इनामगाव - इनामगावला दुष्काळाच्या तिव्र झळा

शिरुर तालुक्यातील प्राचिन संस्कृतिचा शोध लागून ऐताहसिक नाव कोरले गेलेल्या इनामगावावर दुष्काळाचा तिव्र परिणाम झाला असून, येथील ऊसाचे क्षेत्र, संत्र्याच्या बागा, लिबांच्या बागा, जानवरांचा चारा व इतर भुसार पिके जळून गेली आहेत.

येथील शेतक-याला सर्वात मोठा आर्थिक हातभार लावणारे पिक म्हटले तर ऊस. याच पिकाला पावसाअभावी सर्वात मोठा फटका बसला असून, ७० टक्के पिके वाया गेल्याचे दृश्य सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. येथील घोडनदीला सध्या पाण्याचा टिपकाही नाही. त्यामुळे गेली तीन महिन्यांपासून येथील पिकांची पुर्ण तहान भागलेले नाही. येथून पुढे पिके जगली तरी त्याचा उपयोग होण्यासारखी स्थिती नाही. कारण ऊस पिकांची वाढ थांबलेली आहे. काही ठिकाणी ऊसाचे पाचट झाल्याचेही पाहवयास मिळते आहे. गाव व परिसरात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरद्वारे सोय केलेली आहे.

जनावरांसाठी येथे चारा डेपो व छावणी नाही. छावणी होण्याची अवश्यकता असूनही येथे अद्याप तसे प्रयत्न झालेले नाहीत. येथील उपसरपंच व श्रीगोंदा सह.साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले की, ग्रामस्थांनी मिळून गावच्या दुष्काळाची माहिती अजित पवार यांच्या कानावर घातली आहे. परंतु अघाप काही मदत मिळालेली नाही. गावामध्ये सर्व अधिकारी येवून गेले परंतु, हातात काहीच नाही. त्यामुळे आमच्या टंचाईवर काहीतरी उपायाची गरज असून, अद्याप शासकीय काहीच मदत नाही. सध्या विविध कार्यकारी सेवा सोसायटयांचा कर्ज वसूल ठप्प झाला असून, शेतकरी खते विकत घेण्यास तयार नाहीत. चालू वर्षीचे पिक गेल्यात जमा असून, पिक कर्जे व इतर कर्जाचा वसूल कसा होणार ? असा प्रश्न सध्या सोसायटीस पडला आहे.

पाणी नसल्यामुळे येथे दुध धंदाही अडचणीमध्ये आला आहे. दुधाचे रोजच्या संकलानामध्ये मोठी घट झाली असून, जनावारांसाठी पिण्याचे पाणी सध्या १ किलोमीटरवरुन आणावे लागत आहे. लोकांच्या अर्थिक नाडया थंडावल्यामुळे बाजारामध्ये एकदम थंडगार आहे. परिसरातील नागरिकांनी नवीन बांधकमे, विकासाची काम, इतर खर्चाची काम करण्याचे थांबविले असून, दुष्काळाला सामोर जाण्याची तयारीत आहेत. यासाठी शासणाकडून काही मदत मिळते का? या प्रतिक्षेत येथील नागरिक सध्या वाट पहात आहे. एकंदरीत दुष्काळाच्या संकटाने येथील नागरिक संकटात सापडला आहे.

- संपत कारकूड
(संबंधित माहिती 'शिरूर तालुका डॉट कॉम'चे वाचक रोहित कांबळे यांनीही पाठविली आहे.)

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य