चिंचोली मोराची - कल्पक बुद्धीतून तयार केले धान्य मळणी यंत्र!

संत नाणेकर या गृहस्थाने आपल्या कल्पक बुद्धीतून बैलांच्या साहाय्याने चालवाव्या लागत असलेल्या धान्य मळणी यंत्रास एका जुनाट पण चालू स्थितीतील जीपवर अल्ट्रेशन करून जोडले आहे. परिणामी त्यांच्या बैलांचा ताण तर पूर्ण पणे कमीच झाला असून, एका व्यक्तीस रोजगार पण उपलब्ध करून दिला आहे.

कायमच दुष्काळी समजल्या जाणा-या, चारा, पाणी टंचाईची कायमच झळ सोसत असलेल्या चिंचोली मोराची हे गाव. परिसरातील शेतक-यांची धान्य तयार करून घेण्याची सोय होईल व स्वतः साठी रोजी-रोटी निर्माण होईल या उद्देशाने त्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी मळणी यंत्र विकत घेऊन व्यवसायास सुरवात केली. सुमारे सोळा वर्षे बैलांच्या साहाय्याने मळणी यंत्र परिसरात फिरवत हाती येईल तसा व्यवसाय केला. आज ते जवळपास पन्नाशीकडे झुकले आहेत. पण व्यवसाय मात्र तोच सुरू आहे. सतत भेडसावणारा दुष्काळ, पाणी व चारा टंचाई यामुळे ज्या बैलांच्या जिवावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला त्या बैलांना त्यांनी चार वर्षांपूर्वी विश्रांती दिली.

एक जुनी ट्रॅक्‍स जीप घेऊन तिच्यावर अल्ट्रेशन करून मळणी यंत्र जोडले आहे. त्यांनी एका तरुणाला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. स्वतःच चालक असल्याने तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील अनेक गावात त्यांच्या जीपवरील मळणी यंत्रास धान्य करण्यासाठी मागणी असते. धान्य मळणीच्या काळात दिवसात पन्नास पोते धान्य ते या यंत्राच्या साहाय्याने योग्य दरात करून देतात. या व्यवसायातून वर्षाला एका लाखाच्या वर उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात. एकंदरीत जीप वर मळणी यंत्र बसविल्याने मुख्य म्हणजे बैलांचा ताण बंद झाला. स्वतःची शारीरिक कष्टातून ब-यापैकी मुक्तता झाली व शेतक-यांना ही ते वेळेवर धान्य तयार करून देवू लागले आहेत.

- सुभाष शेटे

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही