वाघाळे - साईड पट्ट्यांबाबात 'शिरूर तालुका डॉट कॉम'च्या वृत्ताची दखल

शिक्रापूर-मलठण या रस्त्यावरील साईड पट्‌टयांबाबत "शिरूर तालुका डॉट कॉम'वर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर साईडपट्‌टया भरण्याचे काम चालू केले आहे. याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

संकेतस्थळावर वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. यानंतर संबधित बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी गेले तीन वर्षापासुन रखडलेल्या साईडपट्‌टयांच्या कामास सुरवात केली आहे. आजमितीस गणेगाव खालसा ते शिक्रापूर या रस्त्यावरील साईड पट्‌टया टाकण्याचे काम चालू आहे. उर्वरित साईट पट्‌टया थोडयाच दिवसात भरून पुर्ण कराव्यात अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
लोकप्रतिनिधी ठेकेदाराला घालतात पाठीशी?
शि
क्रापूर-मलठण रस्त्यावर गेले तीन वर्षापासून साईड पट्‌टया न भरल्या गेल्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना ञास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व लोक प्रतिनिधींकडे या रस्त्यावरील साईड पट्‌टया त्वरीत भराव्यात अशी वेळो वेळी मागणी करून ही संबधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

सन २००८ ते २००९ या कालावधीमध्ये या मलठण-शिक्रापूर रस्त्याचे काम पुर्व हवेलीतील एका ठेकेदाराकडून करण्यात आले. काम पुर्ण झाले माञ अदयाप पर्यत या रस्त्यावर साईड पट्‌टयासाठी मुरूमाचा एक खडा ही ठेकेदाराने टाकला नाही व अधिकारी व लोकप्रतिनिधींनी ही या ठेकेदाराला जबरदस्ती केली नाही. परिणामी आजपर्यत या साईड पट्‌टया भरल्या न गेल्यामुळे अनेक स्वरूपाचे किरकोळ अपघात तर झाले आहेच शिवाय रस्त्यावरून आधी गाडी कोणी खाली उतरवायची या वरून मोठया प्रमाणात वादावादी होत आहे. ऊस तोडणीच्या हंगामात तर ऊसाने भरलेल्या टॅक्टर चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या तीव्र व खोलगट खड्‌डयामुळे अनेकदा दुचाकी गाडयाचे टायर व टयुब मोठया प्रमाणात कट होत असून कामगार व प्रवाशी वर्गाला नाहक अर्थिक भुदर्ड बनवला जात आहे.

संबधित ठेकेदाराकडून या रस्त्यावर त्वरीत साईड पट्‌टया टाकून, घ्याव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गा कडून केली जात आहे.

- संभाजी गोरडे

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य