मांडवगण फराटा - ऊसाच्या बाजारभावासाठी शेतकरी वेठीस

खासदार राजू शेटटी यांनी शेतकऱयांना उसाची पाहिली उचल तीन हजार रुपये मिळावी, म्हणून चालू केलेले आंदोलन व त्यांना झालेली अटक या पार्श्वभुमिवर प्रत्येक शेतकऱयांना वाटते की आपल्या उसाला चांगला बाजारभाव मिळावा, आणि तो राजू शेटटी यांनी मागणी केलेल्या रकमेइतकाच असावा, तो मिळेपर्यंत प्रत्येक शेतकऱयांच्या मनातील बाजारभावाचे आंदोलन मात्र काही थांबलेले नाही, ते कायम आहे. हे सुप्त परंतु आदृश्य आंदोलन मात्र मोडून काढता येणे अशक्य आहे.

सध्या जनावरांचा चारा म्हणून शासणातर्फे घेवून जाणाऱया ऊसास पाचटासह 2750 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतो. गुळासाठी गाळल्या जाणाऱया उसासाठी सुध्दा एकरकमी 2700 ते 2800 असा बाजारभाव मिळतो. कोल्हापूरमध्ये गुळाला 5100 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतो, तर मग शेतकऱयांनाच साखर कारखाने हा बाजारभाव का देत नाहीत? हा प्रश्न इनामगाव येथील उपसरपंच श्रीनिवास घाटके यांनी केला आहे. बहुतांश शेतकरी हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला मानणारे आहेत. याच पक्षातील राजकिय नेत्यांनी या बाजारभावाचा विषयासाठी आपल्याच शेतकऱयांना वेठीस धरल्याचेही घाटके यांनी सांगितले.

महागाईच्या प्रमाणात उसाला सध्या कारखाना देत असलेला बाजारभाव घेणे शेतकऱयांना सध्या तरी परवडत नाही, ही वस्तुस्थिती असतानाही, शासणाने उसाच्या बाजारभावाच्या आंदोलनात तटस्थ राहणे कितपत संयुक्तिक आहे. जेंव्हा शेतकऱयांवर वेळ येते तेंव्हा शासण प्रत्येकवेळा सोईची व शेतकऱयांना तोटयात घालण्याची भूमिका घेते, अशी गेली चार वर्षांपासूनची परंपरा या आंदोलनानिमित्त पुन्हा एकदा समोर आली आहे. शेतकऱयांना बाजारभावाचे तिन हजाराचे गणित आता समजून सांगण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. खंताचे भरमसाठ वाढलेले बाजारभाव, शेतकऱयांना शेतीसाठी लागणाऱया सर्वच वस्तुंना मोठी किमत मोजावी लागते आहे. एक परिपूर्ण शेतकरी दाखविणे केवळ अशक्य आहे.

चालू वर्षीच्या कठीण प्रसंगाला सामोरे जात असताना शासणाने बाजारभावामध्ये लक्ष न देणे म्हणजे शेतकऱयांना वाऱयावर सोडल्यासारखे आहे. सध्या उसाच्या बाजारभावाचा निर्णय प्रत्येक शेतकऱयांच्या मनात धगधगत आहे. खासदार राजू शेटटी शेतकऱयांच्या बाजारभावासाठी तुरुंगवास भोगतात, ही कल्पनाच काही राजकीय पुढाऱयांना भावत नाही. या भावनेतूनच आंदोलन दाबण्याचा व दडपण्याचा प्रयत्न सध्या दिसून येत आहे. तीन हजार मिळाल्याशिवाय शेतकरी संतुष्ट होणार नाही, ते देण्यास उशिर होत आहे. आणि ते मागून घेण्यास स्वाभिमानीच्या राजू शेटटीसारख्यांना संघर्ष करावा लागतो आहे, या सर्व प्रकारांमुळे शेटटी यांची प्रतिमा अजूनच बळकट होत असून, शेतकऱयांच्या मनात रुजण्यास भर पडत आहे. ऊसाचा बाजारभाव आणि ऊस उत्पादक शेतकरी हा अत्यंत कळीचा आणि संवेदनशिल मुददा ठरत आहे. या प्रश्नासाठी शासण सध्या बघ्याची भूमिका घेत असून, शेतकरी हे विसरणार नाही. यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर मार्ग काढणेच शासणाला जरुरीचे आहे, परंतु शासण याकडे पाहत नाही. हे सर्व शेतकऱयांचे दुर्देव आहे.

- संपत कारकूड

संबंधित लेख

  • 1