वडगाव रासाई - मंदिरात ३०५ वर्षांपूर्वीची प्राचिन घंटा!

येथील रासाई देवीच्या मंदिरामध्ये सुमारे ३०५ वर्षांपुर्वीची पोर्तूगीज कालीन घंटा देवीच्या गाभाराच्या सभामंडपाच्या दालनात पहायला मिळत आहे. या घंटेचा आवाज गेली तीन शतके गाव आणि परिसरामध्ये राहणाऱयांच्या कानी घुमत असून, इतकी वर्षे लोटली तरी ही घंटा आजही मजबूत अवस्थेत आहे.

गावच्या जुन्या इतिहासातील अत्यंत म्हत्वाची साक्ष म्हणून ही घंटा मोठया दिमाखात देवीच्या मंदिरात पाहणारांचे लक्ष वेधून घेते. या घंटेवर इसविसन १७०८ असे साल पहायला मिळत असून, घंटा पुर्णपणे ओतिव धातुची आहे. या घंटेचे वैशिष्ट्ये म्हणजे मंदिरामध्ये एकदा घंटा वाजविली तरी गावच्या कोपऱया-कोपऱयात आवाज जातो. आत्तापर्यंतच्या जुन्या घंटामध्ये हीचा समावेष होत असून, ही कोठे बनविली याचा इतिहास मात्र सांगता येत नाही. रासाई देवीचे मंदिर हे अत्यंत जुने आहे. मंदिर पुर्वे-पश्चिम दिशेस असून हेमाडपंथी बांधकाम आहे. या बांधकामाचा नेमका कालावधी सांगता येत नाही.

मंदिराच्या आवारात एक शिलालेख असून, त्यावर शके १५५० असा मजकूर आहे. हे ठाणे रेणुकेचे जागृत देवस्थान समजले जाते. गावाला जुना ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय वारसा आहे. देश पारतंत्रयात असताना येथे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे एक स्वातंत्रविर आनंदस्वामी या गावात राहत होते. या सर्व घडामोडींमध्ये वरील घंटा या सर्व इतिहासाची साक्ष देत आजही सर्वांना वंदनीय आहे.

- संपत कारकूड

संबंधित लेख


शिरूर तालुक्यातील 'काही' रुग्णालयांमध्ये निष्काळजीपणा केला जातो, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही