कोंढापुरी - तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?

मैत्री...

तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
हृदयातील तुमच्या मैत्रीचे प्रेम मला द्याल का?
तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
मैत्री म्हणजे असते सुख-दुखाःचे नाते
विश्वास भरवसा आणि प्रेमाचे पाते
त्यामध्ये तुम्ही तुमचा हासवा भराल का?
तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
मैत्री म्हणजे असते एकमेकांची ओढ
भांडण तंटा राग रुसवे करावे गोड
त्यामध्ये तुम्ही तुमचा रुसवा भराल का?
तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
मैत्री म्हणजे असते निस्वार्थी प्रेम
नसावी शारिरीक ओढ, असावे हृदयातील रोम
त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रेम भराल का?
तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
मैत्री ही आयुष्यात एकदा तरी करावी
स्त्री, पुरुष अशी बंधने त्यामध्ये नसावीत
अतुट नाते जिवना आनंदी असावेत
त्यामध्ये तुम्ही माझ्याशी मैत्रीचे नाते जोडाल का?
तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
मैत्रीचा हात मी मागत आहे मैत्री साठी
सुख-दुखः वाटण्या व आनंदासाठी
त्यामध्ये तुम्ही तुमची निस्वार्थी मैत्री भराल का?
तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का?
हृदयातील तुमच्या मैत्रीचे प्रेम मला द्याला का?

- अशोक मा. गायकवाड, कोंढापुरी. (मो.- 9860965805)

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही