शिरूर - 'पितृपंधरवडया'चे स्वरूप बदलतेय...

ध्या सुरू असलेल्या "पितृपंधरवडया'चे स्वरूप पुर्णपणे बदलले असल्याचे चिञ सर्वञ पहावयास मिळत आहे. आपल्या पुर्वजांचे स्मरण करून त्यांची आठवण ठेवून श्राध्द विधी करण्याचा कालावधी म्हणून पुर्वीपासून 'पितृपंधरवडा' साजरा केला जातो.  एक ऑक्टोबरपासून पितृपंधरवडा सुरू झाला असून तो यंदा १५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या पंधरा दिवसातील एका दिवशी प्रत्येक घरी ज्या तिथीला घरातील व्यक्ती निधन पावली असेल त्या तिथीला तर काही ठिकाणी निधनाच्या दुसरया दिवशी श्राध्द विधी केले जातात. यालाच पितरं असे म्हटले जाते.

तांदळाची खीर, चपाती, गुलगुले, वडे, विविध प्रकारच्या भाज्या, कढी, डाळ व भात आणि पुर्वज व्यक्तीचा एखादा आवडीचा पदार्थ असा पारंपारिक नैवेद्य पुर्वीपासुन या दिवशी केला जातो. हे नैवेद्याचे ताट सकाळी बाहेर ठेवून या नैवेद्याला कावळयाने स्पर्श केल्यानंतर आपल्या घरातील पितरांना जेवण मिळते अशी या मागची धारणा मानली जाते. नैवेद्याला काकस्पर्श झाल्यानंतर उपस्थितांना व घराशेजारील व्यक्तींना जेवण घातले जाते. या दिवशी पुर्वी घरामध्ये पाविञ्य जपले जायचे व हा भावनात्मक प्रसंग मानला जायचा. परंतु, आता हा विधी पुर्णपणे मंगलमय मानला जाऊ लागला आहे. सध्या या विधीचे व पदार्थांचे स्वरूप पुर्णपणे बदलल्याचे दिसून येते.

पुर्वीच्या काळी पितराच्या दिवशी खीर, चपाती व पुरणपोळी असे पारंपारिक पदार्थ जेवणात असत. सध्या या पदार्थांची जागा श्रीखंड, लापशी, जिलेबी, बुंदी, बासुंदी लाडू, मासवडी, गुलाबजाम व शिरा या पदार्थांनी घेतली आहे. या दिवशी घरी दुसराच कार्यक्रम समजून आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेपायी नातेवाईकांपेक्षा विविध क्षेञातील व्यक्ती व पदाधिकारी यांना जेवणासाठी भ्रमणध्वणीध्दारे व मेसेज पाठवूण आग्रहाचे निमंञण दिले जाते. या मंडळीनी या दिवशी आपल्या घरी जेवायला आलेच पाहिजे, असा अटृहास निमंञकाचा असतो. घरगुती स्वयंपाकाऐवजी केटरर्स बोलावून जेवण तयार करण्यात येते. तांब्या, ताट व पितळीऐवजी पान आणि प्लॅस्टिकच्या पञावळी व डिशचा वापर वाढलेला दिसून येत आहे.

थोडक्यात, काळाबरोबर बदल होत चालला आहे, हे सर्वांना मान्य करावे लागणार आहे.
 
- पोपट पाचंगे

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही