शिंदोडी - शेतकऱयांचा छोटया ट्रॅक्टरच्या वापराकडे कल !

ध्या ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणावर वापर होत असून, फळबाग व पटटा पध्दतीच्या उसाच्या मशागतीसाठी मोठया ट्रॅक्टरऐवजी छोटया ट्रॅक्टरचा जास्त वापर होत असल्याने छोटे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱयांचा कल वाढत चालला आहे.

सध्या डाळींब, सिताफळ, चिक्कू अशा विविध फळबागांची लागवड शेतकरी करत आहेत. हलक्या व मुरमाड जमिनित डाळीबांचे उत्पादन चांगले निघत असल्याने बहूतांशी शेतकरी डाळींब लागवडीलाच प्राधान्य देतात.  ऊस लावतानाही सरी पध्दतीऐवजी पटटा पध्दतीने ऊसाची लागवड केल्यास चांगले उत्पादन निघत असल्याने शेतकरी ऊसाची लागवड करताना पटटा पध्दत वापरतात.

या पटटा पध्दतीच्या ऊसाची आणि फळबागांची अंर्तगत मशागत करण्यासाठी छोटया ट्रॅक्टरचाच वापर करावा लागतो. या ट्रॅक्टरने नांगरनी, काकरणी, पाळी, पेरणी, सारे पाडणे, औषध फवारणी अशी विविध कामे करता येतात. अनेक शेतकरी स्व:तच्या शेतातली कामे करून व्यवसायासाठी या ट्रॅक्टरचा वापर करत आहेत.

- तेजस फडके

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यातील प्रशासन शेतीचे पंचनामे योग्य प्रकारे करत आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही