वडगाव रासाई - औंदुबराभोवती साकारतेय स्वकष्टातून मंदिर!

डगाव रासाई (ता. शिरूर) येथील दत्तभक्त ह.भ.प. विठठल मारुती सुतार ऊर्फ विठठल महाराज हे आपल्या घरासमोरील अत्यंत जुन्या मंदिराचा जिर्णोध्दाराच्या कामात मग्न असून, या कामासाठी त्यांनी स्वतः मंदिर पुर्ण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.

पिढयान-पिढया दत्त भक्त म्हणून समजले जाणारे सुतार कुटुंब आणि त्यांच्या घरासमोरील मठ हे आजूबाजुच्या चार गावांमध्ये प्रसिध्द ठिकाण आहे. स्वतः महाराज गावोगावी फिरुन अखंड हरिनाम सप्ताहामध्ये किर्तनही करतात. साध्या व सोप्या भाषेमध्ये किर्तन करण्यामध्ये त्यांची ख्याती आहे. घरासमोरील मठ हे त्यांचे गुरु सद्‌गुरु सेवकनाथ महाराज यांची समाधी म्हणून ओळखली जाते. त्यांचे गुरु हे मोठे दत्त भक्त होते. त्यांच्याकडून मिळालेल्या विद्येने व प्रेरणेने १९६६ मध्ये मोठया काळया पाशानाचे घडीव दगडी तोडी व माती मध्ये हा मठ उभा केला होता. आजतगायत तो याच अवस्थेत उभा होता. मठ जिर्ण व मोडकळीस आला होता. विठठल महाराज यांच्या मनामध्ये या जागेवर नव्या मठाच्या मंदिर बांधकामाचे विचार घोळत हाते. हे भिमरुपी काम प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्यासाठी प्रकट इच्छा व चिकाटी त्यांच्या मनात होती. परंतु, अर्थिक स्थिती तशी नव्हती.

मंदिर तर होणे गरजेचे आहे, परंतु पैसे नाहीत. अशा अवस्थेमध्ये महाराजांनी मंदिर बनविण्याचा संकल्प हाती घेतला. कुठल्याही निधीची व खर्चाची तमा न बाळगता स्वतः मेहनत- मजुरी करुन मंदिर उभेच करावयाचे, हे त्यांनी मनोमन ठरविले. सद्‌गुरु सेवकनाथ महाराजांचे एक शिष्य देवराम परिहार राहणार पुणे यांना या योजणेची माहिती त्यांनी दिली. त्यांनी स्वतःचे पन्नास हजार रुपये देवू केले. जुने मंदिर पाडण्यासाठीही मोठा खर्च येणार होता. विठठल महाराजांनी स्वतः मंदिर पाडण्यासाठी मजूरी करुन मंदिर पाडले. मोठ-मोठाले दगड बाजूला करण्यासाठी त्यांना काही काळ गेला. मंदिर कसे असावे, त्याची बाहेरील व आतील कल्पना ही स्वतः विठठलराव यांनी तयार केली. पेशाने स्वतः सुतार असल्यामुळे त्यांनी मंदिराची लाकडी प्रतिकृतही तयार केली. मंदिराच्या पायाचे आर.सी.सी.बांधकाम स्वतःच्या हाताने करण्यात आले. येथे स्वइच्छेने राबणारे एक मजूर सध्या इथे काम करीत आहे.

या मठ वजा मंदिराचे बांधकामाची साईज ६५ बाय २५.५ अशी असून, हे काम चालू करुन सध्या दिडवर्षे पुर्ण झाले आहे. आत्तापर्यंत फक्त पायाचे आर.सी.सी. पर्यंतचे काम झाले आहे. मंदिर पुर्णत्वाला येण्यासाठी देणगीची मोठी गरज निर्माण झाली आहे. महाराज मात्र अद्याप अजून कोणाच्या दारामध्ये देणगी मागण्यास गेलेले नाहीत. स्वइच्छेने देणगी देणा-यांना भेटण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. मंदिरामध्ये एक तळघर बांधण्याचा विचार असून, त्यामध्ये ध्यानमंदिर करण्याची योजना त्यांनी आखलेली आहे. मंदिरामध्ये दगडामधून एक शिवलिंग बनविण्यात महाराजांचा वाटा आहे. येथील पादुका या गानगापुराहुन आणण्यात आल्या आहेत. हा संकल्प पुर्णत्वास घेवून जाण्यासाठी माहाराजांना देणगीची गरज निर्माण होणार आहे. त्यांच्या या कामास देणगीचे आव्हाण करण्यात आले असून, विठठल महाराजांचा मोबाईल नंबर ९७३०१५५६०३, ९८२३५६१९२२ असा आहे.

- संपत कारकूड

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य