माती वेळच्या वेळी बाजुला सारली न गेल्याने गेले दोन दिवसांपासुन पाऊस झाल्याने या मातीचा गाळ झाला असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणा-या अनेक कामगारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दुचाकीच्या पुढच्या मडगार्डमध्ये हा गाळ गुतत असल्याने वाहनचालकांना गाडयांचे मडगार्ड जागेवरच खोलून त्यातला गाळ काढावा लागतो, मगच गाडया पुढे ढकलल्या जातात यात कामगारांचा दीड ते दोन तास सहज वाया जातो शिवाय मनस्ताप वेगळाच.

या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे योगायोगाने येथे एका कार्यक्रमा निमित्त आले असता कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या व आपला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल या भाबडया आशेने कामगार त्यांच्या पर्यत गेले माञ काही ही प्रतिसाद न देता गाडीत बसून निघुन गेल्याने कामगारांच्या पदरी अखेरिस निराशाच आली.

ज्या शेतक-यांनी या रस्त्याने माती वाहुन नेली त्यांनीच या रस्त्यावर मुरूम टाकावा अशी मागणी कामगारांनी 'शिरूर तालुका डॉट कॉम'शी बोलताना केली.

- संभाजी गोरडे

संबंधित लेख

  • 1