शिरूर - विद्यार्थ्यांची 'आधार' नोंदणी शाळा केंद्रावरच करावी

विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या रक्कम बक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार कार्डची नोंदणी अत्यावश्यक असल्याने प्रत्येक शाळा स्तरावरील राहिलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्डची नोंदणी ही प्राधान्यांने त्यांच्या शाळेमध्येच होणे सोईस्कर असून, यामध्ये विद्यार्थी व पालक यांची होणारी ससेहोलपट थांबविण्याची मागणी विधार्थी व पालक वर्गांकडून करण्यात आली आहे.

शासनाकडुन विविध योजणांसाठी आधार कार्डचा उपयोग होत असल्याने त्याचे महत्त्व व गरज नागरिकांना हळुहळू समजू लागले आहे. मात्र 'आधार कार्ड'चे काम अपूर्ण आहे, हा यातील मोठा विरोधाभास आहे. आधार कार्ड नसणाऱया विद्यार्थी व नागरिकांची सध्या मोठी गैरसोय सध्या होत असून, शासनाच्या दुसऱया टप्प्यातील नोंदणीचे नागरिक अत्यंत अतुरतेने वाट पाहत आहेत. यातील विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम कोणत्याही नागरी सोयी-सुविधा देण्यासाठी अथवा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी किमान काही वेळ हा दयावाच लागतो. या वेळेच्या नियोजणासाठी आधार कार्ड ही निरंतर काम करणारी प्रक्रिया ठरल्यास त्यामध्ये राहिलेल्या नोंदणीचा अनुशेष भरुन काढता येईल. आधार कार्डची नोंदणी पुर्ण होईपर्यंत हे काम करुन घेण्यासाठी शासणाकडून केलेल्या व्यवस्थेची दिरंगाई नागरिकांचे ओढीस कारणीभूत ठरत आहे.

सध्या विद्यार्थ्यांच्या पुर्व अथवा सराव परिक्षेचा हंगाम असून, आधार नोंदणी शिबिराच्या ठिकाणी सर्वच विद्यार्थी व पालक यांना जावून नोंदणी करणे केवळ अशक्य आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा बुडवून तसेच मोलमजुरी करणाऱया पालकांना आपला रोजगार बुडवून आपल्या पाल्यास संबंधित शिबिराच्या ठिकाणी घेवून जाणे भाग पडत आहे. तसेच संबंधित या ठिकाणी जाण्यास प्रत्येक विद्यार्थी व पालकांना आर्थिक खर्चास सामोरे जावे लागते आहे. आधार कार्डची राहिलेला अनुशेषाची नोंदणी ही त्या शाळेमध्येच अथवा जवळच्या ठिकाणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
यापुढेही जावून आधार कार्ड नोंदल्यानंतर कार्ड तयार होवून, ते लाभार्थी घटकांपर्यंत पोचण्यास मोठा कालावधी जात आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी नोंदणी झालेल्या नागरिकांना आधार कार्डची प्रिंट इंटरनेटद्वारे देण्याची व्यवस्था केली तर यामधील सर्व वेळ वाचणार आहे. केवळ शिबिरे घेवून वेळ व होणारा आर्थिक खर्च घालविण्यापेक्षा गावपातळीवरील जवळच्या ठिकाणी अथवा शाळेमध्ये ही नोंदणीची मागणी होत आहे.

- संपत कारकूड

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही