इनामगाव - 'घोड'चे आनंद, अश्रू..!

भिमानदी व घोडनदी या एकमेकांना नदीजोड प्रकल्पाअंतर्गत जोडल्यास शिरुर पुर्व भागातील 14 हजार एकर जमीन ओलीताखाली येणार असून, या परिसरातील चार गावांचा बारमाही शेती सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. हा नदीजोड प्रकल्प हाती घेण्यासाठी इनामगाव येथील उपसरपंच श्रीनावास घाडगे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे या भावी प्रकल्पाची मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे.

घोडनदीवरील घोडधरण होऊन 55 वर्षे लोटली. या धरणांचे उदघाटन तत्कालिन दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या हस्ते झाले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. शिरुर, कर्जत, श्रीगोंदा या तीन तालुक्यासाठी या धरणातून पाणी जात असे. त्यावेळी या तालुक्यांतील हजारो एकर क्षेत्र बारमाही ओलीताखाली येत होते. अजूनही जुनी माणसे या नदीच्या बारामाही पाण्याबाबत माहिती सांगतात. सर्वकाही सुजलाम-सुफलाम होते. मात्र, सन 2000 नंतर धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना मोठी घरघर लागली आणि घोडधरणाखाली येणाऱया गावांतील शेतकऱयांचे हक्काचे पाणीच गेले. येथील भरोशाची शेती कालांतराने बेभरोशाची झाली. शेती जमिनी ओसाड पडू लागली, पिके जळू लागली. पिण्याच्या पाणी टंकरद्वारे आणण्याची वेळी आली. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती येथील जनतेची झाली.

एकेकाळ बारमाही वाहणारे पाणी हळूहळू कमी होऊन त्याचा दुश्परिणाम या गावातील शेती क्षेत्रावर होऊ लागला. तरुन बेरोजगार झाले, मजूरी संपली. धरण असूनही प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या झळा बसू लागल्या. पिण्याच्या पाण्याचे दुर्मिक्ष जाणवू लागले. या वस्तुस्थितीची जनतेला जाणीव झाली. या जाणीवेमधूनच हे अभ्यासू संशोधन येथील सरपंचानी शासण दरबारी मांडले.

घोडधरणाखली एकूण 6 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे असून, सगळे कोरडे आहेत. या सहाही बंधाऱयास मोठा उतार आहे. पाणी ताबडतोप वाहून जाते. पाणीसाठी कधीच पुरवणी येत नाही, अशी सिथती. साठविलेले पाणी फक्त तिन महिनेच पुरते. तिन महिन्यानंतर मात्र येथील शेतील पुन्हा सिंचनाचा प्रश्न गंभीर बनतो. शेती विहिर बागार्इत अथवा बोअरवेल घेवून वाचविण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो. परंतु, तो प्रयत्न अपुरा पडतो. आणि येथील शेती पाण्याअभावी पुन्हा-पुन्हा संकटात जाते. यासाठी शिरसगाव काटा येथे भिमानदीवरुन घोडनदीला नदीजोड प्रकल्पांअंतर्गत घेतल्यास फारमोठा कायापलट होऊ शकतो. असे झाले तर येथील सर्व प्रश्न मिटले जाऊ शकतात.

घोडनदीवर डिंबा, माणिकडोह, येडगाव, पिंपळगाव जोगे व वडज अशी एकूण 5 धरणे झाली. या धरणांध्ये पाणी साठविण्यास सुरवात झाल्यानंतर त्या पुढील काळात मात्र घोडधरणाखाली येणाऱया गावांना पाण्याची मोठी चणचण जाणवू लागली. घोडधरणाची क्षमता 7 टीएमसी आहे. घोडधरणाच्या वरील धरणांनी सध्या अंदाजे 25 टीएमसी पाणी साठवून ठेवले आहे. पंरतु, घोडधरणाखालील गावांना मात्र पाण्याचा थेंबही नाही ही वस्तुसिथती. पाण्याचे दरवर्षी होणारे दुर्मिक्षामुळे येथील शेतकऱयांचे पिक कर्ज व इतर कर्जेही फिटेनासे झाली आहेत. गावात शेतकऱयांनी पिक कर्ज व इतर कर्जे मिळून 3 ते 4 कोटी कर्ज घेतलेली आहे. त्याचा वसूला ठप्प झाला आहे. शेतकऱयांना विजबिल, पाणीपटटी, शेतसारा भरण्यासही पैसे नाहीत. येथील शेतकरी थकित कर्जामध्ये वाहत गेला आहे. त्याला सावरण्यासाठी लाभक्षेत्रावर असणाऱया सर्व शेतकऱयांना कर्जमाफीशिवाय पर्याय राहिला नाही.

किमान या परिसरातील शेतकऱयांनी पिक कर्जे व त्यावरील व्याज तरी माफ व्हावे, अशी शेतकऱयांची मागणी आहे.

शिरुर पुर्व भागात दक्षिणेस भिमानदी तर उत्तरपुर्व भागातून घोडनदी वाहत असते. भिमेमध्ये मुळा-मुठा या दोन नद्यांद्वारे येणाऱया पाण्यामुळे ही नदी बारमाही पाण्याने भरलेले असते. तुलनेने घोडनदीद्वारे चागंला पाऊस झाला तर कसेबसे सहा महिने पाणी मिळते. भिमानदीवरही जागोजागी कोल्हापूर पध्दतीनेच बंधार बांधलेले आहेत. तसे ते घोडनदीवरही आहेत. परंतु घोडनदीद्वारे येणारे पाणी अपुरे व मर्यादित असते. यामुळे या नदीवरील शेतीच्या पाण्याची पुर्ण गरज भागत नाही. सहा महिनेच पाणी मिळते. या सर्वाचा विचार करुन नदीजोड प्रकल्पाअंतर्गत भिमानदीचे पाणी घोडनदीमध्ये सोडण्यासाठी गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी रांजणगाव सांडस या ठिकाणी मोठा कालवा खोदून तो शिरसगाव काटा इथपर्यंत घोडनदीस जोडण्यात यावा, अशी कल्पना येथील जाणकरांनी मांडली आहे. या आठ किलोमीटरच्या नदीजोड प्रकल्प हाती घेतला तर शिरुर तालुक्यातील घोडनदीपात्रा शेजारील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी, हंगेवाडी, चिंभळा, वांगदरी, काष्टी या गावांतील शेती सिंचनास मोठा फायदा होणार आहे. या दोन्ही नधांमधील अंतर 12 ते 15 कि.मी. आहे. हा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविल्यास शिरुर तालुक्यातील 14000 एकर व श्रीगोंधा तालुक्यातील 20000 एकर जमीन ओलीताखाली येवू शकते.

अर्थिक जिवनमान सुधारुन रोजगारात वाढ
या नदीजोड प्रकल्पामुळे येथील शेतकऱयांचे जिवनमान सुधारुन परिसरातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न कायमचा दुरु होऊ शकतो. सध्या या गावांमधील शेतमजूरांना बाहेरगावी जावून काम करावे लागते आहे. यासर्व विषयांचा आत्तापर्यंत कुठल्याही राजकिय नेत्यांनी अभ्यासुपणाने पहाणी अथवा विचार केलेला नाही, ही अत्यंत दुर्दवाची बाब आहे. सर्व जिवनमानच बदलून टाकणारा हा म्हत्वकांक्षी प्रकल्पाची प्रथम मागणी करणारे इनामगाव येथील उपसरपंच श्रीनावास घाडगे यांनी हा विचार राजकीय नेत्यांसमोर मांडलेला आहे. जिज्ञासूंनी याचे महत्त्व पटवून सांगून हा प्रकल्प शासण दरबारी विचारात घेण्यात यावा अशीच मागणी यानिमित्त पुढे येत आहे.

- श्रीनिवास घाडगे, उपसरपंच, इनामगाव.
(शब्दांकन- संपत कारकूड)

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही